mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्या

संबंधितांकडून दिलगिरी व्यक्त केल्यानंतर ‘त्या’ प्रकरणावर पडदा…नागरिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर व्हीक्टोरिया पुलावरील खुदाई बंद

 

‘त्या’ संशयिताकडून  दिलगिरी व्यक्त …..

अखेर प्रकरणावर पडदा

आजरा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची बदनामी करणारा संदेश ‘व्हाट्सअप स्टेटस’ च्या माध्यमातून व्हायरल केल्याप्रकरणी अंगणवाडी सेविका मधून संताप व्यक्त केला जात होता. प्रकरणी संबंधिता विरोधात कायदेशीर दाद मागण्याचा पवित्रा  घेतल्यानंतर घडलेला प्रकार   हा कौटुंबिक वादातून झाला असल्याचे पुढे आले आहे.याप्रकरणी संबंधित व्यक्तीने  अंगणवाडी सेविकांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता असे स्पष्ट करत झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.  यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याने याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.

.           आजरा तालुक्यातील अंगणवाडी सेविका प्रामाणिकपणे आपले काम पार पाडत असताना सदर अवमानकारक संदेश प्रसारित झाल्याने ,सर्वसामान्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या अखेर या प्रकरणावर पडदा पडला आहे.

    व्हीक्टोरिया पूलावरच केली खुदाई 

आजरा येथील हिरण्यकेशी नदीवर असणार्‍याआजरा येथील हिरण्यकेशी नदीवर असणाऱ्या   व्हीक्टोरिया जुबिली या ब्रिटिश कालीन पुलावर मोबाईलची केबल टाकण्यासाठी खुदाई केल्याने नागरिकातून संताप व्यक्त केला जात होता.

नागरीकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन तातडीने की खुदाई बंद करण्यात आली आहे.

छाया वृत्त:-

♦️♦️महाराष्ट्र शासन सारथी पुणे संस्थेमार्फत शिष्यवृत्ती मिळवणारे आजरा हायस्कूल, आजरा चे विद्यार्थी, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक♦️♦️

♦️♦️ खेडे, तालुका आजरा येथील तरुणांनी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणलेल्या  ‘भिम’ज्योती चे  ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.

 

 

निधन वार्ता :-

 

तुळशीराम पोखरकर महाराज

एरंडोळ, तालुका आजरा येथील ज्ञानेश्वर गुरुकुल माऊलीचे मठाधिपती ह.भ.प.पू.तुळशीराम पोखरकर महाराज यांचे कल्याण( मुंबई )येथे अल्पशा आजाराने निधन झाले.अध्यात्माचे गाढे अभ्यासक असणाऱ्या पोखरकर महाराजांचा भक्तगण मोठा आहे.

श्रीपती देसाई

पेरणोली ता आजरा येथील  श्रीपती महिपती देसाई ( वय 85) यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले. त्याचे पश्चात पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे
‘स्वाभिमानी’ चे जिल्हा उपाध्यक्ष आणि आजरा कारखान्याचे संचालक तानाजी देसाई आणि जल संपदा विभागाचे निवृत्त अभियंता जनार्दन  देसाई यांचे ते वडील होत.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात ३३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

mrityunjay mahanews

पेंढारवाडीत दोन जनावरांना ‘लंपी’ ची लागण ? गडहिंग्लज उपविभाग हादरला….

mrityunjay mahanews

गाळे वाटपात ‘गाळा’ मारला कुणी? आजऱ्यात सुरू आहे जोरदार चर्चा… काय आहे हे प्रकरण

mrityunjay mahanews
error: Content is protected !!