mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

आज छाननी…


                     आजरा:प्रतिनिधी

           आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरीता दाखल झालेल्या १७८ अर्जांची आज छाननी होणार आहे. छाननीमध्ये उमेदवारीसाठी दाखल अर्जांची परिस्थिती पाहता अनेकांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे.

         विविध गटातून दाखल केलेल्या एकमेकांच्या अर्जांवर हरकती न घेण्याचे अर्ज दाखल केलेल्या मंडळींनी जरी ठरवले तरी प्रशासनाकडून अनेक अर्ज त्रुटींमुळे  बाद ठरवले जाण्याची शक्यता आहे. दाखल अर्ज…

गट क्र. एक – उत्तूर मडिलगे गट

संजय शेणगावे,प्रकाश चव्हाण,दिपक देसाई,मारूती घोरपडे शिरीष देसाई,भिकू गुरव
सदानंद पाटील,पांडुरंग दिवटे,धोंडीराम सावंत,निवृत्ती पाटील,उमेश आपटे,संजय उत्तूरकर,वसंतराव धुरे,शंकर आजगेकर

गट क्र. दोन – आजरा श्रृंगारवाडी गट

युवराज पोवार,दिगंबर देसाई,अशोक चराटी
गणपतराव देसाई,जयवंत शिंपी,विलास नाईक,राजाराम होलम,विजय देसाई,
संभाजी पाटील,शिवाजी नांदवडेकर,सुभाष देसाई,अभिषेक शिंपी,प्रकाश बुगडे,
महादेव होडगे,तुळसाप्पा पोवार,विश्वास गाईंगडे,बाबुराव नार्वेकर,आबुताहेर तकिलदार,
रशीद पठाण,अशोक चराटी,मुकुंद देसाई

गट क्र. तीन – पेरणोली गवसे गट

उदयसिंह पवार,सहदेव नेगवे,दशरथ अमृते,
सदाशिव डेळेकर,गोविंद पाटील,मुकुंद तानवडे,अजिंक्य तानवडे,रामचंद्र पाटील,
जोतिबा चाळके,रणजित देसाई,प्रकाश पाटील,
राजेंद्र सावंत,शिवाजी पाटील,सर्जेराव देसाई,इंद्रजित देसाई,शांताराम पाटील,
शामराव बोलके,तुकाराम गावडे,सुधीर देसाई,बाबासाहेब पाटील,
किरण तानवडे,दौलती पाटील,दशरथ अमृते,
रणजित देसाई,लहू पाटील, प्रकाश पाटील,शिवाजी पाटील,इंद्रजीत देसाई

गट क्र. चार – भादवण गजरगाव गट

मधुकर देसाई,संजय पाटील,सुधीरकुमार पाटील,राजेंद्र मुरूकटे,मनोहर पाटील,
शिवाजी कुराडे,आनंदा कुलकर्णी,भिवा जाधव,आनंदा जोशिलकर,गोपाळ केसरक,रराजेश जोशीलकर,अंजना रेडेकर,बाळकृष्ण चव्हाण,बाबासाहेब देसाई,मधुकर देसाई,अनिरूध्द रेडेकर,मनोहरजगदाळे,संभाजी सरदेसाई,राजारामपाटील,संजयपाटील,आनंदा पाटील,आनंदा कुलकर्णी,बाजीराव पाटील

गट क्र. पाच – हात्तिवडे मलिग्रे गट

आनंदराव बुगडे,विष्णू केसरकर,शंकर उगाडे,
सदाशिव माणगांवकर,संभाजी पाटील,अनिल फडके,शिवाजी लाड,तानाजी राजाराम,सुरेश सावंत,गोविंद नारळकर,सुर्यकांत रेडेकर,
रामचंद्र पाटील,राजाराम जाधव,पांडुरंग हरेर,सुनिल शिंत्रे,सुरेश सावंत,रमेश बुगडे

ब वर्ग बिगर उत्पादक सभासद गट

नामदेव नार्वेकर,नौशाद बुडेखान,संतोष भादवणकर,अशोक तर्डेकर,उदयराज पवार,जनार्दन टोपले,रामचंद्र पाटील,अनिरूध्द रेडेकर,सुनिल शिंत्रें,जयवंत शिंपी

अनुसुचित जाती-जमाती प्रतिनिधी गट

मलिककुमार बुरूड,अशोक कांबळे,दिनेश कांबळे,गोविंद जाधव,
किरण कांबळे, हरीबा कांबळे,भाऊसो कांबळे,शिवाजीकांबळे,
शशिकांत सावंत,
तानाजी दावणे,अशोक कांबळे

महिला प्रतिनिधी गट

सुनिता रेडेकर,सुजाता पाटील,रचना होलम,संगीता माडभगत,रेखा राजाराम
सुमित्रा देसाई,चेतना देसाई,श्रध्दा शिंत्रे,मनिषा देसाई,सुमन डेळेकर,सुमन पोतनीस,अंजना रेडेकर,सुनिता रेडेकर,गिता वांगणेकर,राजश्री पवार, वृषाली कोंडूसकर

