mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार ४ मे  २०२६

भादवणच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही… राजे समरजितसिंह घाटगे
भादवण येथे ई- लर्निंग सेवा लोकार्पण आणि अभ्यासिकाचे उदघाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भादवण गावाने मला राजकीय जीवनात अनेक वेळा साथ दिली आहे. यापुढे भादवण गावच्या विकासासाठी कोठेही कमी पडणार नाही याची राजे समरजीतसिंह घाटगे यांनी दिली. भादवण येथील सरपंच माधुरी गाडे आणि प्रा. रणजित गाडे यांच्या प्रयत्नातून नवचेतना समूहाच्या वतीने आयोजित ई – लर्निंग लोकार्पण सोहळा अभ्यासिका उदघाटन सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते, स्वागत व प्रास्ताविक प्रा. रणजित गाडे यांनी केले.

त्यानंतर बोलताना राजे म्हणाले, भादवण सारख्या गावात ई – लर्निंग आणि अभ्यासिका उभारली या बद्दल गाडे यांचे कौतुक केले, येणारा काळ हा सर्वच बाबतीत संघर्षचा आहे, यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, यासाठी शेतीत शेतकरी वर्गाने ए-आय तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, महिला वर्गाने बचत गटाच्या माध्यमातून पुढे यावे त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, महिला वर्गात आरोग्याच्या बाबतीत संकोचपणा असतो, मात्र असा संकोचपणा बाळगून आपल्या आरोग्याची हेळसांड करू नये यासाठी राजे फाउंडेशन मार्फत गावोगावी आरोग्य शिबीर भरविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. भादवण येथील शाळा रस्ते आणि आरोग्याच्या बाबतीत शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी , आदर्श शिक्षक म्हणून सुभाष सुतार, उत्कृष्ठ शेतकरी म्हणून सुनिल जोशीलकर यांच्यासह कासूबाई पाटील या मूकबधिर महिलेचा सन्मान शिवाय उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून दयानंद पोवार यांना नवचेतना ग्रुपच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार प्राप्त आणि पोलीस भरती आणि नव्याने निवड झालेल्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पंचायत राज भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत सुतार, संभाजी सरदेसाई, जनार्दन निऊंगरे, आनंदराव कुलकर्णी, सरपंच माधुरी गाडे यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी, कार्यक्रमास अशोकआण्णा चराटी,पंचायत समिती सदस्य समीर पारदे, कारखाना संचालक राजेश जोशीलकर, कानोली सरपंच सौ. सुषमा पाटील, सुनिल कुराडे, विकास बागडी संजय केसरकर, वझरे येथील सरपंच गुरव अनिल पाटील यांच्यासह मारुती देसाई, आनंदराव जोशीलकर टी. ए. पाटील,सागर खुळे, सुनिल मुळीक, जितेंद्र गाडे, संदीप सुतार, भिमराव केसरकर, बाळासाहेब कुंभार, जनार्दन उंडगे, विजय गाडे यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या, सूत्रसंचालन दिवेकर यांनी केले तर आभार सतिश खुळे यांनी मानले.

पुलाची शिरोली घटनेचा उत्तूर मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे दोन माथेफिरू युवकांकडून मुलींवर अत्याचार व गैरकृत्याची धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ उत्तूर येथील मुस्लिम समाजाची तातडीची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत उपस्थित सर्वांनी एकमुखाने या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. तसेच अशा प्रकारच्या घटना समाजासाठी निंदनीय असून समाजावर काळीमा फासणाऱ्या असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.बैठकीनंतर मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन तयार करून उत्तूर पोलिस स्टेशन येथे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाजीराव कांबळे यांना सादर करण्यात आले. निवेदनात संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी मुस्लिम समाज उत्तूरचे अध्यक्ष नजीर लमतुरे, सचिव अकबर नाईकवाडे, अनिस बागवान, शोएब मुजावर, दिलावर नाईकवाडे, नूर बागवान तसेच इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वसंतराव देसाई यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील वसंतराव बाबुराव देसाई (वय वर्ष ८० ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे.

आजरा ग्रामपंचायत मध्ये ते पाणीपुरवठा विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. ध्वजारोहण प्रसंगी तिरंगा ध्वज बांधणीमध्ये त्यांचा विशेष हातखंडा होता.

उचंगी लघुपाटबंधारे प्रकल्पातील संयुक्त मोजणीला विरोध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पाची दोन मीटर उंची वाढवून प्रकल्पग्रस्तांना उध्वस्त करण्याचा घाट शासनाकडून सुरू आहे.या संयुक्त मोजणीला प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शविला आहे.दडपशाहीने मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र विरोध करु असा इशाराही देण्यात आला आहे.चाफवडे,जेऊर व चितळे या गावात ही मोजणी होणार आहे.

१९९८ व ९९ या दरम्यान दरम्यान कृष्णा कोरे महामंडळ पुणे या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या समवेत उचंगी लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत सविस्तर चर्चा होऊन उचंगी प्रकल्पाच्या खोऱ्यात पडणारा पाऊस आणि लाभ क्षेत्रात पुरेल इतके पाणी याचा अभ्यास करून प्रकल्पाची दोन मीटर उंची कमी करण्याचा निर्णय झाला होता मात्र प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता २००१ – २००२ या दरम्यान महामंडळाने २ मीटर उंचीच्या वाढविण्या संदर्भातला निर्णय घेतला आहे.

