


अंतिम टप्प्यात जिल्हा बँकेकरिता आजऱ्यात धुमशान :संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून
……. ✍️ज्योतिप्रसाद सावंत…
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे धुमशान अंतिम टप्प्यात असून आजरा तालुक्यात होणाऱ्या होत असलेल्या अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख व विद्यमान संचालक अशोकअण्णा चराटी व आजरा साखर कारखान्याचे संचालक व माजी उपाध्यक्ष सुधीर देसाई यांच्यातील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर विद्यमान संचालक चराटी यांच्याविरोधात कोण ? असा प्रश्न तालुक्यातून उपस्थित केला जात होता. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई व सुधीर देसाई असे दोनच पर्याय सुरुवातीपासून राष्ट्रवादीमध्ये चर्चेत होते. सुधीर देसाई यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने सुरुवातीला चराटी ही बाजी अलगदपणे मारतील अशीही चर्चा होती. चराटी यांच्या पाठीशी असणारा संस्था समूह व त्यांची निवडणूक यंत्रणा पाहता यामध्ये तथ्यही होते. निवडणूक प्रक्रियेळा न्यायालयीन ब्रेक लागण्यापूर्वी चराटी यांची गाडी सुसाट होती. परंतु निवडणूक कार्यक्रम रेंगाळल्यानंतर मात्र ठराव धरकांवरील पकड थोडी ढिली पडली. याचा नेमका फायदा सुधीर देसाई व त्यांच्या सहका-यांनी उठवत या निवडणुकीमध्ये प्रचंड चुरस निर्माण केली आहे.
आजमितीस चराटी व देसाई यांच्याकडून विजयाचा दावा केला जात असला तरीही दोघांना निवडणूक फारशी सोपी नाही याची जाणीव आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दोघांनीही आपल्या ठराव धारकांना अज्ञात स्थळी पाठवले आहे. मतदानादिवशी ठरावधारक हजर होतील. चराटी यांच्यासमोर उभे राहण्याचे आव्हान जिल्हा बँकेच्या राजकारणात नव्यानेच येऊ पाहणाऱ्या देसाई यांनी ताकदीने पेलण्याचा प्रयत्न केल्याचेही स्पष्ट होत आहे. चार दिवसावर मतदान प्रक्रिया आहे. ‘१०६’ ठरावधारक मतदारांपैकी ‘५४’ ही मॅजिक फिगर गाठणारा उमेदवार विजयाचा गुलाल उधळणार असून सध्या मोजकेच ठरावधारक बाहेर दिसत आहेत. सुधिर देसाई विद्यमान संचालक अशोकअण्णा चराटी यांना पराभूत करून ‘जायंट किलर’ ठरणार… की अशोकण्णा पुन्हा एकदा जिल्हा बँकेवरील राजकीय वर्चस्व सिद्ध करून दाखवणार… याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
जिल्हा बँक निकालावर भविष्यातील अनेक राजकीय घडामोडी अवलंबून
जिल्हा निवडणूक निकाल काय लागणार यावर आजरा तालुक्यातील भविष्यातील अनेक राजकीय घडामोडी अवलंबून राहणार आहेत . जिल्हा बँके पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती सह आजरा साखर कारखाना, जनता बँक, तालुका खरेदी विक्री संघ या संस्थांमधील निवडणुकांच्या दिशा स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे या निवडणुक निकालावर अनेक राजकीय घडामोडी अवलंबून राहणार आहेत.आहेत.


कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशनचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ज्योतिप्रसाद सावंत यांना

. …कोल्हापूर प्रतिनिधी..
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशन कोल्हापूर यांच्यावतीने आजरा येथील ज्येष्ठ पत्रकार ‘मृत्युंजय महान्यूज’ चे मुुुुख्य संपादक ज्योतिप्रसाद सावंत यांना जाहीर झाला आहे. रविवार ९ जानेवारी २०२२ रोजी पत्रकार दिन व पत्रकार पुरस्कार गौरव सोहळा संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे ( ता. हातकणंगले) येथे सकाळी १० वाजता दैनिक सकाळ माध्यम समुहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली सदर पुरस्कार वितरण होणार आहे. या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. शैलेश बलकवडे , संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, संजय घोडावत पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य विराट गिरी, कार्यकारी संपादक बी न्यूजताज मुल्लाणी , दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार समिर देशपांडे, दैनिक नवराष्ट्रचे आवृत्ती प्रमुख दीपक घाटगे आदी मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होणार आहे. ज्योतिप्रसाद सावंत यांना यापूर्वी जिल्हा परिषदेचा पहिला आचार्य अत्रे तालुकास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाला आहे. सह्याद्री लाईव्ह च्या वतीने त्यांचा आदर्श पत्रकार म्हणून गौरव करण्यात आला आहे. दैनिक लोकमतच्या वतीने’ स्टार बातमीदार’ म्हणूनही त्यांचा गौरव झाला आहे .आजरा येथील आनंदराव कोरगावकर ट्रस्ट तर्फेही त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांचे यांच्यासह ठिकाणी यांचा यथोचित सन्मान झाला आहे. अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी शिक्षण शास्त्रातील पदवीी प्राप्त सावंत हे २७ वर्षे ते वृत्तपत्र क्षेत्रामध्ये पूर्णवेळ पत्रकारिता करीत आहेत यापूर्वी त्यांनी दैनिक पुढारी व दैनिक लोकमत करिता आजरा तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले. आहे सध्या ते ‘मृत्युंजय महान्यूज’ या पोर्टल चॅनलचे मुख्य संपादक म्हणून काम पाहतात. नुकतीच त्यांच्यावर नवभारत ग्रुपच्या नवराष्ट्र या दैनिकाची आजरा तालुका प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तालुक्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व राजकीय चळवळीमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. राजकीय विश्लेषक अशीही त्यांची ओळख आहे. चौफेर लिखाणाची क्षमता असलेल्या पत्रकार सावंत यांना मिळालेल्या सदर पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


पंडित दीनदयाळ शिक्षण संकुलात ‘माझी वसुंधरा ‘शपथ कार्यक्रम

स्वामी विवेकानंद शिक्षण व संस्कृती प्रसारक मंडळ, आजरा संचालित पं. दीनदयाळ विद्यालय व आर्टिस, कॉमर्स अॅण्ड सायन्स ज्यु. कॉलेज मध्ये आजरा नगरपंचायत आजरा यांच्या तर्फे ‘माझी वसुंधरा’ शपथ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना ‘वसुंधरा वाचवा’ चा संदेश व शपथ देण्यात आली. आजरा नगरपंचायतीचे अधिकारी करपे यांनी आपल्या भाषणातून वसुंधरा कशी वाचवावी, प्लॅस्टिकचा वापर का टाळावा, पाण्याचा योग्य वापर कसा करावा, वृक्षारोपणाचे फायदे… इत्यादी विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांकडून ‘वसुंधरा वाचवा’ ची शपथ घेतली.
त्याचबरोबर विद्यालयात, रांगोळी स्पर्धा, निबंधस्वधी, काव्यवाचन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, आयजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देवून गौरवण्यात आले. यावेळी प्राचार्य विजय राजोपाध्ये यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.





