mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार ५ मे  २०२६

रस्त्यावर खडी पडत असल्याने वाहनधारक आक्रमक…

खडीचे ट्रक रोखलेः पोलीसांची मध्यस्ती, वाहतूक पूर्ववत


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वाटंगी – आजरा रस्त्यावर खडीचे वहातूक सुरु आहे. या ट्रकमधून खडी रस्त्यावर पडत असल्याने वाहने घसरत असून अपघात होत आहेत. त्याचबरोबर अवजड वहानामुळे रस्त्याचीही दुरावस्था झाली आहे. क्रशर ठेकेदारांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारक आज आक्रमक झाले. त्यांनी वाटंगी रस्त्यावर खडीची वहातुक करणारे ट्रक रोखले. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करून मध्यस्ती केल्यावर वहातूक पूर्ववत झाली. याबाबत संबंधीत ठेकेदाराने कार्यवाही न केल्यास भविष्यात वहातूक रोखण्याचा इशाराही वहानधारक व वाटंगी ग्रामस्थांनी दिला आहे.

वाटंगी रस्त्यावर क्रशर आहेत. येथून खडीची वहातूक मोठ्या प्रमाणात वहानधारक करीत असतात. या वहानातून खडी थेट रस्त्यावर पडते. यामुळे रस्त्यावरून वाहनधारकांना प्रवास करतांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वहाने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर अवजड वहानामुळे रस्ता ठिक ठिकाणी खड्डे पडून उखडला आहे. या दोन तीन दिवसात वहाने घसरून चार पाच जण जखमी झाले असल्याचे वाहनधारकांनी सांगीतले. याबाबत बांधकाम प्रशासनाकडे सातत्याने पाठ पुरावा करून देखील प्रशासनाकडून गांभिर्य दाखवले नाही. कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

यामुळे संतापून वाटंगी ग्रामस्थ व वहानधाकरांनी खडीचे भरलेले ट्रक अडवले. दरम्यान पोलीसांना याची माहीती मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत वहानधारकांची समजूत काढली. वाहतूक पूर्ववत केली. वाहनधारक व ग्रामस्थांशी चर्चा केली. संबंधीत ठेकेदारांना बोलवून रस्ता सुरक्षित करण्याबाबत सूचना देणार असल्याचे सांगितले.

जिल्हा नियोजन’ मधून भादवणला रुग्णवाहिका

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

‘जिल्हा नियोजन’च्या फंडातून कोल्हापूर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आणि गतीमान करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार श्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागाला ५ नवीन रुग्णवाहीका प्रदान केल्या.

शिवसेना तालुका प्रमुख उप सरपंच श्री संजय पाटील आणि सभापती सौ. जयश्री गाडे यांनी पालक मंत्री महोदयांच्याकडे भादवण व परीसरातील २२ गावाच्यांसाठी रुग्ण वाहीकेची मागणी केली होती. जुनी रुग्णवाहिका नादुरुस्तीमुळे वापरण्यात अडचण येत होती. भादवण आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सुमारे २२ गावांमध्ये सर्पदंश, अपघात व इतर तातडीची आरोग्य सुविधा पुरवताना यामुळे मोठी अडचण येत होती ती अडचण नव्या रुग्णवाहिकेमुळे संपुष्टात येणार आहे.

काल समारंभपूर्वक भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राला नविन रुग्णवाहीका प्रदान केली. रुग्णवाहिकेची चावी स्वीकारते वेळी आजरा तालुका सभापती भादवण सौ. जयश्री गाडे, संजय गाडे भादवण प्राथमीक आरोग्य केंद्रांचे कर्मचारी जिल्हा आरोग्य आधिकारी पिंपळे व इतर मान्यवर उपस्थित होते ‌.

उत्तूरमध्ये ‘संस्कार शिदोरी’ शिबिराचा शुभारंभ:
मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सध्याच्या डिजिटल युगात कमी वयातच मुलांच्या हातात मोबाईल येत असून त्यांचा प्रत्यक्ष संवाद, संस्कार आणि पारंपारिक खेळांपासून दूर जाण्याचा वाढता कल चिंतेचा विषय ठरत आहे. ही बाब लक्षात घेऊन चिमणे (ता. आजरा) येथील राहुल मोरे, त्यांची पत्नी स्नेहा मोरे तसेच सहकारी श्रद्धा येसादे यांनी उत्तूर येथे ‘संस्कार शिदोरी’ शिबिराचे आयोजन केले आहे.

