mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


घाटकरवाडी येथून गोवा बनावटीची दारू हस्तगत…
एका विरोधात गुन्हा नोंद

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      राज्य उत्पादन शुल्क विभागाला घाटकरवाडी ता. आजरा जि. कोल्हापूर येथे राजाराम आनंदा तांबेकर यांनी बेकायदेशीररीत्या गोवा बनावट विदेशी मद्याचा विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करुन ठेवले असलेबाबतची माहीती मिळाली. घाटकरवाडी ता. आजरा जि. कोल्हापूर या गावच्या हद्दीत त्यांच्या राहत्या घराची व घराजवळील गोठयाची तपासणी केली असता सदर गोठ्यामध्ये व गोठयाजवळ आढळून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या टाटा सुमो त्याचा वाहन क्रं.एम.एच-४५-एन-०३८८ या वाहनामध्ये मिळून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे १९ बॉक्स मिळून आले. सदर ठिकाणी मिळून आलेल्या वाहनासह गोवा बनावट विदेशी मद्याची एकूण किंमत रु. ३७७६८०/- इतका असून सदर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

      राजाराम आनंदा तांबेकर याचेवर गोवा बनावट विदेशी मद्याचा बेकायदेशीररीत्या विनापरवाना साठा केलेबाबत महाराष्ट्र दारुबंदी कायदयाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बहुजन मुक्ती पार्टीचे धरणे आंदोलन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने दर्गा गल्ली, आजरा येथे दारूचे दुकान सुरू करण्याला परवाना दिल्याच्या विरोधात आणि संकेश्वर – बांदा महामार्गावरील पेट्रोल पंप २४ तास खुले राहावे जेणेकरून लोकांना पूर्णवेळ सेवा मिळेल या दोन विषयांसाठी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. सदर धरणे आंदोलनाला मोठ्या प्रमाणात लोकांनी उपस्थिती दर्शवली. या आंदोलनाची दखल घेऊन तहसीलदार यांनी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना येत्या ८ ऑक्टोबर रोजी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि पेट्रोल पंप मालक यांच्यासोबत बैठक लावण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

      सदर आंदोलन प्रसंगी किरण के के, डॉ. उल्हास त्रिरत्ने, जुबेर माणगावकर, राहुल मोरे, जुल्फिकार शेख यांनी केले. या आंदोलनाला अमित सुळेकर, दशरथ सोनुले, रवी देसाई, शांताराम पाटील, अमजद माणगावकर, इंजि. इरशाद भडगावकर, महादेव कांबळे, द्वारका कांबळे, सुमन कांबळे, चित्रा पोवार, तौसिफ भडगावकर, मुस्ताक तकिलदार, मजीद तकिलदार, आदम पटेल, याकूब तकिलदार, आसिफ लतीफ, शौकत लतीफ, इनामूल लतीफ, बिलाल लतीफ, बशीर लतीफ, नियामत पीरखान व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

आज शासकीय योजना लाभार्थी मंजुरी पत्र वाटप कार्यक्रम

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आज रविवार दि.६ रोजी तहसील कार्यालय आजरा येथे ठीक पावणेदहा वाजता राधानगरी मतदारसंघ क्षेत्रामध्ये समाविष्ट आजरा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना तसेच इतर अनुषंगिक योजना यांचे लाभार्थी मंजुरी पत्र वाटप कार्यक्रम आमदार प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत ठेवण्यात आला आहे अशी माहिती आजरा तहसीलदार समीर माने यांनी दिली.

सर्व लाभार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मटका घेताना दोघेजण ताब्यात..‌.

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा येथे आमराई गल्लीच्या कोपऱ्यावर शब्बीर टी स्टॉल नजीक मटका नावाचा जुगार चालवणाऱ्या दोघांना आजरा पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मटका घेण्याचे साहित्य ताब्यात घेतले आहे.

