mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

दि. १७ सप्टेबर २०२४


वाटंगी, अर्जुनवाडी भागात हत्तीचा धुमाकूळ

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा,गडहिंग्लज तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या वाटंगी, अर्जुन वाडी, कानडेवाडी भागात हत्तीने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सुरू आहे.

     नेसरी- आजरा सीमेवर अर्जुनवाडी, चाळोबा जंगलात टस्कराने मुक्काम ठोकला आहे. दररोज ऊस, भात, नागली पिकाचे नुकसान सुरू आहे. सिरसंगी, एमेंकोड परिसरात जून महीन्यात गेलेला टस्कर अद्याप परतलेला नाही. गेले चार महीने येथील जंगल परिसरात टस्कर वावरत आहे. अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे राजाराम वाईगडे, कानडेवाडी येथील सावतवाडी (गावठाण) येथे विठ्ठल सासुलकर यांच्या पाण्याच्या तीसभर टाक्या फोडल्या आहेत. ऊस, भात पिकाचे नुकसान करीत आहेत. वाटंगी येथील शामराव बाबू नांदवडेकर यांच्या भात पिकाचे त्यांने नुकसान केले आहे. या आठ दिवसात भात, नागली, ऊस पिकाचे नुकसान करीत आहे.

     लवकरच शेतकऱ्यांची सुगी सुरू होणार असून तत्पूर्वी या हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

‘रोजरी शाळा ‘ ठरली तालुक्यात अव्वल

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      रोजरी इंग्लिश स्कूल, आजरा ने “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या राज्यस्तरीय स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळांचे स्वच्छता, पर्यावरणीय जाणीव, सौंदर्य करण्यासंदर्भात जनजागृती, गुणवत्ता विकास, राज्य व राष्ट्रीय शिष्यवृत्ती तसेच शालेय, सहशालेय उपक्रम हे उत्तम प्रकारे प्रशालेने राबविले होते.

     या अभियानामध्ये टप्पा क्रमांक दोन मध्ये प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावून तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. रोजरी स्कूल जिल्हास्तरीय मूल्यांकनसाठी पात्र ठरली आहे. मुख्याध्यापक मनवेल बारदेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक विजय केसरकर, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा समिती सदस्य शैलेजा कांबळे, लक्ष्मी पाटील, स्टीफन डिसोजा, आशिष फर्नांडिस व फादर मेलविन पायस यांच्या सहकार्याने शाळेने यश प्राप्त केले आहे. प्राचार्य फादर अँथोनी डिसूजा यांचे प्रोत्साहन मिळाले .

बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ची आजरा तालुक्याची नूतन कार्यकारणी जाहीर

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या नूतन पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आलीआहे.

        कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:-

आजरा तालुका अध्यक्ष जीवन शेवाळे (पोळगाव )
कोषाध्यक्ष – दत्तात्रय कांबळे उर्फ डी. के. ( कोरीवडे ).                                   रचिटणीस – भिकाजी कांबळे ( कासार कांडगाव )

        यावेळी जिल्हा अध्यक्ष एस. व्ही. ऐनिकर , बिद्री साखर कारखाना माजी संचालक, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष, सुनील कांबळे , चंदगड जिल्हा निरीक्षक भारत कांबळे शिप्पुरकर, जिल्हा कार्यालयीन सचिव तानाजी राजवर्धन, बौद्धाचार्य भुदरगड पदाधिकारी सुशीलकुमार प्रज्ञावंत हे उपस्थित होते.

रोजगाराची हमी…
क्षरा कॉम्प्युटर्स


      आजरा शहरातील अक्षरा कॉम्प्युटर्स या संगणक प्रशिक्षण संस्थेच्या ६५ पेक्षा जास्त विदयार्थ्यांचे मुंबई-पुणे व इतर शहरांतील विविध कंपन्यांमध्ये / संस्थांमध्ये गेल्या १९ महिन्यात जॉइनिंग झाले आहे. यापैकी २५ विदयार्थी हे अकाउंटंट तर बाकीचे सर्व बँक-ऑफिस या पदावर यशस्वीरीत्या कार्यरत आहेत.