या शिबिराचे उद्घाटन सरपंच किरण आमणगी यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी त्यांनी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित करत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
शिबिरामध्ये मुलांना झाडे लावण्याचे महत्त्व, पारंपारिक खेळ, आहारविषयक ज्ञान, प्रभावी संवाद कौशल्य, मोबाईल व दूरदर्शनचे दुष्परिणाम यांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच ऐतिहासिक गोष्टींच्या माध्यमातून संस्कारमूल्ये रुजवण्यावर भर दिला जात आहे. यासोबतच योग, वक्तृत्व, पेंटिंग, हस्ताक्षर अशा विविध कौशल्यांचा विकास घडविणारे उपक्रमही राबवले जात आहेत.
मे महिन्याच्या सुरुवातीलाच वेगळ्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या या शिबिराला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून उत्तूर येथील तलावाजवळील आपटे हॉलमध्ये शिबिर सुरू आहे. इच्छुकांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

बारावीत ८६ टक्के गुण मिळवीत दर्डेवाडीची धनश्री केरकर महाविद्यालयात प्रथम तर केंद्रात दुसरी


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

बारावीच्या बोर्ड परीक्षेत आजरा महाविद्यालयातील व्यावसायिक विभागाकडील बँकिंग अभ्यासक्रमाची धनश्री दिगंबर केरकर ८६ टक्के गुण मिळवीत आजरा महाविद्यालयात प्रथम तर आजरा केंद्रात दुसरी आली आहे. याच विभागाची सानिका सुतार ८५.५० टक्के गुण मिळवून महाविद्यालयात दुसरी व केंद्रात तिसरी आली आहे.

विभागानुसार निकाल व गुणवंत विद्यार्थी…

व्यावसायिक विभाग ( बँकिंग अभ्यासक्रम ) – १०० टक्के
प्रथम – धनश्री केरकर ८६ टक्के, द्वितीय – सानिका सुतार – ८५.५० टक्के, तृतीय – महेश्वरी दोरुगडे – ८१.१७ टक्के.
इलेक्ट्रिकल अभ्यासक्रम -( १०० टक्के ) प्रथम अनिकेत कांबळे – ७१.३३ टक्के, द्वितीय – विघ्नेश मराठे – ७१ टक्के, तृतीय – प्रणव कांबळे.
विज्ञान शाखा – ( ९८.२३ टक्के ) प्रथम – राखी नवार – ८३.५० टक्के, द्वितीय – भक्ती परुळेकर – ८२.६७ टक्के, तृतीय – आदिती गावडे – ८०.६७ टक्के.
वाणिज्य शाखा – ( ७५.२० टक्के ) प्रथम – विपुल इंगळे – ८०.८३ टक्के, द्वितीय – साक्षी रेडेकर – ७८.५० टक्के, तृतीय – सुशील बोलके – ७८.३३.
कला शाखा – ( ८०.८५ टक्के )
प्रथम – वंदना कस्तुरे – ७०.६७ टक्के, द्वितीय – सिद्धीका शिखलगार – ६६.१७, तृतीय – माधुरी कांबळे – ६४.८३ टक्के.

कोळींद्रे, साळगाव गावे सजली

महालक्ष्मी देवीची यात्रा आजपासून सुरु… मंदिरावर विद्युत रोषणाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील कोळींद्रे व साळगाव येथे आजपासून महालक्ष्मी यात्रा सुरू होत आहे. पारंपारिक लक्ष्मी खेळवण्याचा कार्यक्रम आज रात्री होणार आहे तर बुधवार (ता. ६) यात्रेचा मुख्य दिवस आहे.

यात्रेनिमिरल आनंदाचे व चैतन्याचे वातावरण आहे.

कोळींद्रे गावची २१ वर्षानंतर तर साळगावची १७ वर्षानंतर यात्रा होत आहे. यांत्रेनिमित्त घरांची रंगरंगोटी करण्यात आली असून मंदिराच्या सजावटीसह मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेसाठी मुंबई, पुणे येथून मोठ्या प्रमाणात चाकरमानी परतला आहे. यात्रेनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन्ही गावांमध्ये मेवा मिठाईच्या दुकानांसह पाळणे व मनोरंजनाचे विविध स्टॉल थाटण्यात आले आहेत. उद्या बुधवारी जेवणावळींचे आयोजन करण्यात आले आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : ५ मे २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : चतुर्थी तिथी
नक्षत्र : ज्येष्ठा नक्षत्र (दुपारी १२.५४ पर्यंत) त्यानंतर मूळ नक्षत्र
योग : शिवा योग ( ६ मे रात्री १२.१६ पर्यंत) त्यानंतर सिद्ध योग
करण : भाव करण (सायंकाळी ०६.३७ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी (दुपारी १२.५४ पर्यंत) त्यानंतर धनु राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.४८ ते सायंकाळी ०५.२५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१० ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.१०
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०१
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज 

काल सोमवारी झालेल्या मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्यात मुंबईने लखनऊचा पराभव केला ३२ चेंडू ८३ धावा काढणाऱ्या मुंबईच्या रायन रिकेल्टनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

आजचा सामना

दिल्ली विरुद्ध चेन्नई

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

गुणवतक्ता…

१. पंजाब – १३
२. बंगळूरू – १३
३. हैदराबाद – १२
४. राजस्थान – १२
५. गुजरात – १२

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याला न्याय देण्यास महाराष्ट्र शासन बांधील… पालकमंत्री केसरकर

mrityunjay mahanews

अशोकअण्णा यांना विधानपरिषद अथवा महामंडळावर संधी द्यावी…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!