आज-यात तिघांचा बुडून मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आज-यापासून जवळच असणाऱ्या चित्रा नदीवरील परोली बंधाऱ्यांमध्ये सुट्टी निमित्त पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मध्ये ॲड.रोझारीओ अंतोन कुतिन्हो,फिलीप अंतोन कुतिन्हो,
लाॅईड पास्कोन कुतिन्हो या तिघा कुत्हिनो बंधूंचा समावेश आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की…
कुतीन्हो बांधव ख्रिसमस निमित्त आजरा येथील आपल्या घरी चर्च गल्ली येथे दोन दिवसापासून एकत्र आले होते.आज दुपारी नातेवाईकांच्या साखरपुडा कार्यक्रमातील जेवणानंतर ते सुट्टी निमित्य जवळच असणाऱ्या परोली बंधाऱ्यांमध्ये पोहण्यासाठी मुलाबाळांसह गेले होते.
बंधाऱ्याच्या वरील बाजूस पाणी अडवले असल्याने त्यांचा पाण्यातच बुडून मृत्यू झाला. तातडीने ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून तीनही मृतदेह बाहेर काढले आहेत.
मृतांपैकी लॉईड पास्कल कुतिन्हो हा ३५ वर्षीय विवाहित तरुण असून त्याच्या पश्चात पत्नी व लहान मुलगा असा परिवार आहे तर फिलिप आंतोन कुतिन्हो हा चाळीस वर्षीय विवाहित असून असून तो पुणे येथे कामाला आहे. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.
ॲडवोकेट रोजारीओ कुतिन्हो हे तिसरे मयत ४८ वर्षीय विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.
सदरची वृत्त समजताच आजरा शहरवासीयांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती.
तातडीने स्थानिक तरुणांनी शोध मोहीम राबवून तीनही मृतदेह पाण्याबाहेर काढले.

महिला वर्गाचा आक्रोश…
सदर घटना व आजचा दिवस कुतींन्हो कुटुंबीयांच्या दृष्टीने अतिशय वाईट ठरला. सणानिमित्त एकत्र आलेली सर्व पाहुणे मंडळी घटनास्थळी आक्रोश करताना दिसत होती. महिलांनी तर टाहो फोडला होता.