इतर मागास प्रतिनिधी गट

जनार्दन टोपले,गोविंद पाटील,रामचंद्र पाटील,राजेंद्र मुरूकटे,
अभिषेक शिंपी,अबुताहेर तकिलदार,काशिनाथ तेली,रशिद पठाण,रियाज तकिलदार,नौशाद बुडेखान
गिरीधर कुराडे,नामदेव नार्वेकर,विजय गुरव,मधुकर येलगार,बाबु येडगे,बाजीराव पाटील

भटक्या विमुक्त जाती जमाती गट

कल्लाप्पा नाईक,संभाजी पाटील,मालुबाई गवळी, मिसाळ,बाबू येडगे,विकास बागडी

छाननीतून बाद होण्याची ही राहतील कारणे

-अपुरे अर्ज दाखल करणे
-विहित कालावधीत कारखान्याला ऊस पुरवठा नसणे
-भाग भांडलावाची पूर्तता नसणे
-राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे जातीचे दाखले अद्ययावत नसणे


संभाजी चौकात पुन्हा खुदाई वाहतुकीची बोंब


                     आजरा: प्रतिनिधी

नळ पाणीपुरवठा योजनेच्या गळतीमुळे शहरभर होणाऱ्या खुदाईला आता आजरा शहरवासीय वैतागले असून पुन्हा एक वेळ संभाजी चौकात भला मोठा खड्डा खोदल्याने वाहतुकीची बोंब सुरू झाली आहे.

         नगरपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेची गळती हा नगरपंचायतीच्या दृष्टीने डोकेदुखीचा प्रश्न असला तरी याचा वारंवार शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन दिवसापूर्वी गळती काढण्यासाठी शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या संभाजी चौकात नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी मला मोठा खड्डा मारून ठेवला आहे.या खड्ड्यामुळे मुळातच अरुंद असणाऱ्या या मार्गावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतूकदारांबरोबरच शहरवासीयांना ऐन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ आली आहे.

         यामुळे किमान नवीन होत असणार पाणीपुरवठा योजनेचे साहित्य तरी दर्जेदार वापरावे अशी माफक अपेक्षा शहरवासीय व्यक्त करत आहेत.

पाणीपुरवठा वेळापत्रकाचे तीन तेरा

        वारंवार नळ पाणीपुरवठा योजनेला लागणाऱ्या गळत्या व खंडित वीज पुरवठ्यामुळे नेहमीप्रमाणे दिवाळी काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.याचा त्रास महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.


कानोली येथे शुक्रवार व शनिवारी दीपमाळ उद्घाटन सोहळा


                  ‌‌आ‌जरा:प्रतिनिधी

         कानोली ता. आजरा येथे आजी-माजी सैनिक, आणि पोलीस, कानोली ग्रामविकास मंडळ, मुंबई व दानशूर व्यक्ती आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून उभारलेल्या दिपमाळेचा वास्तुशांती, आणि लोकार्पण सोहळा असा संयुक्त कार्यक्रम उद्या शुक्रवारपासून सुरू होत आहे.

         या कार्यक्रमांतर्गत ग्रामदैवत भैरवनाथ अभिषेक, जलाभिषेक, हळदी कुंकू समारंभ, भजन, महाप्रसाद, सोंगी भजन यासह विविध इतर कार्यक्रम होणार आहेत.

        आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास हत्तरगी मठाचे गुरु सिद्धेश्वर महास्वामी,तहसीलदार समीर माने, सहा. पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्यासह तालुक्यातील नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.


प्राथमिक विद्यामंदिर होन्याळी शाळेला संगणक संच प्रदान

                   आजरा:प्रतिनिधी

         जिल्हा परिषदेच्या होन्याळी येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेवून सध्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या औद्योगिक विकास महामंडळ , मुंबई येथे उपमुख्य कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असणारे सतिश विष्णू पोवार यांनी आपले वडील कै.विष्णू जानबा पोवार (प्राथमिक शिक्षक) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळेला संगणक संच भेट दिला. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी आपल्या शाळेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ग्रामीण भागातील मुलांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. अवधूत जाधव यांनी स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक माहिती तंत्रज्ञान व त्याचा सुयोग्य वापर याविषयी मार्गदर्शन केले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर सरोळकर यांनी सध्याच्या युगातील संगणकाचे महत्व विशद केले.

         या कार्यक्रमासाठी सरपंच सौ.स्मिता पाटील, उपसरपंच सचिन उंचावळे, ग्रा.पं.सदस्य विजय मांडेकर, ज्ञानदेव पाटील, दाजीबा पाटील, प्रवीण पाटील, तुळशीदास लकांबळे, पोवार कुटुंबीय , सौ.निलिमा पाटील ,सौ.मोरे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

         सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पाटील यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक संजय आजगेकर यांनी मानले.


