जखमी अभियंत्याचा अखेर मृत्यू…
विवाहानंतर केवळ दोनच महिन्यात काळाचा घाला…

पेरणोली ( ता. आजरा ) येथील प्रदीप संजय कालेकर या २८ वर्षीय तरुणाच्या दुचाकीचा आठ दिवसापूर्वी अपघात होऊन तो गंभीर जखमी झाला होता.
आज उपचारादरम्यान कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात त्याचे निधन झाले. जून महिन्यामध्ये विवाहबद्ध झालेल्या या अभियंत्यावर तरुणावर काळाने घाला घातल्याने पेरणोली पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
आठ जून रोजी विवाहबद्ध झालेल्या प्रदीप यांच्या दुचाकीला आजरा – गडहिंग्लज मार्गावरील गिजवणे येथे चारचाकीने धडक दिल्याने अपघात झाला होता. त्याच्यावर कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज दिनांक १४ रोजी त्याचा मृत्यू झाला.
मुंबई येथे अभियंता असणाऱ्या प्रदीप याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला असून त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील, विवाहित बहीण यांच्यासह मोठा परिवार आहे.


