mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 

आर्थिक संकटातील कारखाना वाचवूनच दाखवू : पालकमंत्री हसन मुश्रीफ

कानोली येथे राष्ट्रवादीची प्रचंड सभा

                     आजरा:प्रतिनिधी

       प्रचंड आर्थिक संकटात असलेला असलेला आजरा सहकारी साखर कारखाना वाचला तरच शेतकऱ्यांना न्याय आणि कामगारांचे कल्याण होईल. श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीला बहुमताने सत्ता दिल्यास कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना वाचवूनच दाखवू, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कानोली ता. आजरा येथे श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार के. पी. पाटील होते.

       भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, आजरा कारखान्याची या घडीची मालमत्तेसह किंमत १०५ कोटी रुपये आहे आणि कर्ज मात्र दीडशे कोटींच्या पुढे गेले आहे. हा कारखाना सावरायचा असेल तर सहवीज प्रकल्प आणि डिस्टिलरी उभी करावी लागेल. यासाठी या परिसराची फार मोठी अडचण आहे ती इको- सेंसीटीव्ह झोनची. ही बंदी उठविण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना भेटू. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा कारखाना कर्जमुक्त होईल आणि खऱ्या अर्थाने शेतकरी आणि कामगारांना न्याय मिळेल.

        आमदार राजेश पाटील म्हणाले, सहकारात चांगले काम करणाऱ्यांना ओळखा आणि श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीच्या पाठीशी रहा. आजरा साखर कारखान्याचे सहकाराचे श्रममंदिर सक्षम नेतृत्वाच्या हातात द्या. कर्जबाजारीपणामुळे एनपीएमध्ये गेलेला आजरा साखर कारखाना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठ्या पराकष्ठेने बाहेर काढला. आज विरोधक त्यांच्यावरच नको त्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांच्या नेतृत्वाखालीच आजरा स्वयंपूर्ण होईल.

      माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई,भाजपाचे जिल्हाध्यक्ष संग्रामसिंह कुपेकर, दिगंबर देसाई,राजू मुरकुटे,एम.के.देसाई, विष्णुपंत केसरकर यांचीही भाषणे झाली.

        सभेस जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, पंडित पाटील, शिवाजी पाटील, रमेश भोगन, परशुराम आपगे, दत्तात्रय भोगन, बाबुराव पाटील, संभाजी आपगे, शिरीष देसाई, जनार्दन बामणे, भिकू गावडे, अभयसिंह देसाई, गणपतराव सांगले विठ्ठलराव देसाई, धनाजी शिंदे, सौ.कामीना पाटील, डॉ. राजलक्ष्मी देसाई, संभाजीराव तांबेकर, राहुल शिरकोळे, अनिकेत कवळेकर, प्रभाकर देसाई, जनार्दन भोसले,शहाजी भोसले, बाबासाहेब गावडे, दत्तात्रय पाटील, मारुती पाटील, जयवंत सिंह देसाई यांच्यासह मान्यवर, सभासद व उमेदवार उपस्थित होते.

टीकेचा भडीमार…

कारखान्याची झालेली आर्थिक अवस्थेला व निवडणुकीमध्ये प्रा. सुनील शिंत्रे, श्रीमती अंजनाताई रेडेकर, अशोकअण्णा चराटी व जयवंतराव शिंपी यांची भूमिका व त्यांच्याकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर येथील सभेमध्ये आमदार के. पी. पाटील, विष्णुपंत केसरकर, दिगंबर देसाई, राजू मुरकुटे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

के.पीं.नी मनोरंजनासाठी इतरांवर आरोप करू नयेत : अभिषेक शिंपी


                     आजरा : प्रतिनिधी

      बिद्री साखर कारखान्याच्या विजयाची हवा के.पी. यांच्या डोक्यात गेलेली आहे. कुणीतरी नादान मंडळींनी दिलेले स्क्रिप्ट वाचून सभांमध्ये मनोरंजकाचे काम करु नये. त्यापेक्षा कारखान्यासमोरील वित्तीय अडचणींवर बोलावे असे आवाहन अभिषेक शिंपी यांनी के. पी. पाटील यांना केले आहे.

      राष्ट्रवादीच्या जाहीर सभांमधून के. पी. पाटील हे जयवंतराव शिंपी यांच्यावर करत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अभिषेक शिंपी बोलत होते.

      वास्तविक २००७ ते २०१० या कालावधीमध्ये अनंत अडचणींचा सामना करत तत्कालीन अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी कारखान्याची वाटचाल चालू ठेवली. कारखाना कामगार, ऊस उत्पादक, सभासद यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काही धाडसी निर्णय घेतले. या निर्णयाचे कौतुक तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही केले. अशा जयवंतराव शिंपी यांच्या बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार के. पी. पाटील यांना नाही.

      शिंपी चेअरमन असताना असणारे साडेतीन कोटी कर्ज आज कुठे जाऊन पोहोचले आहे याची जाणीव सभासदांना आहे. कारखान्याची वाताहात होण्यास के. पी. पाटील, हसन मुश्रीफ, बाबासाहेब कुपेकर हीच मंडळी जबाबदार आहेत. शिंपी यांच्याकडून कारखाना काढून घेऊन तो आपल्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात देणे, त्यानंतर क्रम पद्धतीने चेअरमन पदाची संधी देणे, ऊस वाढीकडे दुर्लक्ष करणे व केवळ कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी कारखान्याची दुर्दशा करणे यापलीकडे या मंडळींनी कोणतेच काम केलेले नाही.

      आज कारखान्याची जी अवस्था आहे त्याला सर्वस्वी ही नेतेमंडळीच जबाबदार आहेत असा आरोपही शिंपी यांनी केला. ज्यांचा केवळ राजकारण हा धंदा आहे, इतर कोणताही उद्योग नाही व कारखान्यात उसाऐवजी कारवी आणून घाला म्हणणा-या मंडळींच्या वारसांनी हे प्रकारात थांबवावेत असा उपरोधिक सल्लाही दिला.

मनसे जनहित पदाधिकारी नियुक्ती जाहीर

                   आजरा:प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार,मनसे प्रदेश सरचिटणीस व जनहित अध्यक्ष किशोर शिंदे,कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख जयराज लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे जनहित कक्ष पदाधिकारी नियुक्ती कोल्हापूर जिल्हाध्यक्ष परशुराम बामणे (भाऊजी) यांनी आज जाहीर केली.

सौ.पूनम संजय भादवणकर-परुळेकर.
कोल्हापूर जिल्हा संघटक (ग्रामीण)

श्री.रिक्सन डिसोझा.
आजरा तालुका अध्यक्ष

श्री.प्रशांत सुरेश गजरे (साजन्नवार)
आजरा शहर अध्यक्ष

सौ.शोभा युवराज कांबळे.
आजरा शहर संघटक

श्री.सागर कांबळे.
आजरा तालुका उपाध्यक्ष

सौ.वर्षा चव्हाण.
आजरा तालुका संघटक

सौ.वर्षा जोतिबा पाटील.
आजरा तालुका उपसंघटक

सौ.दिक्षा सूर्यकांत भादवणकर.
बुरुडे शाखा संघटक

सौ.दीपाली दिगंबर सामंत.
चंदगड तालुका संघटक

        यावेळी मनसेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

बनावट सोने ठेवून २१ लाखांचा चुना

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!