mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


आजाराला कंटाळून मुलीची आत्महत्या किटवडे धनगर वाड्यावरील प्रकार

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

         आजाराला कंटाळून दोन दिवसापूर्वी कीटकनाशक प्राशन केलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे धनगरवाडा येथील कु. ताईबाई धूळू कोकरे या पंधरा वर्षीय शाळकरी मुलीचा उपचारादरम्यान बांबोली ( गोवा ) येथे काल रविवारी मृत्यू झाला.

      याबाबत कीटवडे ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी की कु. ताईबाई ही गेले वर्षभर आजारी होती. तिच्यावर गडहिंग्लज,कोल्हापूर सह ठिकठिकाणी उपचार सुरू होते. या आजाराला कंटाळून तिने शनिवारी राहत्या घरी कीटकनाशक प्राशन केले. उपचारासाठी तिला अनुक्रमे आंबोली, सावंतवाडी व त्यानंतर बांबोली येथे हलवण्यात आले. परंतु तिची मृत्युशी  झुंज अपयशी ठरली.उपचारादरम्यान रविवारी तीचे निधन झाले. ऐन होळी दिवशी कोकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या या प्रसंगामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

        सामान्य कुटुंबातील ताईबाईच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी ,दोन भाऊ असा परिवार आहे. रविवारी सायंकाळी उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आजऱ्यातील तरुणाचा विहीरीत बुडून मृत्यू

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथील जिजामाता कॉलनी मध्ये राहणाऱ्या मुसद्दीक आयुब काले या १८ वर्षीय तरुणाचा हरपवडे येथे विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

       मुसद्दीक हा हरपवडे येथे रमजान महिन्यात नमाज पठण करण्याचे काम करत असे. येथील दिलीप गुरव यांच्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. विहीरीत गाळ असल्याने पोहता न  आल्याने  त्याचा मृत्यू झाला.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच बकऱ्यांचा मृत्यू

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       शिवाजीनगर /नबापूर गल्लीतील नागेश सुनील भुईंबर यांच्या बकऱ्यांच्या पिल्लांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.यात ५ पिल्लांचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही घटना घडली.

       नेहमीप्रमाणे भुईंबर कुटुंबीयांनी शिवाजीनगर घाट परिसरात  बकरी चरण्यासाठी  सोडली होती.नागेश भुईंबर यांची आई पाला आणायला गेल्या होत्या त्याच दरम्यान सुमारे १५ कुत्र्यांच्या कळपाने या बकऱ्यांवर हल्ला केला. पिल्ले होती यातील ५ दोन बकरी मृत पावली तर अन्य दोन जखमी आहेत.

      आजऱ्यात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव सुरू असून भटक्या कुत्र्यांचा नगरपंचायतीने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा एकवेळ ऐरणीवर आली आहे.

अन्यथा आम्ही तुमचा बंदोबस्त करू…

           वारंवार मागणी करूनही नगरपंचायतीकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने सर्वसामान्यांचे यामध्ये नुकसान होत आहे. आज बक-यांच्या जीवावर बेतले आहे. उद्या हाच प्रकार लहान मुले व महिलांच्या बाबतीत घडू शकतो. नगरपंचायतीने तातडीने याबाबत सकारात्मक कारवाई न केल्यास नगरपंचायतीचा बंदोबस्त आम्ही करू अशी प्रतिक्रिया माजी ग्रामपंचायत सदस्य विजय थोरवत यांनी घटनेनंतर बोलताना दिली.

व्यंकटराव हायस्कूलमध्ये शहीद दिन साजरा.

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       व्यंकटराव हायस्कूलमध्ये शहीद दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या शहिदांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांच्या व्यक्तिचित्रांचे रांगोळीच्या रूपात रेखाटन शलाका गिरी व रिया देशमुख या विद्यार्थिनीनी केले .शहिदांच्या व्यक्तिमत्त्वांच्या जीवन प्रसंगावर आधारित ‘स्वातंत्र्यासाठी शहिदांचे बलिदान’ या विषयावरील नाटक बालकलाकार ईशान मोटे, प्रेम येसणे,यशराज कुंभार,सुयश देसाई, शार्दुल आजरेकर, संस्कार पापरकर, कार्तिक हुबळे आणि अंशुमन भोसले या विद्यार्थ्यांनी सादर केले.

        कल्पक सुतार, अंशुमन भोसले, प्रणव पाटील, सृष्टी नाईक, ऋषा देसाई, स्वरा दोरुगडे या विद्यार्थ्यांनी स्वतः रेखाटलेल्या शहिदांच्या व्यक्तिमत्त्वांच्या रेखाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या निमित्ताने प्रणव पाटील,वेदिका केदारगोळ,अंशुमन भोसले, संस्कार पापरकर, सिमरन पाटील यांनी शहीद दिनाचे महत्त्व व विविध शहिदांच्या जीवनचरित्राचा कालपट विद्यार्थ्यांसमोर भाषणातून उलगडला.

       रिया देशमुख या विद्यार्थिनीने शहिदांच्या जीवनचरित्राविषयीची कविता काव्यगायनातून सादर केली.प्राचार्य आर. जी. कुंभार यांनी शहीद दिनाचे महत्त्व व शहिदांविषयीचे आपले विचार व्यक्त केले. रांगोळी रेखाटण्यासाठी कलाशिक्षक के.ए.दावणे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचा समारोप शलाका गिरीच्या देशभक्तीपर गीत गायनाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती नरके व सिमरन पाटील यांनी केले.

       कार्यक्रमासाठी प्राचार्य  आर.जी.कुंभार,पर्यवेक्षिका व्ही.जे.शेलार,प्रशांत गुरव, सर्व शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

निवड…
सौ.जयश्री कळेकर

    आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

     उचंगी-श्रृंगारवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. जयश्री संदेश कळेकर यांची नुकतीच निवड झाली आहे. सरपंच समीर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदर निवड करण्यात आली यावेळी ग्रामसेवक देसाई यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

१६ फेब्रुवारी नंतर येणाऱ्या उसाला आजरा साखर कारखान्याकडून ५० रुपये प्रति टन इन्सेंटिव्ह…. आज-यात बुधवारी व गुरुवारी ऊरुस… कोरोना अपडेटस..

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

हत्तीच्या हल्ल्यात वन कर्मचारी ठार…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!