mrityunjaymahanews
अन्यकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

Breaking News…

शुक्रवार  २७ जून २०२५              

पोळगाव येथील एकाची चित्री नदीत उडी…

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजारी आहे म्हणून आजरा येथे उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना पोळगाव त्या.आजरा येथील गुणाजी गोविंद खामकर (वय ४९ वर्षे ) यांनी चालती मोटरसायकल थांबवण्यास सांगून पोळगाव पुलावरून भाचा व पत्नी समोरच चित्री नदीपात्रात उडी घेतल्याची घटना घडली आहे. सध्या त्यांचा शोध सुरू आहे.

       याबाबत त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेली माहिती अशी…

      पोळगाव येथील गुणाजी हे मुंबई येथे असतात. ते आजारी असल्याने आठ दिवसांपूर्वी गावी आले होते. त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले होते. कालच त्यांना पोळगाव येथे घरी आणले आहे.

     आज त्यांचा भाचा संदीप धनवडे व पत्नी अर्चना यांना त्यांनी पोटात दुखत आहे असे सांगितल्याने त्यांना दवाखान्यात दाखवण्यासाठी आजरा येथे घेऊन जात असताना गाडीच्या मागे बसलेल्या गुणाजी यांनी पाय दुखत आहे असे सांगत मोटरसायकल थांबवण्यास सांगितली. मोटरसायकल थांबताच खाली उतरून पोळगाव येथील पुलावरून चित्री नदीपात्रात दोघांसमोर उडी घेतली. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. ग्रामस्थ त्यांचा नदीपात्रात शोध घेत आहेत.

      घटनास्थळी तहसीलदार समीर माने यांनी भेट देऊन माहिती घेतली तर सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत. आजाराला कंटाळून त्यांनी सदर प्रकार अवलंबला असल्याची शक्यता वर्तवली जात  आहे.

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा साखर कारखान्याच्या वतीने ऊस विकास परिषद संपन्न…. भाजपाची मंगळवारी आजऱ्यात बैठक…उचंगी प्रकल्पस्थळी मंगळवारी धरणग्रस्त लढा परिषद

mrityunjay mahanews

अंतिम टप्प्यात जिल्हा बँकेकरिता आजऱ्यात धुमशान… कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशनचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ज्योतिप्रसाद सावंत यांना

mrityunjay mahanews

तुम्ही पुन्हा आलात… कशाला? आमचे वाटोळे लावायला?

mrityunjay mahanews

करवाढीविरोधात आजरेकर एकवटले

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!