       विशाल आंबोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्रफ दिडबाग(आजरा )व शिवाजी कांबळे(उत्तूर) या दोघांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पंडित दीनदयाळ विद्यालयात ग्लोबल डिजिटल क्लासरूम चे उद्घाटन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     मेड लाईन इंडिया व संवेदना फाउंडेशन आजरा यांच्यामार्फत पंडित दीनदयाळ विद्यालयात ग्लोबल डिजिटल क्लासरूमचा उद्घाटन सोहळा संवेदना फाउंडेशन आजराचे विश्वस्त डॉ.प्रवीण निंबाळकर यांच्या हस्ते तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण व संस्कृती प्रसारक मंडळ आजरा चे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर मुंज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

      मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला व विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.संवेदना फाउंडेशनचे आजराचे सचिव संतराम केसरकर यांनी संवेदना फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुधीर मुंज यांनी संवेदना फाउंडेशनने वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या कार्याचे कौतुक केले आणि भविष्यात लागणाऱ्या गोष्टींसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

       या कार्यक्रमाला संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती विमल भुसारी वहिनी, सचिव मलिककुमार बुरुड खजानीस रमेश कारेकर संचालक सुधीर परळकर ,नाथा देसाई, भिकाजी पाटील मार्गदर्शक प्रकाश पाटील, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री पार्वती -शंकर विद्यालय, उत्तूर मार्फत वैज्ञानिक प्रकल्प सादरीकरण स्पर्धा


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      श्री पार्वती -शंकर विद्यालय, उत्तूर ,ता.आजरा , जि.कोल्हापूर यांचेद्वारे २१ वे बालवैज्ञानिक संमेलन डिसेंबर २०२४ मध्ये होत आहे. मराठी विज्ञान परिषद गडहिंग्लज व आजरा यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहे. .

      या बालवैज्ञानिक संमेलनात शालेय विद्यार्थी इ.६ वी ते इ १०वी साठी वैज्ञानिक प्रकल्प स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकल्प स्पर्धा इ ६ वी ते इ ८ वी ज्युनिअर ग्रुप व इ.९ वी – इ १०वी सिनिअर ग्रुप अशा दोन गटात होणार आहेत. बालवैज्ञानिक संमेलनात प्रकल्प सादर करावे लागतील. एका प्रकल्पात एक अथवा दोन विद्यार्थी असू शकतात.

     इ.६ वी ते इ. ८वी या गटासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली, अपघात- कारणे व उपाय ,सार्वजनिक स्वच्छता सद्यस्थिती व उपाय या थीमवर आधारित प्रकल्प असावेत.

इ.९ वी इ.१० वी गटासाठी आरोग्यपूर्ण हरित पर्यावरणासाठी विज्ञान -तंत्रज्ञान, शून्य कचरा व्यवस्थापन, जंक फूड दुष्परिणाम व आहाराच्या योग्य सवयी या थीमवर आधारित प्रकल्प असावेत.

      प्रकल्प स्पर्धेत कोणत्याही शाळेला सहभागी होता येईल . प्रकल्प प्रत्यक्ष करावयाचे असून ते २१ व्या बालवैज्ञानिक संमेलनात पीपीटीवरअथवा माहिती चार्टद्वारे सादरीकरण करावे लागतील. प्रकल्पाचे मूल्यमापन होऊन सहावी ते आठवी प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रु.२००१/- रु.१५५१/- रु.१००१/- रोख पारितोषिके , गौरवचिन्ह , प्रशस्तिपत्रे राहतील. इ.९ .वी ते इ १० वी साठी तीन क्रमांकांना अनुक्रमे रू.२५०१/- ,रु.२००१, रु. १५५१/- रोख पारितोषिके ,गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्रे राहतील. शिवाय दोन्ही गटात प्रत्येकी दोन उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रे राहतील. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

        वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यात निर्माण होऊन विद्यार्थ्यात विज्ञान व तंत्रज्ञान विषयक सृजनात्मक अभिव्यक्ती कौशल्ये यावीत यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे ,असे आवाहन पार्वती- शंकर शैक्षणिक संस्थेच्या संचालक मंडळातर्फे शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथआण्णा करंबळी व संचालक प्राचार्य डॉ .दिनकर घेवडे यांनी केले आहे.

      प्रकल्प नोंदणी व प्रकल्पासंदर्भात माहितीसाठी संमेलन समन्वयक श्री. पंडित वंजारे मो. नंबर ९४ ०४ ७१ ४९ ०८ यांचेशी संपर्क साधावा. नोंदणी २० नोव्हेबर २०२४ पर्यंत करावी.

 दुर्गामाता दर्शन 


फोटो क्लि


                          (Advt.)

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969


 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

GROUND REPORT

mrityunjay mahanews
error: Content is protected !!