हा निर्णय प्रकल्पग्रस्तांना अमान्य आहे या २ मीटर उंचीमुळे जवळपास चाफवडे, जेऊर आणि चितळे या गावातील ७० ते ७५ एकर जमीन पाण्याखाली पुन्हा जाणार असून प्रकल्पग्रस्तांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे यामध्ये बहुसंख्य शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणारा हा निर्णय आहे. उपलब्ध असणारे उचंगी क्षेत्रातील लाभ क्षेत्र व पाणीसाठा हा पुरेसा आहे थोडीफार शिल्लक राहिलेली जमीन शेतकरी कसून उपजीविकेचे साधन निर्माण करीत आहेत असे असताना शिल्लक राहिलेली सुपीक जमीन पुन्हा पाण्यात बुडवून प्रकल्पग्रस्तांच्या उपासमारीची वेळ येणार आहे.

यापूर्वी प्रकल्पामध्ये गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्रचनाचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत जमीन वाटप झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नकाशे दिले गेलेले नाहीत. चार शेतकऱ्यांना आजही जमीन वाटप केली गेलेली नाही जमिनीकडे जाण्यासाठी दळणवळणाचे रस्ते उपलब्ध नाहीत यासह अनेक बिकट समस्या प्रकल्पग्रस्तांच्या वाट्याला आहेत असे असताना देखील पुन्हा दोन मीटर उंची वाढवून प्रकल्पग्रस्तांना उध्वस्त करण्याचा घाट शासनाकडून सुरू आहे. शासनाने ही मोजणी करु नये अन्यथा सर्व प्रकल्पग्रस्त स्त्री-पुरुषांसह होऊ घातलेल्या संयुक्त मोजणीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विरोध करणार असा इशाराही दिला आहे.

निवेदनावर धनाजी दळवी,विजय भडांगे, संजय तर्डेकर, विश्वास भडांगे, सुनिल धडाम, निवृत्ती बापट,यांच्यासह प्रकल्पग्रस्तांच्या सह्या आहेत.

खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा

कट्टा ग्रुप, पेद्रेवाडी

मंगळवार दिनांक १२ मे २०२६ सायंकाळी आठ वाजता

बक्षीसे…

प्रथम क्रमांक- -११०००/- रुपये
द्वितीय क्रमांक – ७००० /- रुपये
तृतीय क्रमांक – ५०००/-
चतुर्थ क्रमांक – ३०००/-

‘आम्ही दाभिलकर’ ग्रुप

रविवार दिनांक १० मे २०२६

बक्षीसे – मोठा गट

प्रथम क्रमांक – ५००१/- रुपये
द्वितीय क्रमांक – ३००१/- रुपये
तृतीय क्रमांक – २००१/- रुपये

लहान गट –

प्रथम क्रमांक – २००१/- रुपये
द्वितीय क्रमांक – १००१/- रुपये
तृतीय क्रमांक – ७५१/- रुपये रोख

फोटो क्लिक…

आजरा येथील क्रीडा संकुल खेळाडूंसाठी की व्यसनाधीन मंडळींच्या छानछौकीसाठी…? असा प्रश्न आता या परिसराचे स्वरूप पाहता निर्माण होऊ लागला आहे. क्रीडा संकुलची इमारत खेळाडूंकरीता खुली करण्याची गरज आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : ४ मे २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : तृतीया तिथी (४ मे पहाटे ०५.२४ पर्यंत) त्यानंतर चतुर्थी तिथी
नक्षत्र : अनुराधा नक्षत्र (सकाळी ०९.५७ पर्यंत) त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र
योग : परिघ योग (रात्री ११.१९ पर्यंत) त्यानंतर शिवा योग
करण : वाणीजा करण (दुपारी ०४.१२ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.४६ ते सकाळी ०९.२९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१० ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.१०
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०१
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज 

काल रविवारी झालेल्या हैदराबाद विरुद्ध कोलकता सामन्यामध्ये कोलकत्याकडून हैदराबादला पराभवाला सामोरे जावे लागले. धडपडत डावाची सुरुवात झालेल्या  हैदराबादला २० षटकात कसेबसे १६३ धावांपर्यंत पोहोचता आले. कोलकताने हे आवाहन १९.५ षटकात पूर्ण केले.

आजचा सामना

मुंबई विरुद्ध लखनौ

वेळ : सायंकाळी ७.३० पासून

गुण तक्ता/ प्रथम पाच संघ

१. पंजाब – १३
२. बंगळूरू – १३
३. हैदराबाद – १२
४. राजस्थान – १२
५. गुजरात – १२

 

संबंधित पोस्ट

तालुका खरेदी विक्री संघाच्या समझोता एक्सप्रेस ला ब्रेक…?

mrityunjay mahanews

तर तालुका संघ निवडणूक लढण्याची तयारी…

mrityunjay mahanews

भूमी अभिलेखचा कर्मचारी लाचलूचपतच्या जाळ्यात…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!