mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार दि.८ एप्रिल २०२६

आजऱ्यात आधु‌निक तंत्रज्ञानाने भात रोपवाटीका तयार करण्याची प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भात लागवड, आंतरमशागत व कापणी मळणीपर्यंत यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यासाठी आजरा शेतकरी मंडळातर्फे आधु‌निक तंत्रज्ञानाने भात रोपवाटीका तयार करण्याचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण कार्यशाळा झाली. सुमारे दीडशे शेतकऱ्यांनी यामधे सहभाग घेतला.

परोली रस्त्यावरील आजरा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या गोडावूनमधे प्रशिक्षण कार्यशाळा झाली, क्षेत्रीय अधिकारी (मध्यप्रदेश) अमर विशाल, रमेश फाटक यांनी भात रोपवाटीका तयार करण्याचे आधु‌निक तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले. गडहिंग्लज उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी सुनिल दिवटे, विजय कुंभार, सी. आर. देसाई, सी. डी. सरदेसाई, वसंत तारळेकर, टी. एस. गडकरी प्रमुख उपस्थित होते.

आजरा शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत यांनी स्वागत केले. तालुक्यात भाताचे क्षेत्र सुमारे दहा हजार हेक्टर इतके यापैकी पाच हजार हेक्टरवर रोपलावण केली जाते. सध्या मजूर टंचाईमुळे शेतीमधे अडचणी वाढल्या आहेत. यावार मात करण्यासाठी यांत्रिकीकरणाचे वापर करणे गरजेचे आहे. उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील म्हणाले, सामुदायिक शेतीचा प्रयोग करणे काळाची गरज आहे. शेतकरी एकत्रीत आल्यास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शास्त्रोक्त पध्दतीने रोपवाटीका व लागवड झाल्यास उत्पादन वाढ होईल. श्री. विशाल यांनी रोपवाटीका तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टीबाबत मार्गदर्शन केले. श्री. फाटक यांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर समाधानकारक उतरे दिली.

यावेळी जयसिंग नार्वेकर, संताजी सोले, हिंदूराव कालेकर, निवृत्ती कांबळे, शिवाजी गिलबिले, सयाजी नार्वेकर, सदाशिव वांजोळे, जयसिंग सावंत, श्रीपती गुरव, भाऊ निर्मळे, जयवंत देसाई, उत्तम नार्वेकर, संभाजी नार्वेकर, भरत तानवडे, पांडुरंग जाधव व तकरी उपस्थित होते. संभाजी इंजल यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

जलजीवन योजनेचा ९०% टप्पा पूर्ण; पाणी समितीच्या आढावा सभेत उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्याचा निर्णय

उत्तूर : मंदार हळवणकर

उत्तूर ग्रामपंचायतीच्या पाणी समितीची आढावा सभा मंगळवार (दि. ७ एप्रिल) रोजी पार पडली. या सभेत जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. योजनेसाठी प्रारंभी १२.२० कोटींची मंजुरी असून सुधारित अंदाजपत्रकानुसार ती १३.०८ कोटींपर्यंत वाढविण्यात आली आहे.
सरपंच किरण आमणगी यांनी २०११ च्या जनगणनेनुसार मूळ आराखडा (DPR) तयार करण्यात आला असून हरकतीनंतर त्यात सुधारणा करून वाढीव नळ योजनेसाठी शासनाकडे मंजुरी मागितल्याचे सांगितले. कुराडे गल्ली ते नेहरू चौक, कुलकर्णी गल्ली ते देसाई वाडा, तळे गल्ली ते तळे, बरगे कापड दुकान ते झेंडे कोपरा, परीट गल्ली, भुदरगड पतसंस्था ते सदाफुली पतसंस्था, महादेव, सावंत, बामणे गल्ली, मिलिंद नगर (रेणुका गल्ली) व रोहिदास नगर या भागांचा त्यात समावेश आहे.

सभेत रस्त्यांचे पॅचिंग, सोलार प्रकल्प उभारणी, नियमित पाणीपुरवठा, सुधारित DPR, निधी मंजुरी व उर्वरित भागात लवकर नळ कनेक्शन देण्याबाबत सूचना करण्यात आल्या. नूतन जिल्हा परिषद सदस्य शिरीषकुमार देसाई यांनी जलजीवन योजनेचे काम पूर्ण करणे प्राधान्य असून त्यानंतर रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील, असे सांगितले. माजी उपसरपंच डी. बी. सावंत यांनी ग्रामपंचायत समित्यांच्या सभा नियमित घेण्याची सूचना केली.

यावेळी शिरीषकुमार देसाई यांचा सत्कार करण्यात आला. सभेस सरपंच किरण आमणगी, उपसरपंच सविता हत्तरगी, समीक्षा देसाई, पाणी समितीचे श्रीपतराव यादव, अतिशकुमार देसाई, रमेश ढोणुक्षे, डी. बी. सावंत, संदेश रायकर, प्रवीण लोकरे, मंदार हळवणकर, मिलिंद कोळेकर, संजय गुरव, बाळासाहेब सावंत, महेंद्र मिसाळ, संभाजी कुराडे, मंजूर बागवान तसेच ग्रामविकास अधिकारी प्रकाश पाटील, उपअभियंता पी. व्ही. कामत, सहायक अभियंता स्वप्निल जाधव, कॉन्ट्रॅक्टर संपत मुडशिंगे व सचिन फाळके उपस्थित होते.

कौतुकास्पद…

जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत घेण्यात आलेल्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षा २०२५-२६ मध्ये उर्दू मराठी विद्यामंदिर, आजरा या शाळेची विद्यार्थिन कु. बरीरा समीर खेडेकर हिने ३०० पैकी २३६ गुण मिळवून कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक कु.जिया इम्रान लमतुरे हिने ३०० पैकी २०६ गुण मिळवून चार तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवला.

छायावृत्त…


आजरा गडहिंग्लज मार्गावरील व्हिक्टोरिया पुलानजीक असणाऱ्या जुन्या वटवृक्षाने मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. नगरपंचायतीची अग्निशमन गाडी तात्काळ पाचारण करण्यात आली व आग विझवण्यात आली. दरम्यान बऱ्यापैकी वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडला.

सत्कार…

सरपंच परिषद मुंबईच्या आजरा शाखेतर्फे नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराचे काम वेगाने

आजरा येथील ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराच्या नूतन वास्तूचे काम वेगाने सुरू असून येत्या वर्षभरात सदर काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. भक्तांकडून कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : ८ एप्रिल २०२६
वार : बुधवार

माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : षष्ठी (सायंकाळी ०७.०१ पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
नक्षत्र : मूळ नक्षत्र (९ एप्रिल सकाळी ०८.४८ पर्यंत)
योग : वरीयान योग (सायंकाळी ०५.०१ पर्यंत) त्यानंतर परिघ योग
करण : वाणीजा करण (सायंकाळी ०७.०१ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : धनु राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.४० ते दुपारी ०२.१४ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.२८
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
आजचे पंचांग

आयपीएल न्यूज 

पावसामुळे ११ षटकांच्या खेळवण्यात आलेल्या मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्यात राजस्थानने एकतर्फी विजय मिळवत गुण तक्त्यात सहा गुणांसह अव्वल स्थान पटकावले.

आजचा सामना ;-

दिल्ली विरुद्ध गुजरात
स्थळ : दिल्ली
वेळ : सायंकाळी ७:३० पासून

 

संबंधित पोस्ट

BREAKING …

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-याची कन्या झाली आमदार… आजऱ्यात जल्लोष

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

माझी भूमिका

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!