mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरुवार दि.९ एप्रिल २०२६

बेपत्ता वृद्धेचा मृतदेह हिरण्यकेशी नदी पात्रात आढळला


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मंगळवारपासून बेपत्ता असणाऱ्या भादवण तालुका आजरा येथील साखरुबाई दत्तू शिंत्रे ( वय ७० वर्षे ) या वृद्ध महिलेचा मृतदेह लक्ष्मी माळ नावाच्या शेताजवळ असणाऱ्या हिरण्यकेशी नदीपात्रात काल बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला.

मंगळवारी शेताकडे जाऊन येतो असे सांगून गेलेल्या साखरबाई परत न आल्याने त्यांचा शोध चालू होता. बुधवारी सकाळी शेताजवळील नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळला.

याबाबतची वर्दी विजय शिवाजी गाडे यांनी आजारा पोलिसात दिली असून हवालदार मकानदार पुढील तपास करीत आहेत.

शहरवासीयांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका…
कचरा प्रश्नी विरोधी नगरसेवक आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरातील कचरा प्रश्न पेटल्यामुळे सर्व विरोधी नगरसेवकांनी नगरपंचायतीमध्ये तातडीची बैठक लावली व संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन धारेवर धरले.

नगरसेवक अभिषेक शिंपी, नगरसेवक परशुराम बामणे, नगरसेवक असिफ पटेल, नगरसेवक आसिफ सोनेखान, नगरसेवक निसार लाडजी, नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार ( परळकर ) यांनी स्वच्छता अधिकारी अमर कांबळे यांना कचरा उठाव चा टेंडर काढण्यास एवढा उशीर का होतोय ? पूर्ण शहरभर कचरा पसरलेला आहे तुम्ही काय आजरेकर रहिवाशांचा संयम सुटायची वाट पाहत आहे काय ? शेवटी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना फोन लावून दोन दिवसात कचरा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावण्याचा आश्वासन दिले.

१२ तारखेपर्यंत कोणताही मार्ग नाही निघाल्यास १३ एप्रिल रोजी विरोधी पक्ष नगरसेवक सर्व आजरेकर जनतेबरोबर ट्रॅक्टर भरून कचरा घेऊन नगरपंचायतच्या दारात आंदोलन करण्याचा इशारा देणार आला, यावेळी नगरसेवक विक्रम पटेकर, नौशाद बुडे खान, किरण कांबळे व शासकीय अधिकारी निहाल मनेर साहेब उपस्थित होते.

शहराची दुरवस्था

सध्या गल्लीबोळात रस्त्यांची कामे वेगाने सुरू असल्याने. एकीकडे शहराचे सौंदर्य वाढत असताना दुसरीकडे कचरा व्यवस्थापन नियोजन कोलमडल्याने या सौंदर्याला गालबोट लागत आहे.

व्यंकटराव महाविद्यालयाच्या साधना व मधुरा यांची नाशिक येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड..


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

येथील व्यंकटराव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आजरा मधील कु. मधुरा प्रकाश दळवी व कु. साधना महेश होसुरकर यांची नाशिक सिन्नर येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच व्यंकटरावचे कबड्डी खेळातील वर्चस्व कायम ठेवत नुकत्याच ( कोथळी) करवीर येथे झालेल्या राज्यस्तरीय खुल्या महिला कबड्डी स्पर्धेमध्ये व्यंकटराव महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक मिळवला .

यशस्वी महिला कबड्डी खेळाडू व मार्गदर्शक (एन.आय.एस) शिक्षक पी.आर.तेरसे व कु. पी एल सासुलकर यांनी मार्गदर्शन केले.

रवळनाथ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

बी.डी.एस् परीक्षेमध्ये अन्वी शरद कुंभार या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनीला सिल्व्हर मेडल प्राप्त झाले आहे. तर गुरुकुल टॅलेंट परीक्षेत मीरा सुरज पोतनीस,ज्ञानेश प्रविण पाटील, आराध्या गौतम सुतार व अथर्व लक्ष्मण मुळीक यांनी राज्यात अनुक्रमे ८ वा, ९ वा, ११ वा व १२ वा क्रमांक तर जिल्हा गुणवत्ता यादीत अनुक्रमे ३ रा, ४ था,६ वा व ७ वा क्रमांक पटकावला आहे.

श्री.रवळनाथ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उज्ज्वला देसाई , सौ.निलांबरी कामत , मोनिका पाटील , विशाल गुरव , स्नेहल भोसले या शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

निधन वार्ता

मडिलगे तालुका आजरा येथील माजी सैनिक सुरेश महादेव कुंभार (वय ४४ वर्षे सध्या रा.आयडीयल कॉलनी आजरा) यांचे अल्पशा आजाराने काल बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

उद्या शुक्रवारी सकाळी आजरा येथे रक्षाविसर्जन कार्यक्रम आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बुरुडे विविध कार्यक्रम

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमरत्न युवा मंडळ, बुरुडे यांच्यावतीने मंगळवार दिनांक १४ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे दहा हजार, पाच हजार, तीन हजार, दोन हजार रुपये रोख व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

याच दिवशी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत समाज मंदिर, बुरुडे येथे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

आजचे पंचांग

दिनांक ९ एप्रिल २०२६

वार : गुरुवार

माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : सप्तमी (रात्री ०९.१९ पर्यंत) त्यानंतर अष्टमी तिथी
नक्षत्र : मूळ नक्षत्र (सकाळी ०८.४८ पर्यंत) त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र
योग : परिघ योग (सायंकाळी ०५.५७ पर्यंत) त्यानंतर शिवा योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ०८.१२ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : धनु राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.१३ ते दुपारी ०३.४७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१५ ते दुपारी ०१.०५
सूर्योदय : सकाळी ०६.२७
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
आजचे पंचांग

आयपीएल न्यूज 

रोमहर्षक सामन्यात दिल्लीला गुजरातने नमवले.

शेवटच्या दोन चेंडू दोन धावांची गरज असताना डेविड मिलर ने एकेरी धाव न घेतल्याने दिल्लीला पराभवाला सामोरे जावे लागले. शेवटच्या चेंडूत दोन धावा काढण्यात त्याला अपयश आले. रशीद खान सामनावीर ठरला.

आजचा सामना

कोलकता विरुद्ध लखनौ

स्थळ : कोलकता
वेळ : सायंकाळी ७.३० पासून

 

संबंधित पोस्ट

बेपत्ता शेतकऱ्याचे प्रेत विहिरीत आढळले

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

गटविकास अधिकाऱ्यांना काळे फासल्याप्रकरणी विलास जोशिलकर याला तीन महिन्यांची कैद

mrityunjay mahanews

आंबोलीत ‘मुसळ’धार … आजऱ्यात ‘कोसळ’धार …

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!