
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश (MHT-CET) परीक्षा पूर्ववत करा…
मराठा महासंघाची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वैद्यकीय व अभियांत्रिकी तसेच इतर उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT-CET) घेतली जात होती. परंतू सन 2013 पासून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नीट (NEET) ही केंद्रीय प्रवेश परीक्षा सुरू करण्यात आली असून यांनी परीक्षेमध्ये आपल्या महाराष्ट्रातील हुशार होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे दिसत आहे. या परीक्षेमध्ये गैरप्रकार होत असून इतर राज्यातील मुले या जागेवर प्रवेश घेत असल्याने या परीक्षेच्या विश्वासार्हततेवर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT-CET) पूर्ववत चालू करण्यात यावी अशी मागणी मराठा महासंघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
यापूर्वी बाहेरील राज्यातील मुलांसाठी महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १५ टक्के इतका केंद्रीय कोटा होता. तो कोटा पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रातील मुलांना मेरिटनुसार प्रवेश दिला जात होता. तसे आता होताना दिसत नाही. नीट परीक्षेबाबत पालकांमध्ये कमालीची नाराजी आहे. शासनाने महाराष्ट्राच्या नावलौकिक टिकून रहावा याकरिता महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT-CET) पूर्ववत सुरू करावी अन्यथा आंदोलने घेतली जाते अशीही या पत्रात म्हटले आहे.
सदरचे पत्र आजरा तहसीलदार समीर माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असून यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण, देसाई शंकरराव शिंदे, गणपतराव डोंगरे, प्रकाश देसाई ,दत्तात्रय मोहिते, सुनील बावन्नावर, शिवाजी इंजल, संभाजी इंजल उपस्थित होते.

टोल प्रश्नी शुक्रवारी बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका टोलमधून मुक्त करावा यासाठी संकेश्वर- बांदा महामार्ग टोल मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने पाठपुरावा सुरू असून १० जूनला याबाबत मोर्चा काढण्याचे नियोजन होते. तहसिलदार यांच्या समवेत महामार्ग अधिकारी व समिती यांची बैठक झाली होती.टोलबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत टोल नाक्याचे उर्वरित काम बंद करण्याची समितीची मागणी महामार्ग अधिकारी यांनी मान्य केलेने मोर्च्याला तात्पुरती स्थगिती दिली होती.
टोलबाबत अद्याप महामार्ग व्यवस्थापनाचे कोणतेच धोरण न ठरल्याने पुन्हा एकदा समितीने बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता श्री. रवळनाथ मंदिराच्या माडीवर बैठक आयोजित केली आहे.या बैठकीत पुढील दिशा ठरणार आहे.या बैठकीला सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
उगवण क्षमतेसाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची : सुर्यकांत दोरुगडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उगवण क्षमता चांगली राहण्यासाठी व उत्पादन वाढीकरीता बीज प्रक्रिया महत्वाची आहे. शेतकऱ्यांनी दर्जदार प्रक्रियेकडे लक्ष द्यावे. असे आवाहन प्रगतशील शेतकरी व रिसोर्स फार्मर सूर्यकांत दोरुगडे यांनी केले.
देवकांडगाव (ता. आजरा) येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी दोरुगडे यांनी भात पीक शेती, बीज प्रक्रिया, भात रोपवाटीका व्यवस्थापन, जमिनीची मशागत, बियाणे निवड यासह विविध बाबीवर मार्गदर्शन केले. तालुक (आत्मा) सदस्या गीता देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
मरगुबाई महीला शेतकरी उत्पादक गट देवकांडगाव, कृषी विभाग यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने खरीप हंगाम भात पिक शेतीशाळा झाली.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्माचे) सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अमित यमगेकर यांनी स्वागत शेतीशाळा व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माहीती घ्यावी. त्याचा अवलंब आपल्या शेतीमध्ये करावा. श्री तंत्रज्ञानाबाबत माहीती दिली. जमिनीची मशागत, जमिन तयार करणे, भाताच्या विविध जाती, बियाणे निवड करणे, बीज प्रक्रिया याचे मार्गदर्शन केले. शेती शाळेमध्ये उपस्थितांना बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून माहीती देण्यात आली. जैविक निवीष्ठाचा वापर करण्याच्या पध्दतीबाबत सविस्तर माहीती दिली.
यावेळी अर्चना देसाई, रेखा परीट, सीमा पाटील, दीपमाला राणे, रेश्मा चव्हाण, सुमन गुरव, मंगल कांबळे महीला पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.अध्यक्षा स्वप्नाली राणे यांनी आभार मानले.

संच मान्यता धोरणाविरोधात आजऱ्यात बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संच मान्यता धोरणा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवार (ता. १५) धरणे आंदोलन केले जाणार आहे. याबाबत येथील प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांची आनंदराव नादवडेकर आजरा तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात बैठक झाली. धरणे आंदोलन व अन्य मागण्याबाबत या वेळी चर्चा झाली. प्राथमिक शिक्षक समितीचे आजरा तालुका अध्यक्ष एकनाथ आजगेकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
समितीचे पुणे विभागीय संपर्क प्रमुख सुनिल शिंदे प्रमुख उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, संच मान्यता धोरण हे अन्यायकारक आहे. या धोरणामुळे शिक्षकांवर गंडातर येणार आहे. ग्रामिण भागातील प्राथमिक शाळांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. गोरगरीब मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे सरकारचे धोरण आहे. हे धोरण हाणून पाडले पाहीजेत यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहीजेत. शनिवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात सर्वांचा सहभाग अपेक्षीत आहे. श्री. आजगेकर म्हणाले, शासनाच्या निर्णया विरोधातील धरणे आंदोलन यशस्वी करू या. हे धोरण कसे रद्द होईल यासाठी प्रयत्न करुया. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आनंदा पेंडसे, एकनाथ गिलबिले, महीला आघाडीप्रमुख अनुष्का गोवेकर, पतसंस्थेचे अध्यक्ष तुकाराम तर्डेकर, तालुका सरचिणीस सुभाष नाईक, सहचिटणीस लक्ष्मण सुतार, जिल्हा मार्गदर्शक सुभाष विभुते यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते
उपस्थित होते.
चेतन जाधवचे जेईई (JEE) ॲडव्हान्स परीक्षेत यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली (ता.आजरा) येथील चेतन दत्तात्रय जाधव याने जेईई ॲडव्हान्स परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे.१०६ गुण मिळवून अनुसूचित जाती प्रवर्गातून देशात ९५३ वा रँक मिळाला आहे.
जेईई (JEE) मेन मध्ये ९५.२० टक्के मिळवत त्याने जेईई ॲडव्हान्स परीक्षाही क्रॅक केली.युपीएससी नंतरची जेईई ॲडव्हान्स ही देशातील सर्वात कठीण दुसरी परीक्षा आहे.
चेतनच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


