mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


आजऱ्यात मराठा महासंघाचे लाक्षणिक उपोषण

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा मराठा महासंघाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आजरा तहसील कार्यालय समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

       यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, प्रकाश देसाई, दत्तात्रय मोहिते,गणपतराव डोंगरे, शिवाजीराव पाटील, शिवाजीराव इंजल, संभाजी इंजल यांच्यासह मराठा महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.तहसीलदार समीर माने, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी उपोषण स्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांची चौकशी केली.

मराठा आरक्षण आंदोलनात सदैव समाज बांधवासोबत : मुकुंदराव देसाई

     मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटी येथे मराठा लढवय्या श्री. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी एकदिवसीय उपोषण आजरा तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने एकदिवसीय उपोषणाला ‌महाविकास आघाडीचे नेते मुकूंददादा देसाई यांनी पाठिंबा दिला.

      यावेळी मुकूंददादा देसाई म्हणाले,
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत जात आहे.. त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाने शासनाकडे केलेल्या आरक्षणाच्या मागणीबाबत राज्य सरकारने संवेदनशीलतेने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा.या आरक्षणाच्या लढ्यात उतरलेल्या मराठा बांधवांच्या संयमाचा अंत पाहू नये.

     यावेळी आजरा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन एम. के. देसाई, आजरा साखर संचालक रणजीत देसाई, महादेव पोवार, एस. डी, पाटील , मिनल इंजल, अनिल फडके, डॉ. रोहन जाधव इत्यादी मंडळी उपस्थित होती‌.

केसरकर यांना नुकसान भरपाई अदा

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      श्री गुंडू भैरू केसरकर रा. करपेवाडी ता. आजरा यांना त्यांच्या मालकी क्षेत्रातील ऊसाला पाणी पाजवत असताना गवा रेडयाने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी शासन निर्णयानुसार वनविभाग कोल्हापूर रेंज कार्यालय आजरा यांच्यामार्फत पाच लाखाचा धनादेश आमदार प्रकाश आबिटकर व वनपाल दक्षिण आजरा एस. के. निळकंठ यांच्या हस्ते श्री. दशरथ गुंडू केसरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

सुळेरान मधील शेतकऱ्यांचे जमीन ताबा आंदोलन यशस्वी

            आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       सुळेरान ता. आजरा येथील जमिनीचा ताबा आंदोलन यशस्वी झाले असून विविध मागण्यांची पूर्तता करण्याबाबतचे लेखी पत्र महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आले आहे.

       गट नंबर १६९ च्या  शेतीचा निवाडा अंतिम टप्यात आला असून,अपेक्षित कागदपत्रांची पूर्तता करून शेतकऱ्यांचे बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल.रस्त्याचे काम करीत असताना जमिनीची झालेली नासधूस सपाटीकरण करून देतो,दगड गोटे पडलेल्या ठिकाणची साफसफाई करून दिली जाईल.त्याचप्रमाणे गट नंबर १६९ मध्ये शेतकऱ्यांची जी शिल्लक कामे करून देण्याची हमी देण्यात आली आहे

    धनगरमोळा येथे सिमेंट गटर्स सध्या जेवढ्या शक्य आहे तेवढ्या बांधून देऊन व उर्वरित सिमेंट गटर्सची इस्टीमेट करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. धनगरमोळा नवीन गावठाण येथे बसथांबे नवीन करून देणे, ज्या – ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर मातीकामासाठी व इतर कामासाठी केला त्यांच्या शेताची स्वच्छ्ता व सपाटीकरण करून देणे, धनगरमोळा येथे बधलेल्या पुलाखालून जनावरांचा मूळ रस्ता करून देणे इत्यादी बाबत सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले आहे.

      सदरची कामे येत्या दोन दिवसात सुरू केली जातील अशा आशयाचे पत्र देण्यात आले.यामुळे जमिनीचा ताबा आंदोलनं मागे घेतले आहे.

      या आंदोलनात प्रकाश मोरुस्कर, आजरा साखरचे संचालक, गोविंद पाटील,चंद्रकांत जाधव,उत्तम माडभगत,योगेश जाधव,श्रावण शेटगे,प्रेमानंद खरूडे, हालेश बारदेस्कर, बालकु बारदेस्कर,मिनिन परेरा, यशवंत जाधव,मारुती ना. शेट्गे, निवृत्ती आडकुरकर,धनाजी पाटील,निवृत्ती यादव, शुभांगी पाटील,अशोक अडकुरकर,शरद सुतार,दीपक यादव व दीपक पाटकर यांनी भाग घेतला.

गेट टुगेदरला दिला फाटा

वर्गमित्रांना दिला आर्थिक मदतीचा हात

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजकाल गेट टुगेदरचे पेव सर्वत्र पसरले आहे. जुने मित्र मैत्रणी एकत्र येवून सुख दुःखाच्या गोष्टी एकत्र शेअर करत आहेत. पण केंद्रशाळा पेरणोली व पेरणोली हायस्कूलच्या २००४-०५ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदरला फाटा देत दोन माजी वर्गमित्रांना आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांच्या आगळ्या- वेगळ्या उपक्रमाची पेरणोली पंचक्रोशीत चचर्चा सुरु आहे.

      २००४-०५ मधील पेरणोली हायस्कूलचे माजी विद्यार्थी गेट टुगेदरला एकत्र येणार होते. त्यांना त्यांचा वर्गातील वर्गमित्र सागर चव्हाण याचे त्याचबरोबर त्यांची वर्गमैत्रीण रेखा नावलकर यांचे पती तानाजी नावलकर यांचे निधन झाल्याचे समजल्यावर त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या मदतीला धावून जाण्याचे ठरवले. गेट टूगेदरचे सर्व कार्यक्रम रद्द करून त्यांनी जमवलेली ४२ हजारांची सर्व रक्कम चव्हाण व नावलकर कुटुंबाला ठेव स्वरुपात दिली आहे. ही रक्कम त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केली जाणार आहे. त्याचबरोबर पुढेही या कुटुंबाच्या अडचणीमध्ये सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही मित्रांनी दिली आहे. त्यांच्या छोट्‌याशा मदतीने समाजात वेगळा संदेश गेला आहे.

डॉ. शिवशंकर उपासे यांना आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी व नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन, बेळगावी यांच्या वतीने प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील व्यक्तींना असे पुरस्कार दिले जातात. हरमल (गोवा) येथे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

      डॉ. उपासे यांनी अनेक एम.फील. व पी.एच.डी. धारकांना मार्गदर्शन केले आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान राहिले आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!