mrityunjaymahanews
अन्य

अशोकअण्णा वाढदिवस विशेष…

गुरुवार दि.१४ नोव्हेंबर २०२४

 ‘अवलिया ‘ शोण्णा

     अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी यांचा आज वाढदिवस… त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा थोडक्यात आढावा…

      एखादा निर्णय घेतला की त्या निर्णयावर ठाम राहून शेवटपर्यंत लढण्याची जिद्द बाळगणारे व पाठीमागे असणाऱ्या कार्यकर्त्यांना नेहमी ऊर्जा देणारे ‘अवलिया ‘ व्यक्तिमत्व म्हणजे अशोकअण्णा चराटी होय.

      घरातूनच राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू मिळाले असले तरीही राजकारण, सहकार , शिक्षण व सांस्कृतिक पटलावर स्वतःची स्वतंत्र अशी वेगळी ओळख निर्माण करण्यात ते निश्चितच यशस्वी झाले आहेत असे गेल्या काही वर्षाच्या व त्यांच्या वाटचालीतून स्पष्ट होते.

       स्व. काशिनाथअण्णा चराटी व स्व. माधवरावजी देशपांडे यांच्या आकस्मिक निधनानंतर तालुका वासीयांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने वेळोवेळी तालुका वासियांना दिली आहेत.

       आपल्या संस्था समूहातील प्रत्येक संस्थेशी संबंधित घटकांचे ‘ ऊर्जा स्त्रोत ‘ म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे संघर्षातून प अशोक चराटी यांचे नेतृत्व पुढे आले. त्यांच्या सहकाऱ्यांनीही अण्णांचा शब्द प्रमाण मानून संस्था समूह वाढीमध्ये त्यांना केलेले सहकार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

     एकीकडे सहकार अडचणीत असताना आजरा अर्बन बँक, आण्णा भाऊ आजरा सूतगिरणीसह इतर अनेक छोट्या-मोठ्या सहकारी संस्था चराटी यांच्या नेतृत्वाखाली आदर्शवत पद्धतीने सुरू आहेत.

      सहकारातील या संस्थाच नव्हे तर जनता शिक्षण संस्था, नवनाट्य मंडळ, श्रीमंत गंगामाई वाचनालय, आजरा नगरपंचायत यांचा कारभारही उत्कृष्ट पद्धतीने चालवून दाखवला आहे.

      कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, आजरा साखर कारखाना अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, वस्त्रोद्योग महामंडळाचे संचालक म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. सत्ता कोणाचीही असो आमदार, खासदार कोणीही असो विकास कामांमध्ये निधी आणण्यात त्यांचे वेगळे कौशल्य आहे.

        परिणामांची फारशी तमा न बाळगता ‘बरे’ बोलण्यापेक्षा ‘खरे’ बोलून व्यक्त होणे हा त्यांचा वेगळा स्वभाव . जाहीर व्यासपीठावरून थेट वक्तव्ये करून आपल्याकडून झालेल्या एखाद्या चुकीची कबुली देण्यास न कचरण्याबरोबरच समोरचा चुकत असेल तर त्यांची ‘असे चालणार नाही’ असे बजावत कानउघडणी करण्यासही कधीच मागेपुढे न पाहणारे अण्णांनी अनेकांच्या ह्रदयात ‘दिलदार मित्र’ म्हणूनही स्थान मिळवले आहे.

     सत्तरीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या ‘अवलिया तरुणास’ दिर्घायुष्य लाभो हिच सदिच्छा….!!

                 … ज्योतिप्रसाद सावंत

आज कार्यकर्त्यांचा मेळावा

      अशोकअण्णा चराटी यांच्या वाढदिवसानिमित्त संस्था समूहाच्या वतीने आज गुरुवारी सकाळी अकरा वाजता आजरा येथील अण्णाभाऊ सांस्कृतिक सभागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे व संस्था समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन अण्णाभाऊ संस्था समूह आजरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शुभेच्छा सहका-यांच्या….

    “अण्णाभाऊ संस्था समूहाचा आधारस्तंभ म्हणजे अशोकअण्णा आहेत. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची हातोटी असून संस्था समूहाच्या विस्तारासह तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांची सुरू असलेली धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे. अण्णाभाऊ संस्था समूहाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा….!”
                           ...डॉ. अनिल देशपांडे

   “अशोकअण्णा आमचे नेते आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची आपणाला संधी मिळाली हे आमचे भाग्य आहे. त्यांच्या स्वप्नातील आजरा शहर घडवण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत निश्चितच आहोत आणि राहू. आमच्या या नेत्यास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!”
                              … श्री .विलास नाईक


     “सातत्याने धडपडणारे अशोकअण्णा इतर समाजाबरोबरच लिंगायत समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत.समस्त लिंगायत समाजाकडून त्यांना आरोग्यदायी असे दीर्घायुष्य लाभावे अशी सदिच्छा…!
                            …श्री.महेश कुरुणकर

    “जाती-धर्माच्या बंधनात न अडकता सर्वधर्मीयांशी आपुलकीने वागणा-या अशोक अण्णांनी आम्हाला दिलेले प्रेम कदापिही विसरणार नाही. त्यांना आरोग्यदायी असे प्रदीर्घ आयुष्य लाभो हीच इच्छा…!
                                        …असिफ पटेल

       ” नेत्यापेक्षाही आमच्या कुटुंबातील घटक असणाऱ्या बंधुतुल्य अशोकअण्णांकडून यापुढेही आम्हा सर्वांना पुढे जाण्याचे पाठबळ मिळावे. अण्णा तुम्ही यशवंत व्हा… वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!
                    ….श्री. विजययकुमार पाटील

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा समृद्धी प्रोड्यूसर कंपनीच्या संचालकपदी अनिकेत चराटी… तालुका कोरोना अपडेट्स

mrityunjay mahanews

सुळे येथे एकाची आत्महत्या…

mrityunjay mahanews

तोडणी ठेकेदारांकडून 8 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक : आजरा पोलिसात दोन ठेकेदाराविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews
error: Content is protected !!