mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार ६ मे  २०२६

साळगाव महालक्ष्मी यात्रेस सुरुवात…
गुलालाच्या उधळणीत लक्ष्मी खेळवण्याचा कार्यक्रम

आजरा : मृत्यूंजय महान्यूज वृत्तसेवा

साळगाव येथे काल मंगळवारी रात्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त लक्ष्मी खेळवण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुलालाची उधळण करत लक्ष्मी खेळण्यात आली.

यावेळी यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह आजरा तालुकावाशीयांनी साळगाव मध्ये मोठी गर्दी केली होती.

आज बुधवार हा यात्रेचा मुख्य दिवस असून दुपारनंतर स्नेह भोजनाचे ठीक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

किटवडेपैकी धनगरवाड्यावरील गौरीचे बारावी परीक्षेत यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

दररोज तीन किलोमीटरची पायपीट,त्यानंतर २३ किलोमीटरचा प्रवास एसटी ने करायचा. ऊन, वारा, पाऊस व जंगली जनावरांचे दर्शन दैनंदिनच या पार्श्वभूमीवर मोठ्या संघर्षातून किटवडेपैकी धनगरवाडा ( ता. आजरा ) येथील गौरी शेळके या आजरा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने बारावी बोर्ड परीक्षेत ६८.५० टक्के गुण मिळवून ऊन, वारा, पाऊस यांच्याशी संघर्ष करीत घवघवीत यश मिळविले आहे. तिच्या संघर्षातून मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. वडिलांचे करोनामध्ये निधन झाले. आई सुनीता यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. मनात शिकण्याची जिद्द होती पण आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण थांबण्याची भिती वाटत होती. अशा स्थितीत दहावीच्या परीक्षेनंतर सावंतवाडीत एका खाजगी दवाखान्यात काम केले. अकरावीत प्रवेश घेण्याचे निश्चीत केले आणि आजरा महाविद्यालयातील व्यावसायिक विभागातील बँकिंग अभ्यासक्रमाकडे प्रवेश घेतला.व तिने स्वतःला सिद्ध करून दाखवले.

क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान मडिलगेत संपन्न.

आजरा : मृत्यूंजय महान्यूज वृत्तसेवा

मडिलगे उपकेंद्र येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान संपन्न झाले. या अभियानात २११ नागरिकांनी लाभ घेतला.

क्षयरोगाचे लवकर निदान करणे व पूर्ण उपचार देणे क्षयरोग निदानासाठी तपासणीला प्रोत्साहन देणे, क्षयरुग्ण व त्यांच्या कुटुंबास मदत करणे,क्षयरोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तीस तपासणीसाठी प्रवृत्त करणे अशी उद्दिष्टे ठेवून मडिलगे सरपंच यांच्या उपस्थितीत राबवणेत आले.

यावेळी सरपंच बापू निऊंगरे, ग्रामपंचायत सदस्या, सदस्य ज्येष्ठ नागरिक यांच्यासह २११
नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेतला. सदर अभियान राबविण्यासाठी प्रयोगशाळा पर्यवेक्षक काजल देसाई, उपचार पर्यवेक्षक संग्राम पाटील, आरोग्य अधिकारी अमोल चव्हाण, आरोग्य सेविका विद्या भोसले, दिपाली गोईलकर, आरोग्य सेवक देविदास बोंबले, आशा सेविका सुमन कुंभार, संगीता पाटील, वैशाली, अर्धवेळ परिचर पुजा येसने यांनी या अभिनयासाठी परिश्रम घेतले ‌.

चाफवडे उपसरपंच पदी विजय भडांगे


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

ग्रामपंचायत चाफवडेच्या उपसरपंच पदी श्री.विजय नारायण भडांगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

याप्रसंगी निवड प्रक्रिया अधिकारी श्री.विक्रम देसाई, ग्रामपंचायत सरपंच श्री.धनाजी आप्पा दळवी,सदस्य श्री. धोंडिबा नारायण गावडे, सदस्या सौ.सुप्रिया पांडूरंग ठाकर, सौ.तनुजा तुकाराम बापट, सौ.स्मिता बाळू घेवडे उपस्थित होते.

छायावृत्त


नसरापूर व पुलाची शिरोली येथील घटनांचा निषेध करत याबाबतचे खटले फास्ट कोर्टात चालवून आरोपींना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा करावी अशा मागणीचे निवेदन उपसभापती सौ. यशोदा युवराज पोवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदार समीर माने यांच्याकडे सुपूर्द केले.

