mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


आणखी एक आत्महत्या..‌.

       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        आजरा तालुक्यामध्ये आत्महत्यांचे सत्र सुरूच असून काल शुक्रवारी पारेवाडी येथील सुभाष रामचंद्र निर्मळे ( वय ४३) यांनी रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

        आजरा येथे विमा कंपनी कार्यालयात शिपाई म्हणून कामावर असणारे निर्मळे यांनी शुक्रवारी दुपारी साडेचार ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दारूच्या नशेत अज्ञात कारणाने सदर आत्महत्या केली असल्याचे पोलीस नोंदीत म्हटले आहे.

       त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व वडील असा परिवार आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्ता शिंदे पुढील तपास करीत आहेत.

पेरणोलीत आढळला तरुणाचा मृतदेह


       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      पेरणोली ता.आजरा येथील जयवंत येरुडकर यांच्या काजू बागेत विक्रम बाळासो जाधव/कोरवी (वय २८) रा. प्रजापिता कॉलनी आजरा याचा मृतदेह आढळला.शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

        याबाबतची नोंद आजरा पोलिसात झाली आहे. आकाश बाळासो जाधव/कोरवी याने वर्दी दिली आहे. विक्रम याचा मृत्यू अति मद्यप्राशन केल्यामुळे झाल्याची नोंद आहे.

       पोलीस अंमलदार श्री.पांडुरंग यलकर अधिक तपास करत आहेत.

दुचाकी स्वाराची कोल्ह्याला धडक… कोल्ह्यासह दुचाकी स्वार जखमी

        आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        पोळगाव-विटे मार्गावर दुचाकीवरून विट्याच्या दिशेने चाललेल्या रामदास बाळासो पाटील (वय ३५,रा.अत्याळ ता.गडहिंग्लज ) यांच्या दुचाकीची रस्ता ओलांडणाऱ्या कोल्ह्याला धडक बसून ते दुचाकीवरून बाजूला पडून जखमी झाले आहेत. यामध्ये कोल्हाही जखमी झाला आहे.

      शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाटील हे विटे गावच्या दिशेने चालले होते. दरम्यान रस्ता ओलांडणाऱ्या कोल्ह्याला त्यांची दुचाकी जोरात धडकली. यामध्ये रामदास हे जखमी झाले परंतु त्याचबरोबर कोल्हाही गंभीर जखमी झाला आहे. रामदास यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अखेर गटरचा स्लॅब काढला

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

         राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून
सिद्धिविनायक कॉलनीत जाण्यासाठी असलेले गटारावरील स्लॅबच्या बाबतीत बऱ्याच तक्रारी आल्या होत्या या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हायवेचे ब्रिज बांधणारे इंजिनीयर श्री राजेंद्र सिंग राजपूत व् अल्मास असलम यांना बोलवून घेऊन सदरचे गटरच्या बाबतीत अन्याय निवारण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.

       श्री. राजपूत यांनी तातडीने सदर स्लॅब काढून घेऊन य आता नऊ इंच स्लॅब व मजबूत बनवत आहोत त्याच्यावरून ७५ ते ८० टनाची गाडी जरी गेली तरीही काही होणार नाही अशी हमी दिली.

        महामार्गाचे पूल बांधणीचे इंजिनियर यांच्याशी चर्चा करण्यात आली.यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, गौरव देशपांडे, राजू विभुते सचिन इंदलकर, महादेव सुतार उपस्थित होते.

छायावृत्त…

     गडहिंग्लजचे नूतन उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांचा आजरा तालुका कोरवी कैकाडी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दुंडाप्पा कोरवी ,लहू कोरवी,संजय कोरवी, महादेव कोरवी, परसु कोरवी, संजय कोरवी यांच्यासह आजरा येथील कोरवी कैकाडी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तीन महाविद्यालयीन तरुणींवर गव्याचा हल्ला.. दोघी जखमी .. आजरा तालुक्यातील घटना

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मुदत संपत आली :  कामांची पूर्तता करा…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!