mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार दि.२८ जानेवारी २०२६

जिल्हा परिषदेच्या दोन जागांसाठी ८ तर पंचायत समितीच्या चार जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन जागेसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत तर पंचायत समितीच्या चार जागेसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी उत्तर जिल्हा परिषद मतदारसंघातील तिरंगी लढत होत असून ते पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघात पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

पंचायत समिती उत्तूर मतदारसंघ :

अभिजीत अमृत आरेकर (उत्तूर), काँग्रेस

संभाजी राजाराम कुराडे (उत्तूर), शिवसेना शिंदे

विकास वसंत चोथे (बहिरेवाडी), राष्ट्रवादी अजित पवार गट

सागर शशिकांत वाघरे (होन्याळी), शिवसेना ठाकरे गट

महेश काशिनाथ करंबळी (उत्तूर), ताराराणी आघाडी पक्ष

पंचायत समिती भादवण मतदार संघ :

जयश्री गजानन गाडे (भादवण), राष्ट्रवादी अजित पवार गट

भारती कृष्णा डेळेकर (सोहाळे), शिवसेना शिंदे

साधना संजय केसरकर (भादवण), ताराराणी आघाडी पक्ष

पंचायत समिती पेरणोली मतदारसंघ :

स्मिता उत्तम देसाई (पेरणोली), भारतीय जनता पार्टी

श्वेता रणजीतकुमार सरदेसाई (लाटगाव), शिवसेना शिंदे गट

अस्मिता दत्तात्रय कांबळे (कोरीवडे), वंचित बहुजन आघाडी

जिजाबाई महादेव कांबळे (कासार कांडगाव), अपक्ष

यशोदा युवराज पोवार (देऊळवाडी), अपक्ष

पंचायत समिती वाटंगी मतदारसंघ :

समीर दशरथ पारदे (मलिग्रे), भारतीय जनता पार्टी

सतीश गणपती फडके (सुळे), शिवसेना शिंदे गट

राजाराम गुणाजी होलम (पोळगाव), राष्ट्रवादी अजित पवार गट

किरण विश्वनाथ कोरे (बुरुडे), अपक्ष

नरसू बाबू शिंदे (पोश्रातवाडी), अपक्ष

जिल्हा परिषद उत्तूर मतदारसंघ :

विठ्ठल महादेव उत्तूरकर (उत्तूर), शिवसेना शिंदे गट

शिरीष हिंदुराव देसाई (उत्तूर), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

उमेश मुकुंदराव आपटे (उत्तूर), ताराराणी आघाडी पक्ष

जिल्हा परिषद पेरणोली मतदारसंघ :

जयवंत मसणू सुतार (किणे), भारतीय जनता पार्टी

विष्णू मोतबा केसरकर (किणे), शिवसेना शिंदे गट

सुधीर राजाराम देसाई (वेळवट्टी), राष्ट्रवादी अजित पवार गट

सुधीर रामदास सुपल (लाटगाव), राष्ट्रीय समाज पक्ष

सुरेश कृष्णा शिंगटे (वाटंगी), अपक्ष

आजरा तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरासह तालुक्यामध्ये ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शासकीय ध्वजारोहण तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते करण्यात आले आजरा नगरपंचायत, आजचा अर्बन बँक, जनता शिक्षण संस्था येथे नगराध्यक्ष अशोक चराटी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना, जनता सहकारी बँक येथे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अण्णाभाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणी मध्ये अध्यक्षा अन्नपूर्णादेवी चराटी यांच्या हस्ते, व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा पटेकर यांच्या तर पं. दीनदयाळ हायस्कूल मध्ये प्रा. डॉ. सुधीर मुंज यांच्या हस्ते व डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल मध्ये अध्यक्ष आलम नाईकवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

स्वामी विवेकानंद पतसंस्थेमध्ये अध्यक्ष दयानंद भुसारी यांच्या हस्ते, व्यापारी मर्चंट पतसंस्थेमध्ये रमेश कारेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.

वाटंगी हायस्कूल येथे राजाराम घेवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

नागरी सुविधांची कामे पूर्ण न झाल्याने धरणातून पाणी सोडू न देण्याचा सर्फनाला प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत निर्णय.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सर्फनाला प्रकल्पाच्या नवीन वसाहतीत अजूनही नागरी सुविधांची कामे अपुरी आहेत. गेले अनेक दिवस याबाबत अर्ज विनंती करूनही पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत असल्याने नाईलाजाने लाभक्षेत्रात धरणातून सोडले जाणारे पाणी बंद करण्याचा निर्णय आज येथे झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ. संपत देसाई होते.

सर्फनाला प्रकल्पाच्या शेळप येथील प्रकल्पग्रस्त वसाहतीला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही गेले कित्येक दिवस याबाबत लोकांनी अर्ज विनंती केल्या. कारखान्याची मळी नदी सोडली जाते ती प्रकल्पग्रस्त वसाहतीच्या जॅकवेलमध्ये मिसळते. त्यामुळे वसाहतीतील लोकांना दूषित व अपुरा पाणीपुरवठा होत आहे यासाठी वारंवार पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था करावी अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे पण त्याकडे पाटबंधारे खात्याने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

