

बेकादेशीररित्या वहातुक…
विदेशी दारुसह ३ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त
. ◼️आजरा : प्रतिनिधी◼️
गोवा बनावटीची विदेशी दारू बेकायदेशीर रित्या विक्रीच्या दृष्टीने वाहतूक करत असताना आजरा पोलिसांनी नितीन प्रकाश सूर्यवंशी ( वय ४५, रा. माजगाव, ता. सावंतवाडी) याला रंगेहात ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन लाख ६२ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आजरा पोलिसात रात्री उशिरा नितीन याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आजरा पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून आजरा- आंबोली मार्गावर पारेवाडी तिठ्ठा येथे सापळा रचून पोलिसांनी नितीन सूर्यवंशी याची महिंद्रा झायलो ( एम. एच.०७ क्यू .७३३७) ही गाडी अडवून गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये विदेशी दारू व इतर मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी विशाल कांबळे यांनी फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्ता शिंदे पुढील तपास करीत आहेत.


आजरा साखर कारखान्यासाठी ३८ जणांचे ४१ अर्ज

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी १५ जणांनी १७ अर्ज दाखल केले आहेत. मंगळवार अखेर एकूण ३८ उमेदवारांनी ४१ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ते पुढीप्रमाणे…
गट क्रं.१ (उत्तुर-मडीलगे)
१) संजय शेणगावे
गट नं २ (आजरा- श्रृंगारवाडी)
१) युवराज पोवार
२) दिगंबर देसाई
३) अशोक चराटी
४) जी.वाय.देसाई
५) जयवंतराव शिंपी
६) विलास नाईक
७) राजाराम होलम
८) विजय देसाई
गट नं ३ ( पेरणोली – गवसे)
१) उदयसिंह पोवार
२) सहदेव नेवगे
३) दशरथ अमृते
४) सदाशिव डेळेकर
५) गोविंद नारायण पाटील
६) मुकूंद तानवडे
७) अजिंक्य मुकुंद तानवडे
८) रामचंद्र पाटील
९)जोतिबा चाळके
गट नं ४ (भादवण- गजरगांव)
१) एम.के.देसाई
२) संजय मारुती पाटील
३) सुधीरकुमार पाटील
गट नं ५ (हात्तिवडे मलिग्रे)
१) आनंदराव बुगडे
२) विष्णूपंत केसरकर (२)
४) शंकर रावळु उगाडे
५) सदाशिव माणगांवकर
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी:-
१)गोविंद नारायण पाटील २)जनार्दन टोपले
महिला राखीव-
१)सुनिता रेडेकर
२) रचना होलम(२अर्ज) ३)सुजाता पाटील
४)संगीता माडभगत
अनुसूचित जाती जमाती –
१)मलिककुमार बुरुड. २)दिनेश कांबळे
३)अशोक कांबळे
४)गोविंद जाधव
भटक्या विमुक्त जाती- जमाती
१) संभाजी पाटील २)कल्लाप्पा नाईक


दिवाळी आली… आकाश कंदीलांनी बाजारपेठ सजली

◼️आजरा: प्रतिनिधी◼️
दीपावली सण चार दिवसांवर येऊन ठेपल्याने आजरा बाजारपेठ रंगीबेरंगी आकाश कंदील आणि सजून गेली आहे. विविध रंग व आकाराचे आकाश कंदील स्टॉल्सच्या माध्यमातून विक्रेत्यांनी ठिकठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत.
पन्नास रुपयांपासून ते पुढे एक हजार रुपयापर्यंतचे आकाशकंदील सध्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत.


महामार्ग काम प्रकरणी व्यावसायिक आक्रमक…
आंदोलनाचा इशारा

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
महामार्गाचे काम मनमानी पद्धतीने ठेकेदार करत आहे.अन्यायकारक काम केल्यास रास्तारोको व बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा आजरा संभाजी चौक परिसरातील खोकीधारकांनी पत्रकार बैठकीत दिला.
महामार्गाच्या गटारींचे काम आता शहरातून सुरु झाले आहे.रस्त्याचे कामाचे स्वरूप काय राहणार या विषयावर अनेक बैठकीत चर्चा झाली आहे.शहरात रस्ता फारसा रुंदीकरण न करता गटारी ते गटारी असेच काम करण्याचे महामार्ग अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे.

आजरा आगार ते एस.टी.स्टॅंड पर्यंत ठरल्याप्रमाणे गटारींचे काम झाले असताना त्यापुढील काम मात्र मनमानी व दडपशाहीने सुरु असल्याची तक्रार खोकीधारकांनी केली आहे.याबाबत खोकीधारकांनी नाम.हसन मुश्रीफ, आम.प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी, महामार्ग कोल्हापूर कार्यालय, तहसिल कार्यालय व लोकशाही दिन अदालत मध्ये हरकतींचे निवेदन दिले आहेत.लोकप्रतिनिधींनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.
गेल्या ५० वर्षांपासून येथील खोकीधारक व्यवसाय करीत आहेत. या खोकीधारकांमध्ये कांही मालकीच्या तर काही भाडेतत्त्वावर जागा आहेत.कर्ज काढून व्यवसाय केला जात आहे. या कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न होताना दिसत असून आमचा याला विरोध राहील. गटार टू गटार काम करण्यास आमची कोणतीच हरकत नाही मात्र दडपशाहीने व अन्यायकारक काम केलेस सर्व खोकीधारकांचा विरोध राहील.त्यातूनही काम केल्यास रास्तारोको व बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी खोकीधारकांनी दिला.
यावेळी समीर तकीलदार,रामा शिंदे, मुस्तफा नालबंद,लिहाज बागवान, आनंदा इंगळे,गौतम भोसले, इस्माईल नसरदी,अभि गोवेकर यांच्यासह इतर व्यावसायिक उपस्थित होते.


निवड…
अनिकेत चराटी

आजरा ग्राहक सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी अनिकेत अशोक चराटी यांची तर उपाध्यक्षपदी संजय शिंत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


निधन वार्ता लिलावती तेरणी

आजरा येथील लिलावती बसवराज (तमन्ना) तेरणी (वय ६७) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.


पाऊस-पाणी…
आजरा शहरासह परिसरामध्ये बुधवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे भात कापणी व मळणी प्रक्रियेत व्यत्यय येणार असल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.




