mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार १६ फेब्रुवारी २०२६

रामतीर्थ यात्रेस उत्साहात सुरुवात 


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या रामतीर्थ यात्रेस रविवारी उत्साहात प्रारंभ झाला.

महाशिवरात्री व यात्रेचा पार्श्वभूमीवर अनेक भाविकांनी यात्रास्थळी हजेरी लावून हिरण्यकेशीमध्ये स्नानासह महादेव मंदिराला भेट दिली. रविवार हा आठवडा सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांशी चाकरमान्यांनी रविवारीच यात्रेचा आनंद लुटला.

यात्रेचा आज सोमवार हा मुख्य दिवस आहे . दुपारी तीन वाजता पालखीचे आगमन यात्रा स्थळी होणार आहे. रामतीर्थ परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आजरा आगाराकडून विशेष बसफेऱ्या दिवसभर सुरू राहणार आहेत.

यात्रा परिसरात चार चाकी व दुचाकी वाहने नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

विकास कामांचा बॅकलॉग भरून काढणार : जयवंतराव सुतार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

‘पराभवाने खचून न जाता यापुढेही विकास कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण बांधील आहोत. केवळ पराभव झाला म्हणून कुठल्याही गावावर अन्याय होऊ देणार नाही:’ असा विश्वास भाजपाचे युवा नेते जयवंतराव सुतार यांनी व्यक्त केला. त्यांच्या माध्यमातून मंजूर असलेल्या वाटंगी ते किणे ३० लाखांच्या रस्त्याचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

भाजपचे तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी यांच्या हस्ते सदर कामाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जयवंतराव सुतार होते. सदर कामासाठी आमदार शिवाजीराव पाटील आणि तालुक्याचे नेते अशोकअण्णा चराटी यांचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी संभाजीराव सरदेसाई, आनंदराव कातकर विजय देसाई, शिवाजी गिलबिले, शिवप्रसाद देसाई, संदीप देसाई,संतोष चौगले, नारायण साटपे, अमोल सुतार,भिमराव सुतार, शशिकांत थोरवत,अशोक जाधव, गणपती कानडे, मधुकर जाधव, बाळू चौगले, उमेश घोरपडे, रवी देसाई, पुंडलिक नाईक,आनंदा मलगोंडे, एकनाथ नांदवडेकर, मोहन घेवडे,शिवाजी सावंत,काशिनाथ चौगले, दिलीप पाटील,राजू बुडके, सुजय पाटील, गणपती पाटील,आदी उपस्थित होते.

विकास कामाच्या माध्यमातून ओळख निर्माण करावी : अशोक चराटी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने उभे केलेल्या उमेदवारांपैकी वाटंगी पंचायत समिती मधून समिर पारदे भरघोस मतानी निवडून आल्याने त्यांनी विकास कामाच्या माध्मामातून तालुक्यात नवी ओळख निर्माण करावी, यासाठी  सदैव पाठिशी असल्याचे आश्वासन मलिग्रे येथील मराठी शाळेच्या पटांगणात घेतलेल्या पंचायत समिती विजयी मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

प्रास्ताविक मुंबई मंडळाचे अध्यक्ष दत्ता मराठे यानी केले.  समिर पारदे यांनी केवळ गाव म्हणून न थांबता वाटंगी पंचायत समितीतील सर्व गावांना न्याय द्यावा अशी मागणी केली.

जयवंत सुतार पराभूत होवूनही जनतेची कामे करणारा कार्यकर्ता आहे. सार्वजनीक कामाच्या उद्घाट्नास त्यांनी सुरूवात केली आहे. यावेळी गावच्या तळ्याच्या दुरूस्ती करीता एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आजरा अर्बन बँकेचे माजी चेअरमन डॉ.अनिल देशपांडे, संचालक विजय पाटील, ज्योत्स्ना चराटी, सरपंच शारदा गुरव, सुषमा पाटील, प्रियांका आजगेकर, आनंदा कांबळे, सुरेश रेडेकर, गोविंदा चव्हाण,सुहास जोंधळे, विकास बागडी, प्रकाश पाटील, सुरेश सावंत, बाबू होडगे शंकर नेसरीकर, एकनाथ ईक्के, अनिल बुगडे याच्यासह वाटंगी गणातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन संजय पन्हाळकर यानी केले तर आभार संभाजी सरदेसाई यांनी मानले.

