mrityunjaymahanews
अन्य

Breaking News

मंगळवार  दि. ८ जुलै २०२५         

उत्तुर येथील १३ लाख १५ हजारांच्या चोरीचा तपास…
तिघेजण अटकेत

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       २३ जून रोजी रात्री १० वाजण्याचा सुमारास उत्तुर येथून थांबलेल्या मालवाहू टेम्पोच्या केबिन मधील तब्बल १४ लाख रुपये लंपास करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले असून तिघेही इचलकरंजी येथील आहेत.

       गोवा येथुन इचलकरंजी येथे जाणेसाठी (MH10-AW-8982) या क्रमांकाचा टेंपो नेहमी येत असुन त्या टेंपोच्या पुढील केबीन मध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असते व तो टेंपो उत्तुर येथे आल्यानंतर शिवाजी चौकामध्ये चालक जेवण करण्यासाठी थांबत असतो अशी माहिती शुभम रमेश भोसले, अभिषेक नंदकुमार पोवार, ऋषिकेश सुभाष चौगुले यांना मिळाल्यानंतर त्या टेंपोतील रक्कम चोरी करुन वाटुन घ्यायची असा त्यांनी प्लॅन तयार केला. ठरलेल्या प्लॅन नुसार दिनांक २३ रोजी रात्री १० वा चे सुमारास अभिषेक पोवार व ऋषिकेश चौगुले हे अभिषेक पोवार याचेकडील दुचाकी वरुन उत्तुर येथील शिवाजी चौक येथे गेले व चौकामध्ये चालक जेवण करण्यासाठी थांबलेल्या MH10-AW-8982 या क्रमांकाच्या टॅपोच्या केबीन मधुन रोख रक्कम चोरी केली व निघुन इचलकरंजी येथे परतले. तसेच चोरलेली रक्कम शुभम याने ऋषिकेश चौगुले याचे घरी ठेवली. त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर तिसरा आरोपी ऋषिकेश चौगुले यास त्याचे नारळ चौकातील घरातुन पोलीसांनी ताब्यात घेतले.

       सदर आरोपीकडून रोख रक्कम १३,१५,०००/- रुपये व गुन्हयात वापरलेली ॲक्सेस मोटर सायकल ( MH09-FW-5090 ) व मोबाईल हँडसेट असा एकूण १४,६५,०००/- रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करणेत आला आहे.

      शुभम रमेश भोसले (वय २७ रा. लिगाडे मळा इंचलकरंजी ता. हातकंगणले जि. कोल्हापूर ) अभिषेक नंदकुमार पोवार ( वय २४ इचलकरंजी ता हातकंणगले जि. कोल्हापूर) व ऋषिकेश सुभाष चौगुले ( वय २७ रा. नारळ चौक इंचलकरंजी ता हातकंगणले जि. कोल्हापूर ) यांना ताब्यात घेवुन आजरा पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

      गुन्हयाचा पुढील तपास आजरा पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

      सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार , अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार समीर कांबळे ( भादवण/आजरा) , प्रविण पाटील, दिपक घोरपडे, विशाल चौगुले, रोहीत मर्दाने आदींनी केली.

 

 

संबंधित पोस्ट

आजरा नगरपंचायतीच्या सभापती निवडी बिनविरोध

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

हाजगोळी बंधाऱ्यात महिलेचा मृतदेह आढळला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पेदात गोम्स यांचे निधन… शिवजयंतीनिमित्त होणार महिलांच्या लेझीम स्पर्धा… तर सर्फनाला धरणाचे काम १४ फेब्रुवारी पासून बंद करणार… तालुका कोरोना अपडेट्स

mrityunjay mahanews
error: Content is protected !!