mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरुवार  दि. ७ ऑगस्ट २०२५         

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या आजरा तालुकाध्यक्षपदी गुंडू परीट, शहराध्यक्षपदी अभिषेक रोडगी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या आजरा तालुकाध्यक्षपदी गुंडू मारुती परीट (एरंडोल) यांची तर आजरा शहराध्यक्षपदी अभिषेक सदानंद रोडगी यांची निवड करण्यात आली. ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आजरा येथे झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या.

आजरा तालुक्याची नूतन कार्यकारणी : गुंडू मारुती परीट (तालुकाध्यक्ष), देविदास कृष्णा सूर्यवंशी (तालुका उपाध्यक्ष), किरण केसरकर (तालुका उपाध्यक्ष), मंगेश परशराम पोतनीस (तालुका सचिव), विकास सुतार (तालुका सहसचिव), सचिन इंदुलकर (तालुका कोषाध्यक्ष), नाथ देसाई (तालुका निमंत्रित मार्गदर्शक), अभिषेक सदानंद रोडगी (आजरा शहराध्यक्ष), दीपक बल्लाळ (आजरा शहर उपाध्यक्ष), राजश्री सावंत (तालुका महिला अध्यक्षा), गीता पोतदार (तालुका महिला उपाध्यक्ष), दिपाली सुतार (तालुका महिला उपाध्यक्ष), ज्योती पांडव (तालुका महिला सचिव)

शिरसंगीच्या रवळनाथ विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी मधुकर येलगार, धोंडीबा कुंभार उपाध्यक्ष

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिरसंगी तालुका आजरा येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी मधुकर गोपाळ येलगार तर उपाध्यक्षपदी धोंडीबा हरि कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहाय्यक निबंधक सुजयकुमार यजरे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक पार पडली.

यावेळी संचालक सुभाष देसाई, विठ्ठल चौगुले, चंद्रकांत देसाई, अमृत देसाई, थळबा कांबळे, इंदुबाई सुतार, मंगल देसाई यांच्यासह सचिव सुभाष विष्णू चौगले, जे.एन.बंडगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उत्तूर येथे २२ वर्षांपासून शाहिरी परंपरेला उजाळा…
श्रावणातील दर शनिवारी शाहीरी महोत्सवाचे आयोजन...

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर येथे श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी आयोजित होणाऱ्या शाहिरी महोत्सवाला यंदा २२ वर्षे पूर्ण होत आहेत. शाहीर द.ना. गव्हाणकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा उपक्रम अरळगुंडी (ता. भुदरगड) येथील गुंडू शाहीर कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सातत्याने राबवला जातो.नेहरू चौकातील हनुमान मंदिर परिसरात होणाऱ्या या महोत्सवात कागल, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, आजरा आदी परिसरातील शाहीर कलाकार आपली कला सादर करतात. कोणतीही शासकीय मदत न घेता, स्वखर्चातून हा उपक्रम चालवला जातो.
ढप, तुणतुणे, ढोलकीच्या साथीने पोवाडे, भारूड, गण-गवळण अशा विविध कलाप्रकारातून व्यसनमुक्ती, तंटामुक्ती, लेक वाचवा यांसारख्या विषयांवर प्रभावी प्रबोधन केले जाते.

ग्रामीण भागातील शाहिरी परंपरा टिकवण्यासाठी हा उपक्रम महत्वाची भूमिका बजावत आहे.या महोत्सवाला उत्तूर ग्रामस्थांचा भरघोस पाठिंबा लाभत असून, गेली २२ वर्षे हा उपक्रम अखंडपणे सुरु आहे. उत्तूर येथील सामाजिक कार्यकर्ते भैरू सावंत , शिवलिंग सन्ने , सुजित लोंखडे यांनी सुरु केलेली परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. ग्रामीण भागातील शाहीर कलाकारांसाठी हे व्यासपीठ मोठ्या प्रमाणावर प्रेरणादायी ठरले आहे.