विश्वजीत डोंगरे यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भादवण येथील विश्वजीत गणपतराव डोंगरे (४२ वर्षे )यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील,दोन  मुली असा परिवार आहे.

भादवण येथे आज सोमवारी सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

कमलाबाई उंडगे

भादवण ता.आजरा येथील कै.कमळाबाई लक्ष्मण उंडगे ( वय ९० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात ३ विवाहित मुले, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

भादवण पंचायत समिती मतदार संघात
उमेदवार निहाय गावावर पडलेली मते

पंचायत समिती भादवण उमेदवार निहाय गाववार मते

अनुक्रमे…

सौ.जयश्री गाडे/. सौ.भारती डेळेकर/ सौ. साधना केसरकर

भादवण-  ९४८९/. २०९/. ७०१

पेद्रेवाडी-   ३००/. १८७/. १११

मडिलगे-   ८१७/. ४८९/. ४४८

मासेवाडी-   २१८/. २२८/. १९२

चांदेवाडी-   ८६/. १२७/. ६६

जाधेवाडी-   १७७/. ७२/. ४६

वझरे –   १९२/. ४७२/. १४८

भादवणवाडी-   २५२/. १९२/. १४८

हाजगोळी बु.-   ९५/. २३०/. ७४

हाजगोळी खु.-   १५२/. १४५/. ९५

सरोळी-   २४४/. १९४/. १८८

सुलगाव-   १५७/. १८९/. ७३

सोहाळे-   ११९/. २३०/. ५३

बाची-   ८८/. २०९/. २६

निंगुडगे-   ३८५/. २४२/. ३०९

खेडे-   २७४/. २१८/. १८४

मुंगूसवाडी-   ८७/. १२४/. ३७

खोराटवाडी-   १७९/. ६६/. ३४

कानोली-   १७९/. १८७/. १३१

हारुर-    १५४/. १२४/. ७२

कोवाडे-   ३६६/. ४९७/. २३५

गजरगाव-   ४२७/. ३५४/. ३५५


सौ.जयश्री गजानन गाडे –  ६१५३

सौ.भारती कृष्णा डेळेकर-  ४९०४

सौ. साधना संजय केसरकर-  ३७८८


सौ. जयश्री गजानन गाडे – राष्ट्रवादी काँग्रेस विजयी


बहिरेवाडीतील ह.भ.प. आप्पा मोरे यांचा अमृतमहोत्सवी सोहळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

बहिरेवाडी ( ता. आजरा ) येथील हभप श्री.आप्पा लक्ष्मण मोरे व सौ. हौशाबाई आप्पा मोरे यांच्या सहजीवनाचा अमृतमहोत्सवी सोहळा संपन्न झाला. ग्रंथतुला, समई प्रदान व हरिपाठाचे वाटप करणेत आले. ग्रंथतुलातील पुस्तकांची प्राथमिक विद्यामंदिर, भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी व श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा यांना समारंभपूर्वक सुपूर्द करणेत आली. श्री रुक्मिणी विठ्ठल मंदिरसाठी पंढरपूरचे हभप श्री एकनाथ नामदास महाराज यांचेकडे मोरे कुटूंबियांच्यावतीने दोन समई प्रदान करण्यात आली.

मोरे कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत आई-वडिलांच्या सहजीवनाचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे असे गौरवोद्गार पंढरपूरचे हभप श्री एकनाथ नामदास महाराज यांनी काढले.

