mrityunjaymahanews
अन्य

BREAKING NEWS

 


भादवण येथील तो प्रकार खूनच…?
गळा आवळून खून केल्याचा संशय.

 

 

आजरा :प्रतिनिधी

 

भादवण ता. आजरा येथे उसाच्या फडात जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडलेल्या श्रीमती आशाताई मारुती खुळे या ४२ वर्षीय महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न होत असून पोलिसांनी याप्रकरणी एका स्थानिक ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतल्याने भादवण पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

 

आजरा तालुक्यातील भादवण जवळ काल गुरुवारी जळालेल्या ऊसाच्या फडात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात सदर मृतदेह हा गावातीलच आशाताई मारुती खुळे या महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले.

 

याबाबत पुढे येत असलेली माहिती अशी की…

भादवण व भादवणवाडी रस्त्यावर दीपक खुळे, आनंदा देवरकर यांच्या उसाच्या शेताला गुरुवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान आग लागली.ती विझविण्यासाठी ग्रामस्थ गेले असता त्या ऊसात आशाताई खुळे या महिलेचा जळालेला मृतदेह आढळला.

सुरुवातीला जरी ऊस जळाल्याने सदर महिला मृत पावली असल्याचे दिसत असले तरी यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. ऊस कशामुळे जळाला व ती महिला तेथे कशी ? ऊस पेटला की पेटवला ? असे विविध प्रश्न उपस्थित होत होते.

गुरुवारी रात्री उशिरा या घटनेची नोंद आजरा पोलिसात झाल्यानंतर पोलीस खात्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. अखेर आज  पोलिसांनी अधिक चौकशी व स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळवली असता हा प्रकार घातपाताचा असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

एका विवाहित ट्रॅक्टर चालक संशयितास पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्याने  शारीरिक संबंधाला नकार दिल्याने खुळे यांचा गळा दाबून खून करून संपूर्ण उसाचा फड पेटवल्याचेही पोलीस तपासात पुढे येत आहे.

श्वानपथकाला तैनात करण्यात आले असून पुढील तपासाची चक्रे वेगावली आहेत.

 

विभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी देखील भादवण येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

Admin

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

‘ उचंगी ‘चे उद्या (शुक्रवारी) पाणीपूजन… माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील,हसनसो मुश्रीफ यांच्यासह मान्यवर उपस्थित रहाणार…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!