mrityunjaymahanews
कोल्हापूरगुन्हा

आजरा तालुक्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे छापासत्र: चार बंदुका ताब्यात

आजरा तालुक्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे छापासत्र : चार बंदुका ताब्यात

पोलिसांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने आजरा तालुक्यात छापासत्र सुरू करून तब्बल चार बंदुका व जिवंत काडतुसे ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी एकूण पाच जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. बिगर परवाना बेकायदेशीररित्या बंदुका व काडतुसे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी बाबुराव विठ्ठल लोकरे (मु.धामणे ता. आजरा) विजय दिनकर घोरपडे (रा.उत्तूर ता. आजरा) व सुनील अण्णाप्पा लोहार (रा. धामणे ता. आजरा) यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. सदर बंदुका या सुनील अण्णाप्पा लोहार (रा. धामणे) यांचेकडून बनवून घेतले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान पोलिसांनी कृष्णा शिवराम धामणेकर (रा. धामणे, ता. आजरा याला ताब्यात घेतले असता गावठी बनावटीच्या दोन बंदुका व जिवंत काडतुसे आढळून आली . सदर बंदुका व काडतूसे ही राधानगरी येथील संदीप पार्टे यांचेकडून खरेदी केल्याचेही स्पष्ट होत आहे. याप्रकरणी कृष्णा शिवराम धामणेकर व संदीप पार्टे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. बंदुका जवळ बाळगल्याप्रकरणी एकूण ४४ हजार दोनशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह संशयीतांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाईत पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी यांच्यासह विनायक सपाटे, शेष मोरे आदींनी भाग घेतला.‘ ते ‘  गाळे आता आम्हीच उखडून टाकणार : मनसेचा इशारा

 

आजरा शहरामध्ये भुदरगड पतसंस्थेच्या शेजारी बांधण्यात आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या जागेतील गाळे काढून टाकावेत अशी मागणी करूनही याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे.अनधिकृत पद्धतीने झालेल्या या बांधकामावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने हे गाळे उखडून टाकण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल निउंगरे यांनी दिली. जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, उपजिल्हाध्यक्ष सुधीर सुपल यांच्या नेतृत्वाखाली हे गाळे पूर्णपणे काढून टाकण्यात येणार आहेत असा इशाराही सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून या नऊ गाळयाबाबत आजरा शहरांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे नेमकी जागा कुणाची? गाळे बांधले कोणी? आणि ते दिले कोणत्या पद्धतीने? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत. या प्रकरणांमध्ये कांही नगरसेवकही गुंतल्याची चर्चा सध्या शहरांमध्ये सुरू असल्याने मनसेच्या या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.व्यंकटराव हायस्कूल मध्ये करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर यांच्या वतीने व्यंकटराव हायस्कूल व जुनियर कॉलेज आजरा विद्यालयात आज शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर रोजी करियर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .सदर कार्यशाळेत समुपदेशक श्री. एस.एन .तांबे यांनी इयत्ता – १० वी च्या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या सवयी, ताण-तणाव व्यवस्थापन कौशल्य, महा करिअर पोर्टल व इयत्ता दहावी व बारावी नंतर पुढे काय? याविषयी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास प्राचार्य श्री. शिवाजी गुरव, पर्यवेक्षक श्री. सुरेशराव खोराटे, श्री. आर .जी. कुंभार, इयत्ता दहावी वर्गशिक्षिका सौ. एस .डी इलगे, सौ. एस. एस. नाईक, श्रीम.मोरे एन. ए., सौ.व्ही.ए.वडवळेकर, श्री. एस. जे. गिलबिले, श्री.कृष्णा दावणे व इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पंजाब येथील  एक कोटीच्या दरोडा  प्रकरणातील चार आरोपीना आजऱ्यात अटक…विनयभंग प्रकरणी मुम्मेवाडी येथील एकाविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

६०० लिटर रॉकेलवर चोरट्यांचा डल्ला

mrityunjay mahanews

आजरा साखर कारखान्याच्या वतीने ऊस विकास परिषद संपन्न…. भाजपाची मंगळवारी आजऱ्यात बैठक…उचंगी प्रकल्पस्थळी मंगळवारी धरणग्रस्त लढा परिषद

mrityunjay mahanews
error: Content is protected !!