



कारखाना हितासाठी बिनविरोधसाठी प्रयत्नशील
शिंपी,चराटी, शिवसेना,स्वाभिमानी व रेडेकर गटाची पत्रकार बैठक

आजरा:प्रतिनिधी
आजरा साखर कारखाना सद्यस्थितीत आर्थिक अडचणीत आहे. चालू कारखाना बंद ठेवणे शेतकरी व कामगारांच्या दृष्टीने हिताचे नाही. कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया राबवली गेल्यास सुमारे ६० लाख रुपये इतका अतिरिक्त बोजा कारखान्यावर पडणार आहे अशावेळी श्री चाळोबा देव शेतकरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वसमावेशक मंडळींचे पॅनल तयार करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या इतर सर्व मंडळींनी कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे असे आवाहन आज आजरा येथे झालेल्या पत्रकार बैठकीत प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले.

बिनविरोध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(ठाकरे गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, अशोकअण्णा चराटी व जयवंतराव शिंपी गटाची संयुक्त पत्रकार बैठक पार पडली. यावेळी प्रा.सुनील शिंत्रे बोलत होते.
यावेळी जाहीर करण्यात आलेले श्री.चाळोबा देव शेतकरी महाविकास आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे :-
आजरा-श्रृंगारवाडी उत्पादक गट:-
अशोकअण्णा चराटी (आजरा) अभिषेक जयवंतराव शिंपी (आजरा ) विजय देसाई (वाटंगी)
हात्तिवडे-मलिग्रे उत्पादक गट:-
प्रा. सुनील शिंत्रे (मेंढोली )
आनंदा बुगडे (मलिग्रे)
सुरेश सावंत (कोळींद्रे)
गवसे- पेरणोली उत्पादक गट:–
राजेंद्र सावंत (पेरणोली)
सहदेव नेवगे (गवसे )
दशरथ अमृते (हाळोली)
उत्तुर-मडीलगे उत्पादक गट:-
उमेश आपटे ( उत्तूर )
भिकाजी गुरव (मडीलगे)
प्रकाश चव्हाण (चव्हाणवाडी)
भादवण-गजरगाव उत्पादक गट:-
श्रीमती अंजनाताई रेडेकर (पेद्रेवाडी ) संजय पाटील
सुधीर पाटील (कानोली)
महिला राखीव गट:-
सौ.सुनीता रेडेकर (सरंबळवाडी)
सौ.संगीता माडभगत (साळगाव)
इतर मागास राखीव प्रवर्ग:-
जनार्दन विठ्ठल टोपले (आजरा )
अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग:-
मलिककुमार बुरुड (आजरा )
भटक्या विमुक्त जाती जमाती:-
संभाजी दत्तात्रय पाटील (आजरा )
इतर संस्था ब वर्ग प्रतिनिधी:-
अशोक तर्डेकर (मलिग्रे )
अशाप्रकारे आघाडीची रचना करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी बोलताना गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर म्हणाल्या, कारखाना निश्चितच अडचणीत आहे परंतु कोणतीही गोष्ट अशक्य नाही याचेही भान ठेवण्याची गरज आहे. कारखाना विकासासाठी कॉमन अजेंडा तयार करून डिस्टिलरी, इथेनॉल प्रकल्प आणणे, कारखान्याची गाळप क्षमता वाढवता येईल का यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील असे सांगितले.
अशोकअण्णा चराटी म्हणाले, दोन पावले मागे येऊन आम्ही एकमेकांपासून दूर झालेली मंडळी केवळ कारखाना हितासाठी एकत्र आलो आहोत. निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे व आमदार सतेज पाटील यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यातूनही निवडणूक प्रक्रिया राबवली गेलीच तर या आघाडीला कोणतीही अडचण नाही. ज्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज माघार घेऊन कारखान्यावरील अतिरिक्त निवडणूक खर्चाचा बोजा टाळण्यास हातभार लावावा असे आवाहनही केले.
बैठकीस शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, मलिककुमार बुरुड, जनार्दन टोपले, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत, दशरथ अमृते, विलास नाईक, तानाजी देसाई, गोविंद गुरव,अनिरुद्ध केसरकर,अशोक पोवार,विक्रम पटेकर, दिनेश कांबळे यांच्यासह समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.
अभिषेक शिंपी यांनी आभार मानले.
विद्यमान तेरा संचालक रिंगणाबाहेर राहणार ?
आज जाहीर झालेली आघाडीची रचना व राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा घेतलेला निर्णय विचारात घेतल्यास विष्णूपंत केसरकर, वसंतराव धुरे,एम.के. देसाई, दिगंबर देसाई, मारुती घोरपडे, मुकुंदराव देसाई,लक्ष्मण गूडूळकर, अनिल फडके, सौ.विजयालक्ष्मी देसाई, आनंदा कांबळे, तानाजी देसाई, विलास नाईक, सुधिर देसाई हे तेरा संचालक रिंगणाबाहेर राहणार असे स्पष्ट होत आहे.(यामध्ये ६ देसाई परीवारातील संचालक आहेत)
ऊस बिलाबाबत निश्चिंत रहा…
आजरा साखर कारखान्याला सध्या ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकरी वर्गाने दिला बाबत कोणतीही काळजी करू नये. जिल्हा बँकेकडून बिलापोटी साठ कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्यामुळे कोणाचीही बिले थांबवली जाणार नाहीत असा विश्वास यावेळी प्रमुख नेते मंडळींनी दिला.