याबरोबरच वसाहतीतील गटर, रस्ते, बस थांबा, स्ट्रीट लाईट, स्मशानशेड ही कामे थांबली आहेत.प्रकल्पग्रस्तांना लाभक्षेत्रात वाटप झालेल्या जमिनीचे सपाटीकरण अजून राहिले आहे. वरील सर्व कामे होत नसल्याने आज शेळप वसाहतीत झालेल्या बैठकीत सर्फनाला प्रकल्पातून लाभक्षेत्रात पाणी सोडू न देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी अशोक मालव, प्रकाश शेटगे, अर्जुन शेटगे,अमरसिंग ढोकरे यांच्यासह कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जि.प.व पं.स.मध्ये भगवा फडकणार : विष्णुपंत केसरकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

जिल्हा परिषदे करता निवडणूक रिंगणात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला वेळोवेळी आपण मदत केली. मदतीवेळी त्यांनी आपणाला शब्द दिले. पण मदतीतून उतराई होण्याची वेळ आल्यानंतर मात्र त्यांनी सोयीची भूमिका घेतली. राष्ट्रवादी पक्षातील विरोधक गाजराची शेती करणारे आहेत.शब्द देवून न पाळणे हा त्यांचा जुनाच इतिहास आहे.स्वत:च्या स्वार्थासाठी दिलेले वचन न पाळणारी ही मंडळी आहेत. मतदार त्यांच्या भूलथापांना कदापिही बोलणार नाही आता या निवडणुकीत मात्र त्यांना निश्चित जाब विचारतील असे प्रतिपादन जिल्हा परिषद पेरणोली मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विष्णुपंत केसरकर यांनी केले.अर्ज माघारी प्रक्रियेनंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.यावेळी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाऱ्या जाहीर करण्यात आल्या.

केसरकर म्हणाले, लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही. जिल्हा बॅंकेच्यावेळी जिल्हा परिषदेचा शब्द मला दिला होता मात्र तो पाळण्याची दानत त्यांच्यात नाही. सगळीकडे मीच अशी वृत्ती या मंडळींची आहे. पण ज्यांच्या सोबत आपण त्यांचा विजय हा इतिहास त्यांनी विसरू नये असेही त्यांनी सांगितले.

आजरा नगरपंचायतीचे नगरसेवक अभिषेक शिंपी म्हणाले, अनेकांच्या पाठिंब्यामुळे विजय सुकर झाला आहे.पालकमंत्री आबिटकर यांचे काम कार्यकर्त्यांना हाताळण्याची पद्धत निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे अनेकजण प्रभावित होऊन पक्षात येत आहेत

तालुकाप्रमुख संजय पाटील म्हणाले, दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीच्या जागा आम्हीच जिंकून तालुक्यात पुन्हा एक वेळ भगवा फडकवणार आहे. यावेळी उत्तूर जिल्हा परिषद उमेदवार विठ्ठल उत्तूरकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

स्वागत इंद्रजित देसाई तर आभार रणजित सरदेसाई यांनी मानले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, शहर प्रमुख विजय थोरवत, पंचायत समिती उमेदवार सतीश फडके, बाळ केसरकर, संतोष भाटले, जितेंद्र भोसले, राजू पोतनीस, इंद्रजीत देसाई, धनंजय पाटील, दयानंद नेऊंगरे, सुनील दिवेकर, काका देसाई, बाळ केसरकर, संतोष पाटील, संकेत सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना (शिंदे गट) उमेदवार

पेरणोली जिल्हा परिषद : विष्णूपंत केसरकर

पेरणोली पंचायत समिती : सौ.श्वेता सरदेसाई

वाटंगी पंचायत समिती : सतीश फडके

उत्तुर जिल्हा परिषद : विठ्ठल उत्तूरकर

उत्तुर पंचायत समिती : संभाजी कुराडे

भादवण पंचायत समिती : सौ.भारती डेळेकर.

बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंती निमित्त ऊस तोड कामगारांसाठी ‘मायेची ऊब’- उन्नती सेवा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १००व्या जयंती निमित्त समाजातील वंचित घटकांप्रती आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपत उन्नती सेवा प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने ‘मायेची ऊब’ हा संवेदनशील उपक्रम आजरा तालुक्यात राबविण्यात आला.

थंडीच्या कडाक्याने हैराण झालेल्या गरीब उस तोड कामगारांना आधार व दिलासा मिळावा, या उद्देशाने चादर वाटप करण्यात आले. या

लवकरच उन्नती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गरजू नागरिकांना कानांचे श्रवणयंत्र देण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार असून, समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संस्थेचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
समाजातील वंचित घटकांप्रती सहवेदना, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

यावेळी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले, उद्योजक सतिश पाटील, विठ्ठल घेवडे, शिवशाहू प्रतिष्ठानचे सचिव कृष्णा पाटील, अमर गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

निधन वार्ता
वसंतराव देसाई


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कानोली ( ता. आजरा ) येथील सेवानिवृत्त सुभेदार मेजर वसंतराव रामचंद्र देसाई ( इनामदार ) यांचे सोमवार दि. २६ रोजी निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८२ वर्षे होते.त्यांच्या पश्चात एक मुलगा विवाहित मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह देसाई यांचे ते वडील होत, रक्षाविसर्जन बुधवार दि. २८ रोजी कानोली येथे आहे.

छाया वृत्त

सन १९७५ च्या आणीबाणी काळामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी दिलेल्या लढ्याबद्दल तहसीलदार कार्यालय,आजरा येथे तहसीलदार श्री. समीर माने यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिना निमित्ताने विश्वनाथ कोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

फोटो गॅलरी 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कौतुकच…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!