mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


खा.संजय मंडलिक यांना तालुक्यातून घसघशीत मताधिक्य देणार : अशोकअण्णा चराटी

 

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     देशामध्ये गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे देशात मोदी लाट तयार झाली आहे . मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण सर्वांनी खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे. यासाठी महायुतीतून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात असणारे विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक यांना भरघोस मतदान करून आजरा तालुक्यातून घसघशीत मताधिक्य देणार असे प्रतिपादन अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी केले.

      भारतीय जनता पार्टी आजरा तालुका यांच्या वतीने पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक उपस्थित होते.

     यावेळी आण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक आण्णा चराटी म्हणाले, देशात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येणार आहे. देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी उजळवण्यासाठी मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही.

      मेळाव्यास आजरा बँक चेअरमन रमेश कुरुणकर, भाजपा तालुकाध्यक्ष बाळ केसरकर,विलास नाईक, डाँ.अनिल देशपांडे, डाँ दीपक सातोसकर, दशरथ अमृते, जयवंत सुतार, निवृत्ती शेंडे, अतिशकुमार देसाई, संदीप पाटील तसेच इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

आजरा अर्बन बँकेला १२ कोटी १८ लाखांचा ढोबळ नफा

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा अर्बन बँकेला १२ कोटी १८ लाखांचा ढोबळ नफा झाल्याची माहिती अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी,बॅंकेचे चेअरमन रमेश कुरुणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

     ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बॅंकेने गतवर्षीच्या तुलनेत ठेवीमध्ये १०० कोटी व आर्थिक उलाढाल १९२ कोटीने वाढ झाली आहे. बॅंकेची एकूण आर्थिक उलाढाल १५१८ कोटींची झाली आहे.बॅंकेचा निव्वळ NPA 0% आहे.बॅंकेकडे ८९९ कोटी २ लाखांच्या ठेवी असून बॅंकेने ६१८ कोटी ५३ लाखांचे कर्ज वाटप केले आहे.बॅंकेचा सीडी रेशो ६९% आहे.

      सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल बॅंकेला बॅंको ब्लू रिबन २०२३ हा पुरस्कार मिळाला आहे.२०२४-२५ या आर्थिक वर्षात शेड्युल्ड दर्जा प्राप्त करण्याचे ध्येय संचालकांनी ठेवले आहे.या आर्थिक वर्षात बॅंकेच्या २ शाखा महाराष्ट्र व एक शाखा कर्नाटक राज्यात कार्यरत करणार आहे.

      यावेळी व्हा.चेअरमन सुनिल मगदुम, संचालक सुरेश डांग, विलास नाईक,डाॅ. दिपक सातोसकर,डाॅ.अनिल देशपांडे, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, प्रणिती केसरकर,शैला टोपले, अस्मिता सबनीस, सूर्यकांत भोईटे,किरण पाटील, संजय चव्हाण,ॲड.सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर, सहा.सरव्यवस्थापक तानाजी गोईलकर व अधिकारी उपस्थित होते.


चाफवडेत गव्याचा विहीरीत पडून मृत्यू

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     चाफवडे (ता.आजरा) येथील नवीन वसाहत मधील गजानन राणे यांच्या शेतातील विहीरीमध्ये गवा पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

     अंदाजे दीड ते दोन वर्षाचा गवा सोमवारी पहाटेच्या सुमारास विहीरीत पडला. वनखात्याने गव्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र पाणी जास्त असल्यामुळे गवा बाहेर काढण्यापुर्वीच मृत झाला.वनक्षेत्रपाल आजरा स्मिता डाके, वनपाल एस.के.निळकंठ , वन्यजीव बचाव पथकातील सदस्य यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

वनविभागाची दमछाक

     विहिरीतील गवा जिवंत बाहेर काढण्यासाठी वनविभागाकडून शेवटपर्यंत प्रयत्न केले गेले. परंतु सुमारे १२ ते १५ फूट खोलीचे पाणी असल्याने गव्याची जीव वाचवण्यासाठी ची धडपड व वन विभागाची गव्याला वाचवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही.

धोकादायक वळणावर बस थांबा…
माद्याळ येथील नागरिकांकडून संताप

       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      संकेश्वर-बांदा महामार्गावरील धोकादायक वळणावर माद्याळ गावचा बस थांबा उभारण्यात आल्याने माद्याळसह मेढेवाडी,दाभील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

       या मार्गावर भरधाव वाहने ये -जा करत असतात. महामार्ग विभागाने हे वळण तसेच ठेवून नवीन रस्ता केला आहे. गाड्यांच्या प्रतीक्षेतील शाळा महाविद्यालय विद्यार्थी व्रत नागरिक महिला गाड्यांची वाट पाहत येते उभ्या असतात. रस्त्याशेजारी बस थांबा असल्याने येणाऱ्या सुसाट वाहनांकडून अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदर या वळणावरील धोकादायक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या बस थांब्याबाबत माद्याळ परीसरातील प्रवासी वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे.


आजरा-गवसे मार्गावरील महामार्ग पोलिसांचा त्रास थांबवा

         आजरा:मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     गवसे(ता.आजरा) येथे तपासणीच्या नावाखाली महामार्ग पोलिसांकडून वाहनधारकांना नाहक त्रास दिला जात आहे. पैशांची मागणी केली जात आहे.यावर कारवाई करावी अन्यथा शिवसेनेने (ठाकरे) आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.याबाबतचे निवेदन महामार्ग पोलिस उजळाईवाडी कोल्हापूर यांना देण्यात आले आहे.

      गेल्या अनेक दिवसांपासून आजरा गवसे मार्गावर महामार्ग पोलिस तपासणीच्या नावाखाली वाहने अडवत आहेत.महामार्गाचे काम सुरु असल्याने वाहतूकीची कोंडी होते.गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची वर्दळ आहे.वाहनधारकांना अडवून त्रास दिला जात आहे शिवाय पैशांची मागणी ही केली जात आहे.हे प्रकार तात्काळ बंद करावेत अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

छायावृत्त


        आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ पेरणोली येथे कार्यकर्त्यांनी संपर्क दौरा केला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष (शरद पवार गट) मुकुंदराव देसाई, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे,’ गोकुळ’च्या संचालिका अंजनाताई रेडेकर, अभिषेक शिंपी, रणजीत देसाई, विक्रम देसाई, संभाजी पाटील, काँ. संपत देसाई, संजयभाऊ सावंत, उत्तम देसाई, रवी भाटले,संकेत सावंत,दीपक देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

९ लाखांच्या दरोडा प्रकरणी १० अटकेत…

mrityunjay mahanews

म्हैस दूध उत्पादनात आजरा तालुका अव्वल

mrityunjay mahanews

आजरा नगरपंचायतीला पाच वर्षे पूर्ण : विविध कार्यक्रमांचे आयोजन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जनसंवाद यात्रेस उस्फुर्त प्रतिसाद…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!