मोरे दाम्पत्यांचा सहजीवनाचा अमृत महोत्सव व हभप आप्पा मोरे यांचा ९१ वा वाढदिवस असा संयुक्त सोहळा श्री. रुक्मिणी विठ्ठल मंदिर बहिरवाडी येथे घेण्यात आला. मोरे कुटुंबीयांच्या वतीने पाद्यपूजन, ९१आरतीची ओवाळणी, मंदिरासाठी दोन समई भेट व सार्थ हरिपाठाचे वाटप व महाप्रसाद देणेत आला. हभप श्री एकनाथ नामदास महाराज यांच्या हस्ते हभप आप्पा मोरे व सौ हौशाबाई मोरे यांचा कपडे, साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. वयाची ९१ वर्षे व सहजीवनाचा अमृत महोत्सव सोहळा हा दुर्मिळ योग असून या निमित्ताने मोरे कुटुंबीयांनी केलेले सामाजिक योगदान वारकरी संप्रदायाला प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार हभप श्री. एकनाथ नामदास महाराज यांनी काढले.

यावेळी श्री रुक्मिणी विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने झालेल्या सप्ताहाचे व्यासपीठ चालक हभप श्री. नानासो यादव, सदाशिव पिटके, बंडोपंत चौगुले, राजाराम चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, जयवंत शिंत्रे, गजानन मिरजकर,कल्लाप्पा मिरजकर, सावळाप्पा मिसाळ, अर्जुन कुंभार, सुरेश पाटील, विजय काकडे,सदाशिव शिंत्रे यासह वारकरी व मोरे कुटूंबिय उपस्थित होते.

शिवसेनेच्या शिक्षण सेना उर्दू विभाग जिल्हा अध्यक्षपदी यासीन सय्यद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना उर्दू विभाग माध्यम कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी आजरा येथील यासीन घुडूसाहेब सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे‌ याबाबतचे लेखी पत्र त्यांना मुस्ताक पटेल राज्याध्यक्ष व सचिव नवीद पटेल उर्दू विभाग महाराष्ट्र शिक्षण सेना यांनी दिले आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

छाया वृत्त

महाशिवरात्री यात्रेनिमित्त गजरगाव येथे श्री लकमेश्वर यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून महाप्रसाद होणार आहे.

आजरा हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा हायस्कूलमध्ये एस. एस. सी. बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित शुभेच्छा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आजरा नगरपंचायतीचे नूतन नगराध्यक्ष श्री. अशोकअण्णा चराटी होते.तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. श्री.अनिल देशपांडे,संचालक सु.ई.डांग, संचालक श्री विजयकुमार पाटील, संचालक  श्री .के.वी. येसणे, सल्लागार सौ.सुरेखा भालेराव , माजी मुख्याध्यापक श्री. बी.एम. दरी उपस्थित होते .

प्रस्ताविकामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री. अजित तोडकर यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. श्री. अशोकअण्णा चराटी यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सदिच्छा देत आत्मविश्वास, कठोर परिश्रम, वेळेचे नियोजन व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परीक्षेस सामोरे जावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. ड्रिंकिंग वॉटर एरिया ,१२ केवी सोलर पॅनल, स्टेम लॅब, डिजिटल क्लासरूम व अत्याधुनिक वॉशरूम याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

श्री. व्ही.ए. पोतदार यांनी सूत्रसंचालन केले केले तर आभार सौ संजीवनी कुराडे यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री अजित तोडकर, उपमुख्याध्यापक सौ एच एस कामत, पर्यवेक्षक श्री ए आर व्हसकोटी, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक निकालाचे रोखठोक विश्लेषण खालील लिंक वर पहा…

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आर.टी.कांबळे यांचे निधन

mrityunjay mahanews

सभासदांच्या व हितचिंतकांच्या भक्कम पाठबळावर ‘जनता बँकेची’ वाटचाल : अध्यक्ष मुकुंदराव देसाई … बँकेची 60 वी वार्षिक सभा उत्साहात

mrityunjay mahanews

News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!