mrityunjaymahanews
कोल्हापूर

जिल्हा बँकेकरीता कोणी केलं शक्तिप्रदर्शन?… कोणाची होणार बिनविरोध निवड?जरूर पहा

 

जिल्हा बँकेसाठी अशोकअण्णा चराटी यांचे शक्तिप्रदर्शन

जिल्हा मध्यवर्ती बँकेकरीता आजरा तालुक्यातील विकास सेवा संस्था गटातून शक्तीप्रदर्शनाने आज विद्यमान संचालक अशोकअण्णा चराटी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.जि.प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ.अनिल देशपांडे, डॉ. दीपक सातोस्कर, विजयकुमार पाटील, विलास नाईक, दशरथ अमृते, मनीषा गुरव, आज-याचे उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, किरण कांबळे, अभिषेक शिंपी यांच्यासह त्यांच्या ठरावधारक मतदारांना सोबत घेऊन त्यांनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. चराटी यांच्या या शक्ती प्रदर्शनानंतर पुन्हा एकवेळ तालुक्यांमध्ये मतदानाची गोळाबेरीज सुरू झाली आहे.

 तर…. उचंगी  प्रकल्पावर पाय ठेवू देणार नाही :प्रकल्पग्रस्तांचा इशारा

उचंगी प्रकल्पा बाबत पुनर्वसनाच्या अनुषंगाने विशेष कॅम्पचे आयोजन केले होते. या वेळी आजरा भुदरगडच्या प्रांताधिकारी श्रीमती वसुधा बारवे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. तहसीलदार विकास अहिर, शाखा अभियंता विजयसिंह राठोड, कनिष्ठ अभियंता पाटील उपस्थित होते. पुनर्वसन संकलन यासह विविध मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली.श्रीमती बारवे म्हणाल्या, उचंगीच्या ८९ प्रकल्पग्रस्तांना जमिन, ५१ प्रकल्पग्रस्तांना विशेष पॅकेजचे वाटप केले आहे. ७४ प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप शिल्लक आहे. ४१ प्रकल्पग्रस्तांनी अद्यापही पॅकेज व जमिनीसाठी अर्ज दिलेला नाही. शिल्लक जमिनी व आर्थिक पॅकेजचे नियोजन केले जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. निर्वाह क्षेत्राचा मुद्दा उपस्थित करून प्रकल्पग्रस्तांना जमिन नाकारली गेली आहे. त्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा. त्याचबरोबर संकलन रजिस्ट रची दुरुस्ती करावी. दोन मीटर उंचीचा निर्णय अद्याप स्पष्टपणे प्रकल्पग्रस्तांसमोर मांडला गेलेला नाही. विविध नमुन्यामध्ये कायदेशीर रित्या अर्ज केलेले आहेत. त्या शेतकऱ्यांची ६५ टक्के रक्कम भरून घ्यावी. प्रकल्प बाधीत व्यक्ती पुनर्वसन अधिनियम १९९९ या पुनर्वसन कायद्याची अमलबजावणी होत नाही. तोपर्यंत धरणावर पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका प्रकल्पग्रस्तानी घेतली. उपस्थित अधिकाऱ्यांनी धरणाचे काम सुरु करण्यास दयावे अशी विनंती केली. प्रशासनाने बळाचा वापर केल्यास जशास तसे उत्तर देवू अशी भूमिकाही यावेळी प्रकल्पग्रस्तांनी घेतली.
चाफवडे येथील गावठाणमधील सात घरांचा प्रश्न सरपंच विलास धडाम यांनी मांडला. प्रकल्पाच्या सुरवातीच्या काळात मूल्यांकन झाले होते. त्या रहिवाशांच्या घरांची नुकसान भरपाई दयावी. त्यांना निवासी भूखंडमध्ये पात्र ठरवावे अशी मागणी केली. गावठाण लगतची गट नंबर मधील जी घरे प्रत्यक्ष बुडीत जातात त्यांना निवासी भूखंड पुनर्वसन वसाहतीमधे मिळावेत. खडकाळ जमीनचे ज्या प्रकल्पग्रस्तांना आदेश झालेत पण ती जमिन पिकाऊ नाही व त्यांनी स्विकारलेली नाही त्यांचे आदेश रद्द करावे अशी सूचनाही श्री. धडाम यांनी मांडली. चाफवडेचे उपसरपंच संजय भडांगे यांनी सूचना मांडली. चितळेचे सरपंच मारुती चव्हाण, प्रकाश मस्कर, सुरेश पाटील, नारायण भडांगे, दशरथ घुरे, जयवंत सरदेसाई, धनाजी शिंदे, प्रकाश देसाई, उत्तम देसाई, धनाजी दळवी, सुरेश पाटील, मारुती गुरव यासह धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

आजरा आगाराचे चार चालक व सहा वाहक कामावर हजर

एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरूच असून आजरा आगारातील तब्बल १५० वाहक व चालकापैकी केवळ ४ चालक व ६ वाहक आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर कामावर रुजू झाले. आज आठवडा बाजाराचा दिवस असल्याने आजरा- गडहिंग्लज, आजरा-देव कांडगाव, आजरा- किटवडे, आजरा-दाभिल मार्गावरच बसफेऱ्या सुरू राहिल्या. अद्यापही बहुतांशी चालक-वाहक कामावर हजर नसल्याने तालुक्यातील इतर गावागावांमध्ये बसफेऱ्या सुरू होण्याबाबत अनिश्चितता आहे. आगाराकडून कोणतीही भूमिका स्पष्ट नसल्याने व एसटी बस फेऱ्यांचे वेळापत्रक नसल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण कायम आहे.

जिल्हा बँकेकरीता गृहराज्यमंत्री सतेज पाटील बिनविरोध…..?

जिल्हा मध्यवर्ती बँकेेकरीता गगनबावडा तालुक्यातून विकास सेवा संस्था गटातून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. माघारीच्या प्रक्रियेनंतर यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.६ डिसेंबर पर्यंत अर्जांची छाननी होणार असून २१ डिसेंबर ही माघारी ची अंतिम तारीख आहे. सध्यागगनबावडा तालुक्यातून दाखल झालेले इतर दोन अर्ज हे पाटील यांना डमी अर्ज म्हणून दाखल झाले आहेत. त्यामुळे गृृहज्यमंत्री पाटील यांची निवड बिनविरोध समजली जाते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजऱ्यात जिल्हा बँकेचा धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

वाटंगी येथील अल्पवयीन मुलीचे आजऱ्यातून अपहरण… देशी दारू विक्री करताना मडिलगे येथे एकास ताब्यात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!