mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


मृत्यूस कारणीभूत… तिघांना जन्मठेप

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      जानबा गणू वांजळे रा.किणे पैकी चाळोबावाडी यांना जमिनीच्या कारणातून असलेल्या वादातून अर्जुन तुळसाप्पा वांजोळे (वय ५५) संदिप अर्जुन वांजोळे (वय ३२) व रामचंद्र तुळसाप्पा वांजोळे (वय ३५, सर्व रा. मु. पो. किणे पैकी चाळोबावाडी, ता. आजरा , जि कोल्हापूर) या तिघांना मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मोटरसायकल अंगावर घालून व मारहाण करून जखमी केले होते. यातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

       या मृत्यूस जबाबदार धरत अर्जुन तुळसाप्पा वांजोळे (वय ५५) संदिप अर्जुन वांजोळे (वय ३२) व रामचंद्र तुळसाप्पा वांजोळे (वय ३५, सर्व रा. मु. पो. किणे पैकी चाळोबावाडी, ता. आजरा , जि. कोल्हापूर) या तिघांना मा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय कोड नंबर एक यांनी भा दं वि सं कलम ३०२ , ३४ प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दंड १०,०००/- रूपये दंड व दंड न भरलेस २ वर्षे सश्रम कारावास ठोठावण्यात आला आहे.

      २०१५ साली सदर घटना घडली होती.

आई व सासूचे एकाच दिवशी निधन…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजर्‍याच्या माजी सरपंच मैमुनाबी रशीद पठाण यांच्या मातोश्री हवाबी अकबर आगलावे व सासू कुलसुमबी बाबालाल पठाण (रा.नाईक गल्ली) या दोघींचे काल शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. हवाबी आगलावे या आजरा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष बाबालाल आगलावे यांच्या पत्नी होत.

      दोघींच्याही पश्चात मुले, मुली, सूना, जावई, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.

विचित्र अपघातात एक जण गंभीर जखमी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        आजरा – आंबोली मार्गावर नव्या न्यायालयीन इमारती समोरील रस्त्यावर झालेल्या अपघातात विघ्नेश तानाजी मनगूतकर (वय १९, रा. गणेशवाडी) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचाराकरिता गडहिंग्लज येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

       शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकी उघड्या गटर्समध्ये शिरल्याने सदर अपघात झाला.आजरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

निधन वार्ता
भरमू साठे

      कोवाडे ता. आजरा येथील सेवानिवृत्त शिक्षक भरमू संतु साठे (वय ६३ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने काल शुक्रवारी आजरा येथे राहत्या घरी निधन झाले.

     त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

आजरा पोलिसांकडून दंगल काबू नियंत्रण प्रात्यक्षिके


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      बस स्थानक आजरा परिसरात आजरा पोलिसांकडून दंगल काबू नियंत्रण प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाले होते.

 फोटो क्लिक

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजरा येथील आठवडा बाजारामध्ये सजावटीचे साहित्य, मखर, फळे, फुले इत्यादींनी बाजारपेठ सजली होती.


 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

झेप ॲकॅडमीचे मंगळवारी आजरा शाखा उद्घाटन

mrityunjay mahanews

प्रभाग १४ चा आश्वासक चेहरा : सिद्धेश नाईक

mrityunjay mahanews

आंबोलीत ‘मुसळ’धार … आजऱ्यात ‘कोसळ’धार …

mrityunjay mahanews

पोलिसी वृत्त

mrityunjay mahanews
error: Content is protected !!