mrityunjaymahanews
अन्य

चालत्या चारचाकी वर गव्याची उडी


चार चाकी वर गव्याची उडी…
दोघे जखमी

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथील वनविभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या म्हसोबा देवस्थान ते आजरा सूतगिरणी मार्ग दरम्यान चारचाकीवर गव्याने उडी मारल्याने चारचाकी चे मोठे नुकसान झाले आहे. तर चार चाकी मधील युवराज मारुती देशमुख (रा.बुरूडे त्या.आजरा) व रत्नप्रभा प्रकाश कांबळे हे दोघेजण जखमी झाले आहेत.

     याबाबत मिळालेली माहिती अशी की, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास देशमुख हे आपली चार चाकी घेऊन गडहिंग्लजच्या दिशेने चालले होते. दरम्यान गाडी म्हसोबा देवस्थानच्या पुढील बाजूस आली असता अचानक रस्ता ओलांडणाऱ्या गव्याने गाडीवर उडी मारली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले तर आत मध्ये असणारे देशमुख व रत्नप्रभा हे जखमी झाले. सदर घटना घडताच आजूबाजूच्या वाहनधारकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. जखमींना आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा कारखान्याची धाव सव्वा तीन लाख मे. टनापर्यंतच

mrityunjay mahanews

मुंगूसवाडी येथे मारामारी…सहा जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

गद्दार हे गद्दारच…राजीनामे दया व निवडून या… युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा आजरा येथील सभेत घणाघात…

mrityunjay mahanews

बेलेवाडी घाटातील तो प्रकार हत्येचा कट… अखेर गूढ उकलले..दोघे ताब्यात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

error: Content is protected !!