mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


वाटंगीत हत्तीचा धिंगाणा…

रोप, तरवे, भात, ऊस पिकांचे प्रचंड नुकसान...


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     वाटंगी ता.आजरा येथे गेले १५ दिवसापासून ठाण मांडून असलेल्या हत्तीने शेती पिकामध्ये अक्षरशः धिंगाणा घातला असून शेतीकामांचा डोंगर समोर असताना हत्तीच्या या त्रासाने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

      मानी शेत, जकन शेत परीसरात प्रचंड नुकसान केले आहे.सुरेश बिरजेंच्या पावर ट्रिलरचे नुकसान केले असून विलास कुंभार, विश्वास कांबळे,आनंदा मलगोंडे शेतकऱ्यांच्या भात,तरवा , ऊस आदीचे नुकसान केले आहे. वन खात्याकडून मात्र या नुकसान सत्राची फारशी दखल घेतली जात नसल्याचे दिसत आहे

     हत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा व नुकसान ग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सरपंच संजय पोवार व ग्रामस्थ करीत आहेत.

पेरणोली येथे कॉ. संपत देसाई यांचा सत्कार

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     राजकीय, सामाजिक, शैक्षणिकसह वैचारीक क्षेत्रात पेरणोली या गावची वेगळी ओळख आहे. ही ओळख सर्वदूर पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. गावच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे राज्याचे कार्याध्यक्ष का. संपत देसाई यांनी केले.

     ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ हे पुस्तक शिवाजी विद्यापीठ मराठी विभागाच्या बीएच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी लावले आहे. या पार्श्वभूमीवर येथील पेरणोली ग्रामपंचायतीमध्ये या पुस्तकाचे लेखक कॉ. संपत देसाई यांचा सत्कार लोकनियुक्त सरपंच प्रियांका संतोष जाधव यांच्या हस्ते झाला यावेळी उपसरपंच संदिप नावलकर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

     ग्रामसेवक संदिप चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कॉ. देसाई म्हणाले, एका लोकलढ्याची यशोगाथा हे पुस्तक आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्पग्रस्तांच्या लढ्‌याची माहीती देते. त्याचबरोबर तालुक्यातील सामाजिक व सांस्कृतिक परंपराची ओळख वाचकाला होते. चळवळ काय असते, त्यासाठी व कशा प्रकारे लढा द्यावा लागतो हे प्रत्येक प्रसंगातून उलघडत जाते. हे पुस्तक अभ्यासक्रमासाठी लावल्यामु‌ळे युवकांना चळवळीबाबत माहीती मिळेल. या वेळी जिल्हा परिषदेचा आदर्श गोठा प्रस्कार मिळवलेले प्रगतशील शेतकरी दत्ता पाईम, जिल्हा परिषदेचा तालुकास्तरीय आचार्य अत्रे पुरस्कार मिळाल्याबद्दल रणजित कालेकर यांचाही सत्कार झाला.

     कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य रणजित फगरे, संकेत सावंत, अमोल जाधव, सुषमा मोहीते, सुनिता कालेकर, शुभदा सावंत, संभाजी दळवी, विनायक रेळेकर, प्राजक्ता फगरे आदी उपस्थित होते.

डेंग्यू वर मोफत उपचार

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     कै. केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय, गडहिंग्लज येथे डेंग्यूवरील रुग्णांसाठी महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार होणार आहेत, तरी डेंग्यूच्या रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने अनिरुद्ध रेडेकर यांनी केले आहे.

पाऊस-पाणी
पुन्हा अतिवृष्टी…

     आजरा मंडल व परिसरात गेल्या २४ तासात जोरदार पाऊस झाला असून ७२ मिलिमीटर पावसासह अतिवृष्टीची नोंद झाली आहे. चित्री मध्यम प्रकल्पामध्ये ७४.८२% (१४११ दशलक्ष घनफूट) इतका पाणीसाठा झाला असून आंबेओहोळ मध्यम प्रकल्पामध्ये ८६% (१०६८ दशलक्ष घनफूट) इतका पाणीसाठा झाला आहे. उचंगी मध्यम प्रकल्पामध्ये ५०.६३% टक्के (१६९.८२ दशलक्ष घनफूट) इतका पाणीसाठा आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कीणे येथे भिंत कोसळून महिला ठार

mrityunjay mahanews

आजरा आगारातील चालकाची आत्महत्या…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अखेर डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलच्या मुख्याध्यापकासह लिपिकाविरोधात गुन्हा नोंद…

mrityunjay mahanews

आजरा- चंदगड- गडहिंग्लज परिसर वृत्त

mrityunjay mahanews
error: Content is protected !!