mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


सावधान… ते सक्रिय झालेत

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     जत्रा, यात्रा व लग्नसराईचे दिवस सुरू झाले की सक्रिय होणारे पाकीटमार यावर्षीही बाजारपेठेत सक्रिय झाले असून तालुकावासीयांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

     सध्या जत्रा, यात्रा व लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. मुंबईस्थित आजरेकर गावी परतू लागले आहेत. काजू बिया विक्रीसाठी शेतकरी वर्ग आठवडा बाजारात हजेरी लावू लागला आहे. या सर्व परिस्थितीचा फायदा घेत चोरट्यांच्या व पाकीटमारांच्या टोळ्या सक्रिय होऊ लागल्या आहेत. दरवर्षी एप्रिल मे महिन्यामध्ये आठवडा बाजारातील गर्दी व बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात पाकीटमारी सह मोबाईल व अन्य वस्तू उचलाउचली करून पसार होणाऱ्यांचे प्रमाण खूप आहे. यामध्ये लहान मुले व महिला वर्गाचा ही समावेश असल्याने आठवडा बाजाराला आलेल्या तालुकावासीयांचे मोबाईल, रोख रकमा, पाकिटे, दागिने व इतर किमती साहित्य हातोहात लंपास केले जाते. तालुकावासीयांनी किमान पुढचे दोन महिने आठवडा बाजाराला येत असताना खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

    दोनच दिवसांपूर्वी आठवडा बाजाराचा फायदा घेत इटे येथील एका महिलेची मोबाईलसह रोख रकमेची पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली. पोलीस चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असले तरीही मुळातच तालुकावासीयांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

वळवाची हुलकावणी…. शेतकरी हवालदील

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     दरवर्षी होळी व गुढी पाडव्याला हमखास पडणाऱ्या वळीव पावसामुळे आजरा तालूक्यातील शेतकरी सुखावला जात होता. परंतु यावर्षी दोन्ही सणात वळवाने हुलकावणी दिल्याने तालूक्यातील शेतकरी हवालदील झाला आहे .

      गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात वळीव पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस पिक घेतले .विहिर व कुपनलिकेचे अपूरे पाणी असले तरी वळीव पावसाच्या जोरावर पीक चांगले आले होते. यावर्षी मात्र वळीव पावसाने पाठ फिरवल्याने  शेतकरी त्रस्त झाले आहेत .

    चार दिवस दिवसपाळी व तीन दिवस रात्र पाळी असा वीज पुरवठा होत असल्याने ऊसाला पाणी देणेही अडचणीचे बनले आहे .कूपनलिकेतील पाण्याची पातळी ही खाली जात आहे. तापमानाची तीव्रता वाढल्याने जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण पिकाला पाणी देणे अशक्य होऊन बसले आहे. शेतकरी वळीव पाऊस कधी पडले याकडे डोळे लावून बसला आहे.

     वातावरणातील वाढलेले तापमान सहन होत नाही. उपसाबंदीमूळे पिकांना पाणी कमी मिळते.त्यामुळे ऊस उत्पादन घटण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

आजरा शहरात इंडिया आघाडीचा मतदारांशी संवाद

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

        मुख्य बाजार पेठ, आजरा येथे इंडिया आघाडी चे उमेदवार श्री. शाहू छत्रपती यांची प्रचार पत्रके वाटून शहरातील मतदारांशी संवाद व संपर्क दौरा प्रमुख मंडळींच्या उपस्थित पार पडला.

      यावेळी आजरा तालुक्याचे जेष्ठ नेते जयवंतराव शिंपी , नगरसेवक किरण कांबळे, नगरसेवक संजयभाऊ सावंत, अमित खेडेकर, नगरसेवक ,इम्रान सोनेखान , मंजूर मुजावर, शिवसेना, नगरसेवक संभाजी पाटील, युवराज पोवार, विक्रमसिंह देसाई , रवी भाटले , कॉ. संपत देसाई , विक्रम पटेकर (चेअरमन, आजरा सेवा संस्था), ओंकार माद्याळकर यांच्यासह मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.


 

संबंधित पोस्ट

डिस्टिलरी प्रकल्पासह सहवीज प्रकल्पाशिवाय कारखान्यांना पर्याय नाही : खा. प्रा.संजय मंडलिक

mrityunjay mahanews

तरुणाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!