पुणे प्रकरणातील पिडीतेस न्याय देण्यासाठी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची निपक्ष चौकशी करा…

आजऱ्यात विविध संघटनांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सासरच्या जाचाला कंटाळलेल्या विवाहित महिलेला पुणे येथे ठेवून घेऊन मदत करणाऱ्या तीन मुलींच्या कामाच्या ठिकाणी बेकायदेशीरपणे जाऊन त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन मारहाण करण्यात आली व जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली ही बाब गंभीर असून पोलिसांनी बेजबाबदारपणा दाखवला आहे यामुळे ही कृती अतिशय गंभीर असून पोलीस यंत्रणेबाबत शंका उपस्थित करत सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार संघटना आदींनी केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून मुलींना अयोग्य वागणूक देणाऱ्या आणि जातीवादी करणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे नोंद करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

याबाबतचे लेखी निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले असून निवेदनाची प्रत आजरा तहसीलदारांना देण्यात आली आहे. या निवेदनावर कॉ. काशिनाथ मोरे, कॉ. शांताराम पाटील, संजय घाटगे, गीता पोतदार, भिकाजी कांबळे, निवृत्ती मिसाळे, दौलत राणे, रघुनाथ कातकर, हिंदुराव कांबळे, जितेंद्र नांदवडेकर आदींच्या सह्या आहेत.

भादवण येथून सोलर पंप पॅनल लंपास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भादवण ता. आजरा येथील प्रशांत अनंत डोंगरे यांच्या मालकीचे माळ नावाच्या शेतातील सोलर पंपचे पॅनल आणण्यात चोरट्यांनी लंपास केले. याबाबतची फिर्याद प्रशांत डोंगरे यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हाळोली जंगल क्षेत्रात वृक्षारोपण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

 रोजी परिमंडळ धनगरमोळा कडील नियत क्षेत्र हाळोली, मौजे देवर्डे जंगल कक्ष क्रमांक २१३ मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

सदर कार्यक्रमास श्री जी. एम.पाटील, अध्यक्ष सरपंच परिषद, सौ.चाळके,सरपंच देवर्डे, ग्रामपंचायत सदस्य,वनपाल व वनरक्षक धनगरमोळा , वनरक्षक पारपोली,देवर्डे हायस्कूल चे शिक्षक स़जय सावंत, आर.वाय.पाटील, कर्मचारी , विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिरसंगीत भंडारी समाजातर्फे पदाधिकाऱ्यांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिरसंगी ता.आजरा येथे भंडारी समाजामार्फत श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी मधुकर गोपाळ येलगार यांची तर गोठणदेव विकास सेवा संस्थेच्या संचालकपदी अशोक मारुती येलगार यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सुरुवातीला स्वागत व प्रस्ताविक सुनील सातवणेकर यांनी केले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना चेअरमन मधुकर येलगार यांनी भंडारी समाजामार्फत होणारा सत्कार हा गौरवास्पद असून यापुढेही गेली दहा वर्ष रवळनाथ विकाससेवा संस्था उत्तम रित्या चालवली असून यापुढेही संस्था वाढीसाठी चांगले कार्य करून समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी भीमराव मयेकर, विठ्ठल मातवणकर, सुरेश येलगार, माजी उपसरपंच अशोक चौगुले, वसंत येलगार, श्रावण देसाई, धनाजी पताडे , वसंत देवळे ,राहुल येलगार ,राजेंद्र मयेकर, किरण बुरुड उपस्थित होते.

महादेव कुडव यांनी आभार मानले.

निधन वार्ता
तानाजी कांबळे

मेंढोली ता. आजरा येथील कै. तानाजी रामचंद्र कांबळे(वय ४८ वर्षे ) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, बहिण, पत्नी व एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 

छाया वृत्त…

कचरा टाकण्याच्या जागेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर काल कचरा भरलेल्या गाड्या ठिकठिकाणी उभ्या होत्या तर शहरात बऱ्याच ठिकाणी कचरा संकलन करण्यात आले नाही.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात चोरी… सोन्या चांदीचे दागिने लंपास

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

 एसटीच्या विलिनीकरणामुळे २० हजार कोटींचा भार; हा परिवहन मंत्र्यांचा दावा चुकीचा, दिशाभूल करणारा. – मनसे जयराज लांडगे यांचा आरोप.

mrityunjay mahanews

‘उचंगी’ घळभरणी च्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली… जादा पोलीस फौजफाटा तैनात

mrityunjay mahanews
error: Content is protected !!