IPL च्या धर्तीवर उत्तूरमध्ये भव्य स्पर्धा

संयुक्त सरपंच चषक २०२६ ची रंगत वाढली!

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

ग्रामपंचायत उत्तूर व स्पोर्ट्स अकॅडमी उत्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त सरपंच चषक २०२६ या क्रिकेट स्पर्धेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून, या स्पर्धेतील सर्वात मोठे आकर्षण असलेले IPL च्या धर्तीवर भव्य लिलाव होणार आहे. उत्तूरमध्ये प्रथमच अशा प्रकारची Cash Based Auction पद्धत राबविण्यात येत असल्याने खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. या लिलावामध्ये सहभागी खेळाडूंवर त्यांच्या कामगिरीनुसार आणि क्षमतेनुसार संघ मालकांकडून बोली लावली जाणार असून, ज्या खेळाडूंवर जास्त बोली लागेल त्यांना त्यानुसार मानधन दिले जाणार आहे.

ही स्पर्धा गावातील वार्षिक क्रीडा महोत्सवाची सुरुवात ठरणार असून, वर्षभर विविध क्रीडा स्पर्धा घेण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, त्यांनी मैदानावर येऊन आपली कला सादर करावी आणि क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा अधिक भव्य स्वरूपात पार पडणार आहे.
या स्पर्धेचे नियोजन अनिल लोखंडे, दत्ता माने, वैभव कुराडे, सचिन फाळके,तानाजी गिरी, संतोष शिवणे, सुहास पोतदार, महेश कांबळे, प्रशांत ढोणुक्षे, सुनील चव्हाण, सुधीर सावेकर व मंदार हळवणकर हे करत आहेत.

आजचे पंचांग 

दिनांक : ६ मे २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : चतुर्थी तिथी (सकाळी ०७.५१ पर्यंत) त्यानंतर पंचमी तिथी
नक्षत्र : मूळ नक्षत्र (दुपारी ०३.५३ पर्यंत) त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र
योग : सिद्ध योग (७ मे रात्री ०१.११ पर्यंत) त्यानंतर साध्य योग
करण : बलवा करण (सकाळी ०७.५१ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : धनु राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.३५ ते दुपारी ०२.१२ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.०९
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०१
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

दिनांक : ५ मे २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : चतुर्थी तिथी
नक्षत्र : ज्येष्ठा नक्षत्र (दुपारी १२.५४ पर्यंत) त्यानंतर मूळ नक्षत्र
योग : शिवा योग ( ६ मे रात्री १२.१६ पर्यंत) त्यानंतर सिद्ध योग
करण : भाव करण (सायंकाळी ०६.३७ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी (दुपारी १२.५४ पर्यंत) त्यानंतर धनु राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.४८ ते सायंकाळी ०५.२५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१० ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.१०
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०१
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

निधन वार्ता
गणपती होडगे

मसोली ता. आजरा येथील सेवानिवृत्त तलाठी गणपती विठ्ठल होडगे (वय -७८ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. येथील माजी सरपंच,उद्योजक सुरेश होडगे व सुधाकर होडगे यांचे ते वडील होत, त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

रक्षा विसर्जन गुरुवार दि. ७ मे रोजी मसोली येथे आहे..

यशोदा सुतार


कोळींद्रे ता.आजरा येथील ज्येष्ठ महिला वारकरी श्रीमती यशोदा हरिबा सुतार ( वय ९२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून,नातवंडे, चार विवाहित मुली असा परिवार आहे.

दिवसकार्य शुक्रवार दिनांक १४ मे रोजी होणार आहे.

आयपीएल न्यूज 

काल मंगळवारी झालेल्या दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यांमध्ये चेन्नईने दिल्लीला १५५ धावांवर रोखत आठ गडी व १५ चेंडू राखून पराभूत केले.

आजचा सामना

हैदराबाद विरुद्ध पंजाब

वेळ : सायंकाळी ७.३०

गुणवतक्ता…

१. पंजाब – १३
२. बंगळूरू – १३
३. हैदराबाद – १२
४. राजस्थान – १२
५. गुजरात – १२

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जनता सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक निकाल…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आंबोलीत ‘मुसळ’धार … आजऱ्यात ‘कोसळ’धार …

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews
error: Content is protected !!