

दैव बलवत्तर म्हणून वाचली महिला ; गव्याच्या हल्ल्यात थोडक्यात बचावली
आजरा तालुक्यातील घटना


आजरा तालुक्यामध्ये वन्यप्राण्यांचा वावर व उपद्रव मोठ्या प्रमाणात होत आहे .त्यामुळे हत्तीसह गव्यांचा गावांमधील प्रवेश नित्याचा झाला आहे.
भावेवाडीत शिरलेल्या गव्याने ग्रामस्थांना चांगलेच हैराण करून सोडले.सैरभैर झालेल्या या गव्याच्या हल्ल्यातून सुदैवाने एक महिला बचावली.
त्याचे असे झाले…
गुरुवारी दुपारच्या दरम्यान एक गवा भावेवाडी गावामध्ये शिरला. गवा आल्याची चाहूल लागताच कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केला.हे दृश्य पाहताच ग्रामस्थदेखील त्याला हुसकावून लावण्यासाठी पुढे सरसावले. दरम्यान या सर्व प्रकारात रस्त्यावरून चाललेल्या एका महिलेला गव्याची धडक बसणार होती.या प्रकाराबाबत अनभिज्ञ असणा-या या महीलेने सुदैवाने गावकऱ्यांचा व कुत्र्यांचा गोंधळ ऐकून जिवाच्या आकांताने तेथून पळ काढला. महिला बाजूला झाल्याने गव्याच्या हल्ल्यातून बचावली.
सदर प्रकारानंतर ग्रामस्थांनी गव्याला गावातून जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले.गेले दोन दिवस भावेवाडी परीसरात सदर गव्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान अधिक चौकशी केली असता पुढे जाऊन
गवा एका विहीरीत पडला.वनविभागाने गव्याला विहीरीतून बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडल्याचे वन अधिकारी यांनी सांगितले.





