

पर्यावरण प्रेमी करणार
रामतीर्थवर वटवृक्षांचा पार्क
५० झाडांची लागवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील पर्यावरण प्रेमींच्या पुढाकाराने आजऱ्याजवळील रामतीर्थ परिसरात वटवृक्षांचा पार्क तयार होणार आहे. येथील रिकाम्या जागेवर आजरा शहरात नव्याने गटीत झालेल्या वृक्षप्रेमी गटाने पुढाकार घेतला आहे. या गटाच्यावतीने १० झाडांची लागवड करण्यात आली. वृक्षलागवडीसाठी स्वनिधी उभारण्यात आला असून वनविभागाकडूनही याला सहकार्य मिळत आहे.
आजरा- गडहिंग्लज मार्गावर सुमारे पावणे दोनशे वर्षांची वडाची झाडे होती. शहरात तर २५ मोठे वटवृक्ष होते. आजरा शहराचे वैभव म्हणून याकडे पाहीले जात होते. आजरा शहरात येणारा पर्यटकांना ही झाडे भुरळ घालत. या झाडांच्या पारंब्याच्या देखण्या कमानीच तयार झाल्या होत्या. संकेश्वर- बांदा महामार्गाच्या बांधकामात त्या उध्वस्थ झाल्या. शेकडो वडांची झाडे तोडण्यात आली. हिरवाईने नटलेला हा रस्ता भकास दिसत आहे. या रस्त्याच्या कडेने वृक्षारोपण केले जाणार आहे. आजऱ्याचे वैभव ठरलेली वडाची झाडे लावण्यासाठी वृक्षप्रेमी सरसावले आहेत. रामतीर्थ परिसरात वटवृक्ष पार्क उभारला जाणार आहे. आळेसाड जागेवर आज पन्नास वडांच्या झाडांची लागवड करून पहिले पाऊल उचलेले आहे. यासाठी स्वनिधी उभारण्यात आला आहे.
सी. आर. देसाई, मीना मंगरुळकर, जी. एम. पाटील, सुभाष विभूते, सुनिल पाटील, डॉ. अंजनी देशपांडे, डॉ, गौरी भोसले, रणजित कालेकर, संतोष जाधव, दशरथ सोनुले, नाथ देसाई, श्रावण जाधव, सारीका बटकडली, संयोगीता सुतार,, वृषाल हुक्केरी, डॉ. अनिता डिसोजा, सयफीन गोंडेवाले आदी उपस्थित होते. वनरक्षक तानाजी लटके व त्यांच्या सहकाऱ्यांनी वृक्षलागवडीसाठी मोलाचे सहकार्य केले.
जरांगे -पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा…
आज मराठा महासंघाचे उपोषण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अंतरवाली सराटी येथील सुरू असणाऱ्या मराठा आरक्षण पार्श्वभूमीवरच्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज आजरा येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज गुरुवारी सकाळी ११ पासून एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनाने तातडीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणीही मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे,अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे व तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांनी दिली.
अंतिम निवाडा न होताच राष्ट्रीय महामार्गाने जमीन जमिन संपादित केल्याचा आरोप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
धनगरमोळा ता. आजरा येथील गट नंबर १६९ मधील जमिनीचा अंतिम निवाडा होण्यापूर्वी संपादन केल्याचा आरोप धनगरमोळा येथील शेतकऱ्यांनी केला असून शेतकऱ्यांचे इतर प्रश्नही तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी केली आहे.
संकेश्वर – बांदा महामार्गाचे काम सुरू करण्यापूर्वी झालेल्या बैठकीत धनगर मुळा येथील ग्रामस्थांचे विविध प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत.यामध्ये प्राधान्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट गटर्स नसणे, संरक्षण कठडे नसणे बस थांबे नसणे, गावे जोडणारे रस्ते तयार नसणे, मातीचे ढीग तसेच असणे असे प्रकार घडले आहेत तातडीने गट नंबर १६९ च्या निवाड्यासह इतर प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले असून निवेदनावर
प्रकाश मोरुसकर,गोविंद पाटील,कृष्णा खरुडे, संतोष शेटगे, विलास खरु,डे हालेस बारदेसकर, उत्तम माडभगत आदींच्या सह्या आहेत.
रस्त्याशेजारच्या घरामध्ये पाणी
सिमेंटच्या गटर्स नसल्याने व इतर कोणतीही आवश्यक ती खबरदारी घेतली गेली नसल्याने रस्त्याशेजारी असणाऱ्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरू लागले आहे त्यामुळे तातडीने सिमेंटच्या गटर्स बांधण्यात याव्यात अशी मागणी यावी प्रकाश मोरुस्कर यांनी केली.



