
डॉ. दीपक सातोसकर यांचा वाढदिवस उत्साहात

आजरा अर्बन बँकेचे संचालक व इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दीपक सातोसकर यांचा ६१ वा वाढदिवस उत्साहात साजरा झाला.
अण्णा भाऊ संस्था समुहाचे पदाधिकारी, तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी .यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएसशचे पदाधिकारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. येथील अण्णा भाऊ संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा सुतगिरणीच्या अध्यक्षा श्रीमती अन्नपुर्णादेवी चराटी होत्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूणे महीला संघटक जान्हवी सातोसकर यांनी वडील डॉ. सातोसकर यांच्या आठवणी सांगीतल्या.आजरा अर्बन बँकेचे संचालक विलास नाईक यांनी डॉ. सातोसकर हे कुशल व्यक्तीमत्व आहेत. ते गोरगरीब व गरजूनां मदत करतात .असे स्पष्ट केले तर डॉ. देशपांडे म्हणाले, दोघांचा पेशा एक असला तरी आमचे मित्रत्व बालपणापासून आहे. अण्णा भाऊंच्या सहवासात वाढल्याने त्यांच्या व्यक्तीमत्वात अनेक पैलू आहेत. प्रा. विजय बांदेकर, अशोक मोहीते, जनार्दन टोपले, प्रकाश वाटवे यांचे भाषण झाले.

अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी म्हणाले, राजकारणात नसले तरी डॉ. सातोस्कर हे सर्वाना विचारात घेवून काम करतात. ते बालपणापासून हुशार आहेत.अण्णा – भाऊ संस्था समूहाच्या वाढीमध्ये त्यांनी मोठा हातभार लावला आहे. ते एक कलाकार व अवलिया असून वेळ न दवडता कोणत्या ना कोणत्या कामात ते मग्न असतात.
यावेळी डॉ. जॉन डिसोजा यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. दीपक सातोस्कर म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन .सर्वसामान्यांची सेवा करण्याचे काम आपण करत आहोत.स्व.काशिनाथअण्णा व माधवराव देशपांडे यांच्यामुळे आपणाला काम करण्याची संधी मिळाली.
प्रा. विजय बांदेकर, जनार्दन टोपले, प्रकाश वाटवे यांचेही भाषण झाले.यावेळी सुरेश डांग, विजयकुमार पाटील, किशोर भुसारी, राजेंद्र सावंत, सुधीर कुंभार, डॉ. संदिप देशपांडे, डॉ. प्रविण निंबाळकर, दिनेश कुरुणकर, तानाजी देसाई, दशरथ अमृते. दिगंबर देसाई, रमेश रेडेकर, रमेश कुरुणकर, डॉ. अशोक फर्नांडीस उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शंकर उर्फ भैय्या टोपले यांनी केले.

मधामाशांच्या हल्यात शेतकऱ्याचा बळी
शेतात सापडला मृतदेह

. मेढोली (ता. आजरा) येथील नानू जोतीबा कोकीतकर (वय ७५) हे मधामाशांच्या हल्यात ठार झाले आहेत. शुक्रवार (ता. २१) शेळ्या चारण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यांचा शोध घेतल्यावर आज सकाळी त्यांचा मृतदेह सकाळी ९.३० वाजता मिळून आला. मधमाश्यांनी शेळ्यांचाही चावा घेतला आहे. यामध्ये सहा शेळ्या जखमी झाल्या आहेत. केदारी रामचंद्र कातकर यांनी आजरा पोलीसात याबाबतची वर्दी दिली आहे.
श्री कोकीलकर हे नेहमीप्रमाणे सायंकाळी काळवाट नावाच्या शेतात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. शुक्रवारचे ते घरी येत नाहीत ते शेतातच मुक्काम करतात. शेतातून आज सकाळी ते घरी न परतल्यामुळे त्यांची घरातील मंडळी व नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. मॅढोलीच्या गायराना जवळील सोनाबाई संतोबा पाटील यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या प्रेताशेजारी मधमाशा घोंगावत होत्या. या हल्यात सहा शेळ्याही जखमी झाल्या आहेत. काजूच्या झाडावर मधमाशांचे पोळे आढळले. या पोळ्यातील माशांनी त्यांच्यावर हल्ला केला असल्याचे सांगण्यात येते. दिवाळी सणादिवशीच त्यांचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. गावात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुलगे, विवाहित मुलगी, सूना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा केंद्रीय राखीव पोलीस दलात तर दूसरा शेतकरी आहे.


एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; भोसरी प्रकरणात पुन्हा चौकशीचे आदेश

भोसरी भूखंड प्रकरणामुळे तत्कालीन माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. तर पुन्हा या प्रकरणात आता न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्याने खडसेंच्या अडचणी वाढल्या आहेत. पुण्यातील एसीबीने न्यायालयाकडे या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर ती न्यायालयाने मान्य केली आहे.
भाजप सरकारच्या काळात मंत्री पदावर असताना खडसे यांना भोसरी भूखंड प्रकरण अडचणीचे ठरले होते. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.खडसे हे भाजपातून राष्ट्रवादीत आल्यानंतर या प्रकरणात पडदा पडला होता. मात्र, राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर खडसेंच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. पुण्यातील एसीबीने भोसरी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर ती न्यायालयाने आता मान्य केली आहे. भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत तपास पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असले. तरी त्यात या कालावधीपर्यंत अटक न करण्याच्या सूचनाही आहेत.
अटी शर्तीवर तपासाची परवानगी
भूखंड प्रकरणात जुलैमध्ये क्लोजर रिपोर्ट सादरच्या सूचना झाल्यानंतर तो सादर केल्यानंतर शासनाच्या वतीने पुन्हा तपासाची विनंती करण्यात आली. ती मान्यही झाली आहे. मात्र, न्यायालयाने काही अटी शर्तीवर तपासाची परवानगी दिली असून, दिवाळी सुट्टीनंतर तपास अधिकार्यांना न्यायालयाकडून भूखंड घोटाळ्याची कागदपत्रे मिळतील. त्यानंतरच तपासाला सुरूवात होईल.


सांगलीतील व्यापाऱ्याचे ८० लाख लुटले
आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून
केली फसवणूक

इन्कमटॅक्स ऑफिसर असल्याची बतावणी करुन चौघा भामटय़ांनी सांगलीच्या सोनाराची 80 लाखांची रोकड हातोहात लंपास केली. बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुक्तसैनिक वसाहत येथील सिग्नलजवळ ही घटना घडली. याबाबतची फिर्यादी धनाजी आनंदा मगर (वय 32 रा. नागाव ता. वाळवा जि. सांगली) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.*
याबाबत अधीक माहिती अशी की, धनाजी मगर हे बुधवारी सांगलीहून कोल्हापूरला सोने खरेदी करण्यासाठी आले होते. गुजरी येथील व्यापाऱ्याकडून ते सोने खरेदी करणार होते. साधरणपणे 80 लाख रुपयांचे सोने दिवाळीसाठी ते खरेदी करणार होते. सांगलीहून निघताना 40 लाख रुपये सॅकमधून घेवून आले होते. तर त्यांनी 40 गांधीनगर येथील मित्र संतोष कुकरेजा यांच्याकडे ठेवली होती. गांधीनगर येथील खरेदी आटोपून रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ते गांधीनगरहून गुजरीकडे सोने खरेदीकरण्यासाठी निघाले होते. मुक्तसैनिक वसाहत येथील सिग्नल जवळ ते आले असता, दोन दुचाकीवरुन चौघेजण त्यांच्या जवळ आले. त्यांनी तु लई फास्ट आला आहेस. तुझ्याकडे किती पैसे आहेत ते आम्हाला दाखव आम्ही इनकमटॅक्स ऑफीसर आहोत अशी बतावणी केली. तसेच जबरदस्तीने धनाजी मगर यांना दुचाकीवर बसवून त्यांना शिरोली एमाआयडीसी परिसरात नेले. पैसे तपासण्याच्या बहाण्याने या चौघांनी मगर यांच्याकडील पैशाची बॅग स्वतकडे घेतली व मगर यांना सांगली फाटा येथे सोडून या चौघांनी पोबारा केला.
(News Source: chat.Whatsupp.com)



