mrityunjaymahanews
अन्य

शनिवार सातच्या बातम्या

शनिवार 

२७ जून २०२६

भादवणवाडी येथील तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भादवणवाडी तालुका आजरा येथील सचिन आनंदा कांबळे / वाडेकर ( वय वर्षे ३६ ) या विवाहित तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. सदर घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भादवणवाडी येथे घडली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की…

सचिन हा गावातच दुचाकीवरून चालला असता त्याची दुसऱ्या दुचाकीला जोराची धडक बसली यामध्ये तो बाजूला फेकला गेला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच मयत झाला.

उपचारासाठी त्याला गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आली होती परंतु उपचारांपूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सचिन याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार…?
एक जखमी


आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा – गडहिंग्लज मार्गावर वन विभागाचे कार्यालय ते म्हसोबा देवस्थान नजिक शुक्रवारी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी वरील विलास गंगाराम पेडणेकर ( वय २८ वर्षे रा. गवसे ) याचा जागीच मृत्यू झाला तर आल्याचीवाडी येथील ज्ञानदेव लक्ष्मण भांदुरगे हा जखमी झाल्याची घटना घडली आहे.

दोघांनाही उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात रात्री उशिरा हलवण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच पेडणेकर यांचा मृत्यू झाला. माडभगत याच्यावर उपचार सुरू आहेत.

रात्री उशिरा अपघात झाल्याने अपघात नेमका कसा झाला याची सविस्तर माहिती मिळू शकली नाही. तथापी अपघात ग्रस्त दुचाकीची अवस्था पाहता चार चाकीने जोरदार धडक दिली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.

आजरा येथून एक जण बेपत्ता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील जोशी गल्लीत राहणारे दत्तात्रय नारायण कातकर ( वय ४२ वर्षे/ मुळगाव खेडे या.आजरा ) हे ६ जून पासून बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांची पत्नी सौ. सुजाता दत्तात्रय कातकर यांनी पोलिसांत दिली आहे. आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

फोटो क्लिक 

यरंडोळ परिसरात हत्तीच्या धिंगाणा सुरूच असून  येथील निवृत्ती राजाराम पाटील, शिवाजी सुपल, पांडुरंग उपळकर यांच्या भात पिकाच्या तरव्याचे नुकसान करण्याबरोबरच ऊस पिकाचेही नुकसान करत पॉवर ट्रिलर पलटी करून टाकला आहे.

राजकारण समजण्यासाठी पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांचे अभ्यास वर्ग घ्यावेत : डाव्या पक्ष संघटनांचा सल्ला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जन्म मुळी डाव्या विचारणसणीच्या कुटुंबात झाला आहे. त्यांना डाव्या विचारधारेच्या राजकारणाची चांगली माहीती आहे. डावे राजकारण हे नैतिकता, नित्तीमता व चारित्र्य यावर आधारीत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना राजकारण समजावे यासाठी अभ्यासवर्ग घ्यावेत. असा उपरोधिक टोला डाव्या पक्ष संघटनाच्यावतीने पत्रकार परिषदेत लगावला.

पालकमंत्री आबिटकर यांच्या कार्यकर्त्यांनी संकेश्वर- बांदा महामार्गावरील टोल प्रश्नी पत्रकार परिषद घेतली होती. यामधे डाव्या पक्षसंघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यावर आरोप केले होते. या आरोपाचे खंडन करण्यासाठी आजऱ्यातील डावे पक्ष व संघटनाच्यावतीने पत्रकार परिषद झाली.

कॉ. संपत देसाई म्हणाले, डाव्या पक्षांचे राजकारण हे विचार, मुल्ये, नैतिक अधिष्ठानावर आधारीत आहे. शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी टोलप्रश्नी आरोप करतांना किमान भान ठेवायला हवे होते. आमची भूमीका ही टोलमुक्ती हीच राहीली आहे. आम्ही कोणावर टीका टिप्पणी केली नाही. उलट पालकमंत्री आबिटकर यांनी टोल हद्दपार करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल स्वागत केले. त्यांच्या पुढाकाराने टोलप्रश्नावर बैठक घेवून निर्णय व्हावा. पण आमचे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे मिळावीत असे म्हंटले होते. त्याचा राग शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना येण्याची गरज नव्हती. डाव्या पक्ष संघटनानी टोलप्रश्नावर निवेदन दिली. टोल विरोधात रान पेटवले. याचे साक्षीदार जनता आहे. जनतेच्या हितासाठी प्रश्न विचारणे चुकीचे आहे काय ? आमच्या भूमिका वेळोवेळी बदललेल्या नाहीत. आमच्यावर आर्थिक आरोप करतांना त्यांनी स्वतःला तपासावे. आम्ही चळवळी अर्धवट सोडलेल्या म्हणताय मग धरणग्रस्त, वनहक्काचा संघर्ष, शिक्षणाचा हक्क यासह विविध लढे याची साक्ष आहेत. शांताराम पाटील म्हणाले, सर्वांची भूमिका ही आजरेकरांना टोलमधून मुक्ती मिळवण्याबाबतची आहे. यामधे वाद तयार करण्यास अर्थ नाहीं. प्रकाश मोरुस्कर म्हणाले, शिंदेसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बेछूट आरोप केले. त्यांनाही जशास तसे उत्तर देवू शकतो. कॉ. संजय तर्डेकर यांनी मत मांडले.

या वेळी युवराज जाधव, मारुती पाटील, नामदेव फगरे, संजय घाटगे, व्ही. डी. जाधव, प्रकाश कालेकर, भिमराव माधव, दशरथ घुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आजरा येथे मोहरम उत्साहात 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरांमध्ये पारंपरिक भक्तिभावाने आणि धार्मिक सलोख्याच्या वातावरणात पीर पंजाचे विसर्जन मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडले. वाडा गल्ली मशिदीतून मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील एकूण ११ पंजांच्या भेटी शुक्वाररी आजरा येथील संभाजी चौकात भाविकांच्या उपस्थितीत झाल्या.

या भेटी शहरातील प्रमुख बाजारपेठेतून सवाद्य मिरवणुकीद्वारे करण्यात आल्या. दर्शनानंतर पीर-पंजांचे भाविकांनी ठीक ठिकाणी स्वागत केले. धूप घालून गुळाचा प्रसाद वाटून पूजन करण्यात आले.

शिवाजीनगर येथील घाट परिसरामध्ये पंजाचे विसर्जन करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांसह गृह रक्षक दलाच्या जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आजचे पंचांग 

दिनांक : २७ जून २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : त्रयोदशी (रात्री १२.४३ पर्यंत) त्यानंतर चतुर्दशी तिथी
नक्षत्र : अनुराधा नक्षत्र (रात्री १०.१० पर्यंत) त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र
योग : साध्य योग (दुपारी १२.३१ पर्यंत) त्यानंतर शुभ योग
करण : कौलव करण (सकाळी ११.३२ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०८.२३ ते सकाळी ११.०२ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१५ ते दुपारी ०१.०८
सूर्योदय : सकाळी ०६.०५
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

गाळे वाटपात ‘गाळा’ मारला कुणी? आजऱ्यात सुरू आहे जोरदार चर्चा… काय आहे हे प्रकरण

mrityunjay mahanews

प्रतिभाताई कांबळे यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!