कुत्रा चावल्यास प्रत्येक खुणेमागे १० हजार भरपाई- हायकोर्ट

     देशातील बहुतांश भागांत कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी आणि मृत्यूच्या घटना (dog bite cases) घडत आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

     कुत्रे आणि भटक्या जनावारांच्या हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य प्रामुख्याने जबाबदार असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये दातांच्या प्रत्येक खुणेला किमान १० हजार रुपये (per teeth mark) आणि प्रत्येकी ०.२ सेमी जखमेसाठी किमान २० हजार रुपये भरपाई द्यावी लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

     भटक्या प्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांशी संबंधित १९३ याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. देशात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव्यावरुन मोठ्या प्रमाणात वाद सुरू असताना हा निर्णय आला आहे. वाघ बकरी टी ग्रुपचे कार्यकारी संचालक ४९ वर्षीय पराग देसाई यांचा कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर ब्रेन हॅमरेज होऊन मृत्यू झाला होता. ऑक्टोबरमध्ये झालेल्या घटनेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. भटकी कुत्री मागे लागल्याने देसाई रस्त्यात पडले होते. यामुळे ब्रेन हॅमरेज होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने निवेदनात म्हटले होते.

     या दुःखद घटनेनंतर लगेचच सोशल मीडिया यूजर्संनी भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी केली. अनेक यूजर्संनी प्राण्यांच्या हल्ल्यात लहान मुलांसह अनेक झालेले मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटनांकडे लक्ष वेधले होते. न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली आहे.

     “राज्यातील अशा घटनांमध्ये संबंधित एजन्सी, राज्य सरकार, खाजगी व्यक्ती नुकसान भरपाई देण्यास प्रामुख्याने जबाबदार असेल,” असे उच्च न्यायालयाने कुत्रा चावण्याच्या प्रकरणात नुकसानभरपाईची मागणी करणाऱ्या याचिकेवरील आदेशात म्हटले आहे.

     उच्च न्यायालयाने या प्रकरणी पंजाब, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडला एक समिती स्थापन करण्यास सांगितले आहे; जी भटक्या प्राण्यांमुळे झालेले अपघात अथवा हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये भरपाई देण्याबाबत निर्णय घेईल. यामध्ये गाय, बैल, बैल, गाढव, कुत्रे, नीलगाय, म्हैस या जनावारांचा आणि जंगली, पाळीव प्राण्यांचा समावेश आहे.

“या समितीमध्ये संबंधित जिल्ह्याचे उपायुक्त यांचा अध्यक्ष म्हणून समावेश असेल आणि त्यात पोलिस अधीक्षक/पोलीस उपअधीक्षक (वाहतूक), संबंधित क्षेत्राचे उपविभागीय दंडाधिकारी, जिल्हा परिवहन अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांचे प्रतिनिधी हे यात सदस्य म्हणून असतील, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे स्वरूप लक्षात घेऊन न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला आहे.

का वाढली भटक्या कुत्र्यांची संख्या?

     २००१ पूर्वी महापालिका प्रशासने सार्वजनिक ठिकाणे सुरक्षित ठेवण्यासाठी भटक्या कुत्र्यांचा वेदनारहित मृत्यू करू शकत होते. २०११ मध्ये प्राणी जन्म नियंत्रण (कुत्रे) नियम आले. या नियमांनी “रस्त्यावरील भटकी कुत्रे” नावाची एक वेगळी श्रेणी तयार केली आणि “प्राणी कल्याण संस्था, खासगी व्यक्ती आणि स्थानिक प्राधिकरणाच्या सहभागाने” त्यांची नसबंदी आणि लसीकरण केले जावे असे सांगितले. पण पुरेसा निधी आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ही उपाययोजना प्रभावीपणे राबविली जात नाही. परिणामी भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.


भारताची फायनलमध्ये धडक! उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव


         भारतीय संघाने वनडे विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. बुधवारी झालेल्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करून विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.

     भारताने टॉस जिंकून पहिला फलंदाजी केली. त्यानंतर विराट कोहली (११७), श्रेयस अय्यर (१०५), शुबमन गिल (नाबाद ८०), रोहित शर्मा (४७), केएल राहुल (नाबाद ३९) यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने ४ विकेट्सच्या मोबदल्यात ३९७ धावांचा डोंगर रचला. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघ ४८.५ षटकांत सर्व विकेट्स गमावून ३२७ धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यांच्या डॅरेल मिचेलने (१३४), केन विल्यमसन (६९), ग्लेन फिलिप्स (४१) यांनी सामना जिंकण्यासाठी झुंज दिली.

     टीम इंडियाच्या मोहम्मद शमीने सर्वाधिक ७ बळी मिळवले. तर जसप्रित बुमराह आणि कुलदीप यादवला १-२ विकेट मिळाली.

News Source :-

https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq


संबंधित पोस्ट

आत्महत्या…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सुळे येथे महिलेचा संशयास्पद मृत्यू…?

mrityunjay mahanews
error: Content is protected !!