      श्री. आनंदा गणपत ढोणुक्षे रा. चितळे-भावेवाडी हे या ट्रेनिंग इन्स्टीटयुट चे संस्थापक असून ते स्वतः प्रत्येक विदयार्थ्याला प्रशिक्षण देतात व मार्गदर्शन करतात इन्स्टीटयुट मध्ये टॅली, ॲडव्हान्स्ड एक्सेल, सी.सी.सी. व खाजगी टायपींग हे कोर्सेस अगदी कमीतकमी फी मध्ये शिकवले जातात.

     संस्था चालू करण्यापूर्वी आनंदा हे मुंबई स्थित रॉयल बैंक ऑफ स्कॉटलन्ड या आंतरराष्टीय बैंकेत एच आर व फायनान्स डिपार्टमेंट मध्ये दहा वर्षे कार्यरत होते. तसेच त्यानी मुंबई विदयापीठातून ‘बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ ही पदवी प्राप्त केली आहे.

      नोकरी सोडून आपल्या अनुभवाचा व शिक्षणाचा फायदा ग्रामीण भागातील तरुण पिढीला व्हावा या उद्देशाने त्यांनी ही संस्था २०१८ मध्ये चालू केली व हे तरुण पीढी घडवण्याचे कार्य गेली ६ वर्षे निरंतर चालू आहे. (Advt )

तालूक्यात हिंदी दिन उत्साहात


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा तालुक्यातील आजरा हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, देवर्डे हायस्कूल यासह तालुक्यातील सर्व शाळा, हायस्कूल, महाविद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

       व्यंकटराव हायस्कूलमध्ये हिंदी दिनानिमित्त मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला प्रशालेचे प्राचार्य आर. जी. कुंभार यांचे हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका व्ही.जे शेलार, हिंदी विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी भाषण ,कविता, समूहगीत इत्यादी कार्यक्रम पार पडले.डी. आर. पाटील यांनी मुन्शी प्रेमचंद यांचा जीवन परिचय करून दिला.प्राचार्य आर. जी. कुंभार यांनी आपल्या मनोगतामध्ये हिंदी विभागाला शुभेच्छा देऊन सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.आभार साक्षी कांबळे यांनी मानले.

      देवर्डे येथील श्री रवळनाथ हायस्कूल विद्या मंदिर शाळेत हिंदी दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुभाष सावंत होते प्रास्ताविक स्नेहा कांबळे या विद्यार्थिनीने केले. गौरी बागडी, दिव्या चाळके यांनी भाषणे केली. हिंदी दिनाची माहिती शिक्षक राजेंद्र पाटील, देवेंद्र शिखरे,चंद्रकांत घुरे यांनी सांगितली यावेळी हिंदी दिनाची भित्तीपत्रके लावण्यात आली होती या प्रसंगी मुख्याध्यापक विनायक आमणगी, सुनील पाटील, महादेव तेजम, महेश नावलगी, रेश्मा बोलके, सरोजिनी कुंभार या शिक्षकासह विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन सानिका केसरकर तर आभार श्रेया तानवडे हिने मानले.

      आजरा हायस्कूलमध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साह संपन्न झाला.’हिंदी साहित्य के भक्तीकालीन अनमोल रत्न’ या संतांशी संबंधित भितीपत्रकाचे उ‌द्घाटन मुख्याध्यापक एस. पी. होलम यांच्या हस्ते झाले. या भितीपत्रकाची माहिती टी.एस. पाटील यांनी दिली.

      यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

निधन वार्ता…
शिवाजी घंटे

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     मडिलगे ता. आजरा येथील लाकूड व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक शिवाजी शंकर घंटे ( वय ६१ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सहा विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

      मनसेचे तालुका अध्यक्ष आनंदा घंटे यांचे ते चुलते होत.

गणेश दर्शन 


 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा अर्बन बँकेची वार्षिक सभा उत्साहात…

mrityunjay mahanews

अखेर पेरणोली-हरपवडे धनगरवाडा “प्रकाश’मय

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!