
आजऱ्याजवळ अपघातात तरुण ठार

आजरा : प्रतिनिधी
आजरा -आंबोली मार्गावर हॉटेल सरकार समोर झालेल्या दुचाकी अपघातात पंकज शिवाजी पाटील (वय २८, रा. मुरुडे, ता. आजरा) या तरूण जागीच ठार झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, पंकज हा (पणजी, गोवा) येथे खाजगी कंपनीत मार्केटींगचे काम करत होता. शनिवारी सांयकाळी सुट्टीनिमित्त तो गावी मुरुडे येथे परतत असताना त्याची हॉटेल सरकारसमोर ४०७ वाहनाची बाजू काढताना समोरून येणाऱ्या रिक्षाला जोराची धडक बसली. या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील आजारा साखर कारखान्याला कामाला आहेत.
पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील माहिती घेत आहेत.
दहा दिवसात दुसरा अपघात
दहा दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या अपघातात हळोली येथील दत्तात्रय गोवेकर यांचा मृत्यू झाला होता.आज पुन्हा याच परिसरात हा अपघात झाला.


