mrityunjaymahanews
अन्य

पोळगाव येथील तरुणाची आत्महत्या


पोळगाव येथील तरुणाची आत्महत्या

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

     पोळगाव ता. आजरा येथील तुषार प्रकाश खामकर या वीस वर्षीय तरुणाने दिवे ,मुंबई येथे सोमवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तुषार हा दिवे, मुंबई येथे राहत होता. त्याच्यासोबत आई व भाऊही राहत असे. आई व भाऊ कामानिमित्त बाहेर गेली असता तुषार याने गळफास घेतला. 

      आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

तिसऱ्या डोळ्याची उघडझाप सुरू…

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        सध्या देशभर लोकसभा निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे. या निवडणूक पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. आजरा पोलिसांनी रूट मार्चसह खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. हे सर्व सुरू असताना शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. वास्तविक या कालावधीत संवेदनशील अशा ओळख असणाऱ्या आजरा शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची गरज आहे.

        आजरा शहरातील संभाजी चौकातून पुढे गोव्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते.या वाहतुकीच्या माध्यमातून अनेक वेळा गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक, लहान-मोठे अपघात यासह विविध छोट्या-मोठ्या कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या गोष्टी घडत असतात. शहरातील कांही कॅमेरे बंद असल्याने बऱ्याच वेळा स्थानिक व्यापारी वर्गाची सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी मदत घ्यावी लागते. यामध्ये व्यापारी वर्गाचा वेळ जात असल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानापुरते अथवा व्यवसायापूरतेच मर्यादित अशा स्वरूपाचे कॅमेरे बसवले आहेत. मध्यंतरीच्या काळात बंद असणारे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात आले होते. परंतु अद्यापही काही ठिकाणचे कॅमेरे बंद अवस्थेत आहेत.

       अचानक एखादी घटना घडल्यास सीसीटीव्ही कॅमेरे हा गुन्हेगार शोधण्याचा,तपासाचा प्रमुख दुवा ठरत असताना शहरातील काही भागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत ते तातडीने सुरू करून घेण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे.

रवळनाथ कॉलनीची होळीसह धुळवड दणक्यात

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        आजरा येथील शिव कॉलनी, रवळनाथ कॉलनी आयडियल कॉलनीतील होळी पूजन व धुळवड दणक्यात पार पडली. होळी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

        धुळवडीदिवशी बाल- गोपाळांसह कॉलनीवाशीयांनी धुळवडीचा आनंद लुटला. होम मिनिस्टर सह संगीत खुर्ची व विविध स्पर्धांचे नेटके आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन परशुराम बामणे, पांडुरंग सावरतकर ,संभाजी हरेर,अनिल पाटील,सुभाष कांबळे,अमित ढवळ यांच्यासह स्थानिक मंडळींनी केले.

होळीनिमित्त गावाची स्वच्छता

पोश्रातवाडीकरांचा उपक्रम

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        आजरा तालुक्यातील पोश्रातवाडीकरांनी गावातील सार्वजनिक विहिरीची स्वच्छता व परिसराचे स्वच्छता करून अनोख्या पद्धतीने होळी व धुळवड सण साजरा केला.
गावातील एका सार्वजनिक विहीरीचा वापर गावातील सर्व ग्रामस्थ कपडे धुण्यासाठी व जनावरांसाठी करत असतात या विहिरीच्या आजूबाजूला झाडे झुडपे वाढून विहीरीजवळ जंगल तयार झालं होतं त्याची सर्व ग्रामस्थांनी धुलीवंदन निमित्त एकत्र येऊन सर्व स्वच्छता केली. यावेळी ग्रामस्थांनी ग्रुप ग्रामपंचायतीने लक्ष घालून या विहिरीची गावातील सार्वजनिक विहिरींचे गाळ काढणे व स्वच्छता करावी अशी मागणी केली.

        या सामाजिक कार्यात आजरा तालुका संघाचे संचालक जयराम संकपाळ, पोश्रातवाडी गावचे पोलीस पाटील युवराज देसाई ,राकेश शिंदे ,नागेश शिंदे ,महादेव सावंत ,दीपक नाईक, बाळू नाईक तानाजी देसाई ,लक्ष्मण देसाई, ज्योतिबा शिंदे ,परशराम शिंदे गोपाळ शिंदे ,सदाशिव नारळकर नाना चौरे , राहुल भिकले अथर्व संकपाळ ,केशव देसाई ,महादेव नाईक व महिलांचे सहकार्य लाभले.

होळीची पोळी गरजूंना
आज-यात उपक्रम

        आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       होळीच्या नैवेद्यासाठी पेटत्या होळीत पोळी टाकण्याच्या परंपरेला बगल देत त्या एकत्र करुन येथील स्थानिक तरुणांनी आजूबाजूच्या गरीब व गरजू कुटुंबांना पोळी दान करण्याचा उपक्रम यावर्षीही राबवला .

      याकरिता आकाश पाटील, सुभाष कांबळे, तसेच आजरा महाविद्यालयाचे प्रा ठोंबरे, रवळनाथ कॉलनी प्रणित मराठा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

निवड…
उत्तम देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      पेरणोली त्या.आजरा येथील उत्तम देसाई यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या आजरा तालुका  उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

      त्यांच्या निवडीसाठी आम.सतेज पाटील, राष्ट्रीय काँग्रेस राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक सचिन घोरपडे यांचे सहकार्य लाभले. यावेळी जेष्ठ नेते एस.एम.पाटील , खानापूर चे माजी सरपंच भुजंगराव मगदूम ,कडगाव चे उपसरपंच बाबासाहेब देसाई ,संदीप चोडणकर,दिपक देसाई ,सुशांत ,  यसुफ मुल्ला, नेताजी पाटील,दीपक देसाई, भाऊसो देसाई,आनंद कदम,चंदू गुरव,प्रताप देसाई,उत्तम भालेकर,संदेश कळेकर, पांडुरंग देसाईं,,गंगाराम डेळेकर, महम्मद मुजावर,मानसिंग चव्हाण,विश्वास कोडक उपस्थित होते.

छायावृत्त…

       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथील मिरची बाजार परिसरातील उर्दू हायस्कूलच्या शेजारील गटर्स पूर्णपणे तुंबून गेल्या असून स्वच्छतेअभावी येथे दुर्गंधी पसरली आहे. स्थानिक नागरिकांकडून या गटर्सची स्वच्छता करण्याची मागणी वेळोवेळी केली जात असूनही या मागणीकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking news

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात राष्ट्रवादीचे मंत्री मुश्रीफ यांच्या फेर्‍या वाढल्या… कार्यकर्ते फुल रिचार्ज… जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मंत्री मुश्रीफ यांना मिळणार संधी…?

mrityunjay mahanews

आजरा अर्बन बँकेला १० कोटी ८१ लाख रु.नफा.

mrityunjay mahanews
error: Content is protected !!