mrityunjaymahanews
अन्य

सोमवार – सातच्या बातम्या

सोमवार दि.१४ सप्टेंबर २०२६

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; दोन तरुण गंभीर जखमी

आजरा : प्रतिनिधी

भादवण फाटा ते उत्तूर जाणाऱ्या रोडवर हॉटेल रविराज पासून सुमारे १०० मीटर अंतरावर भरधाव कंटेनर ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याची घटना घडली असून यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा कंटेनर ट्रक क्र. ( MH-48-CQ-0014 ) च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत समोरील दुचाकीला ( क्र. MH-09-HF-6113 ) धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील राहुल आनंदा सोळांकूर (वय २५) व त्याचा मित्र शिवाजी राजू काणेकर (वय २६, दोघे रा. आरदाळ, ता. आजरा) हे दोघे गंभीर जखमी झाले. तसेच दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

जखमींना उपचारासाठी गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी आनंदा जानबा सोळांकूर यांनी आजरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पो.हे.कॉ. मकानदार करीत आहेत.

एम.डी. रेडिओलॉजीत डॉ. यशोधन ढोणुक्षे यांना सुवर्णपदक

उत्तूर : प्रतिनिधी

उत्तूर येथील प्रख्यात वैद्यकीय दाम्पत्य डॉ. संजय ढोणुक्षे व डॉ. सौ. सुनीता ढोणुक्षे यांचे चिरंजीव डॉ. यशोधन ढोणुक्षे यांनी एम.डी. रेडिओलॉजी पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या एम.डी. रेडिओलॉजी अभ्यासक्रमात विद्यापीठात अव्वल स्थान मिळविणे ही उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी मानली जाते. सातत्यपूर्ण अभ्यास कठोर परिश्रम आणि विषयावरील सखोल ज्ञानाच्या बळावर डॉ. यशोधन यांनी हे यश संपादन केले.

आनंदराव नादवडेकर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेला ५९ लाखांचा उचांकी नफा : वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

आजरा : प्रतिनिधी

सभेच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणाधिकारी आनंदा जोशीलकर होते.त्यांनी प्राथमिक शिक्षकांची आदर्शवत पतसंस्था अशी ओळख असणाऱ्या पतसंस्थेला गतवर्षी ५९ लाख ३ हजार १९९ रुपयांचा नफा उच्चंकित नफा मिळवून ३२ टक्के विक्रमी डिव्हिडंड देणारी राज्यात आदर्शवत असणारी पतसंस्था असे उद्गार काढून सर्व संचालक मंडळाचे कौतुक केले.

संस्थेचे विकसित रूप हे बहुउद्देशीय हॉल, सुसज्ज कार्यालय, संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार, सर्व सभासदांचे सहकार्य, ज्येष्ठ नेते मंडळींचे मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांची प्रामाणिक सेवा यामुळे संस्था उत्तरोत्तर प्रगती करत असल्याचे संस्थेच्या चेअरमन सौ. सुरेखा नाईक यांनी आपल्या प्रास्ताविक मधून स्पष्ट केले. यावेळी श्रद्धांजलीचा ठराव माजी चेअरमन सुभाष आजगेकर सर यांनी मांडला. सभेमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचा यथोचित सत्कार, प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती, नवोदय, व एन. एन.एम. एस मार्गदर्शक शिक्षकांचा ,गुणवंत पाल्यांचा आणि नूतन केंद्रप्रमुख यांचा सत्कार संपन्न झाला.

यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजी पंडित , ज्येष्ठ नेते शिवाजी नांदवडेकर , शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी बोलके , राज्य नेते सुनील शिंदे , बळवंत शिंत्रे , प्रवक्ते विनायक आमनगी, आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

सभेचे सूत्रसंचालन संस्थेच्या संचालिका सौ.भारती चव्हाण आणि आभार व्हॉईस चेअरमन शुभांगी पेडणेकर यांनी मानले.

तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूलचे यश


आजरा : प्रतिनिधी

जिल्हा परिषद (माध्य.शिक्षण विभाग )कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी १४ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळविला.

अनुप पंडित ,सर्वेश अर्दाळकर, संस्कार पाटील, विजय तर्डेकर, राजवीर हरेर ,प्रणव कांबळे ,आरुष पवार ,आदर्श गिलबिले,सौरभ कानोलकर ,शुभम भोसले या संघाचे नेतृत्व कर्णधार आदेश गुरव यांनी केले.
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी १७ वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक मिळविला.

प्रणाली परीट, स्वप्नाली गुडुळकर ,श्रेया धनुकटेकर, अक्षता कांबळे, स्नेहल पाटील, रसिका मांगले, सलोनी नाईक, सिद्धी केसरकर, स्मिता देसाई ,अंकिता देसाई, संस्कृती दळवी या टीमचे नेतृत्व कप्तान प्रणाली धोंडीबा राणे हिने केले.

या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री एस.एम.पाटील व श्रीम. आर.एन. पाटील यांचे मार्गदर्शन व अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी ,सर्व संचालक मंडळ, प्राचार्य श्री. एस. एन. पाटील पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे.शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.

आजरा हायस्कूलमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा

आजरा : प्रतिनिधी

आजरा हायस्कूलमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. ए. व्ही. बाचुळकर यांच्या हस्ते हिंदी दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले. भित्तीपत्रिकेची माहिती सौ. व्ही. एच. हरेर यांनी दिली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी, पर्यवेक्षक श्री. एम. एस. गोरे, श्री. ए. व्ही. बाचुळकर तसेच हिंदी विभागातील शिक्षक उपस्थित होते.

लहान गटासाठी समूहगीत गायन स्पर्धा, तर मोठ्या गटासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. समूहगीत गायन स्पर्धेत इयत्ता ८वी ‘ड’ वर्गाने प्रथम, इयत्ता ६वी ‘क’ वर्गाने द्वितीय, तर इयत्ता ७वी ‘क’ वर्गाने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
निबंध स्पर्धेत कु. वेदिका पोतदार हिने प्रथम, तर कु. अक्षरा पाटील हिने द्वितीय,कु. काव्या गावडे हिने तृतीय क्रमांक पटकावला.

कार्यक्रमाचे नियोजन हिंदी विभागप्रमुख श्रीम.एस. एस. कुराडे, सौ. टी. एस. पाटील व हिंदी विभागातील सदस्यांनी केले. सूत्रसंचालन सौ. व्ही. एच. अडकूरकर यांनी केले, तर आभार सौ. ए. आर. नेवरेकर यांनी मानले.

आजचे पंचांग

दिनांक : १४ सप्टेंबर २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : तृतीया तिथी (सकाळी ०७.०६ पर्यंत) त्यानंतर चतुर्थी तिथी
नक्षत्र : चित्रा नक्षत्र (दुपारी ०१.५४ पर्यंत) त्यानंतर स्वाती नक्षत्र
योग : ब्रह्म योग (दुपारी १२.४६ पर्यंत) त्यानंतर इन्द्र योग
करण : गराजा करण (सकाळी ०७.०६ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : तूळ राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.५९ ते सकाळी ०९.३० पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०९ ते दुपारी १२.५८
सूर्योदय : सकाळी ०६.२७
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४१
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गटविकास अधिकाऱ्यांना काळे फासल्याप्रकरणी विलास जोशिलकर याला तीन महिन्यांची कैद

mrityunjay mahanews

सौ.शशिकला रक्ताडे यांचे निधन…

mrityunjay mahanews

प्रकाशदादा गेले…. ‘अर्बन ‘ परिवारात शोककळा..

mrityunjay mahanews

आजरा आगार व्यवस्थापक विनय पाटील यांचा आकस्मिक मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!