शुक्रवार ४ जुलै २०२५

सर्पदंशाने एकाचा मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लघुशंकेसाठी घराबाहेरील अंगणात गेले असता सर्पदंश होऊन बाळकृष्ण गणपती दोरुगडे या सोहाळेवाडी येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
याबाबत त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेली माहिती अशी…
नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री दोरुगडे हे जेवणानंतर झोपी गेले दरम्यान जाग आल्याने लघुशंकेसाठी मध्येच उठून ते दारात गेले असता तेथेच त्यांना सर्पदंश झाला.नेमके काय चावले हे लक्षात आले नसल्याने सकाळी दवाखान्यात दाखवू असा समज करून ते पुन्हा झोपी गेले. दरम्यान सकाळी ते मृतावस्थेत आढळले.
त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी, जावई, मुलगा, पत्नी असा परिवार आहे.
कामावर हजर होण्यादिवशीच वडिलांचा मृत्यू …
त्यांच्या निरज या एकूलत्या एक मुलाची केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झाली आहे .तो गुजरात येथे प्रशिक्षणासाठी हजर होण्यासाठी जात असतानाच सदर प्रकार घडला. एकीकडे मुलाच्या नोकरीचे स्वप्न साकार झाल्याने आनंदात असणारे दोरुगडे कुटुंबीय या घटनेने दुःखाच्या सागरात बुडाले आहे.

आजऱ्यातील लक्ष्मीबाई झाल्या जटेच्या जोखडातून मुक्त

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील गांधीनगरमध्ये अंत्यत गरीब परीस्थिती जगणाऱ्या, आणी वयाची सत्तरी पार केलेल्या लक्ष्मीबाई अर्जुन नाईक यांना मानेवरच्या जटेने असह्य केले होते. गेली दोन महीने पावसाच्या भितीने डोक्यावरून आंघोळही केली नव्हती. एकदा जट भिजली तर या पावसात वाळणार नाही, अनं वाळली नाही तर वास सुटणार ही भिती मनात होती. अंगात ताकत होती, तोपर्यंत त्यानी डोक्यातील जटेचा सुमारे बारा वर्षे सांभाळ केला. सामाजिक कार्यकर्त्या सौ. गिताताई पोतदार यानी त्यांना बऱ्याच वेळा जट काढण्यासाठी विचारलं होतं, पण देवीच्या धास्तीने होकार दिला नाही. त्यांच्या वयोमानाने जटेच्या ओझ्याने मानेच्या व्याधी वाढल्या आहेत, काम होत नाही, सरकारी पेन्शन मिळते. ती घेण्यासाठी बँकेत गेल्यावर जिल्हा बँकेच्या कर्मचारी सौ.भैरवी सावंत यांनी जटेचे ओझे कमी करण्याचा हट्ट धरला होता. त्या दरवर्षी यल्लमादेवीच्या दर्शनाला जातात, देवीवर श्रध्दा आहे,पण आता वयाचा विचार करून, मानदुखीच्या त्रासतून मुक्त होण्यासाठी त्यांनी गिताताईना जटेतुन मुक्त करा असे सांगितले.
लक्ष्मीबाईच्या होकाराने महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन जिल्हा प्रतिनिधी सौ. गिता पोतदार यानी आजरा तालुका कार्याध्यक्ष काशिनाथ मोरे, तालुका प्रधान सचिव संजय घाटगे, तालुका उपाध्यक्ष भिकाजी कांबळे, हाळोली शाळेच्या शिक्षिका सुरेखा नाईक याच्या मदतीने लक्ष्मीबाईच्या डोक्यावरली आठ किलो वजनाची जट कमी करून जोखडातून मुक्त केले अनं लक्ष्मी मावशीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

अंनिस संघटने मार्फत त्यांचा यथोचीत सत्कार केला.यावेळी काशिनाथ मोरे यानी शारीरिक स्वच्छता सातत्याने केल्यास शरीर व मन तंदुरुस्त राहते. जटा असलेल्या महिलांना वाढत्या वयाने त्रास होतो, तो कमी होण्यासाठी अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पावसाचा जोर वाढला
पुन्हा साळगाव बंधाऱ्यावर पाणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला असून बुधवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे पुन्हा एक वेळ साळगाव बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक झाली आहे. तर नदी पात्राबाहेर आल्याने इतर छोटे-मोठे बंधारेही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. तालुक्यातील बंधाऱ्यांसह रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. जून महिन्यातच तुडुंब भरलेले सर्फनाला मध्यम प्रकल्प व अद्याप किमान दोन ते अडीच महिने पाऊस असल्याने साळगावकरांना पुन्हा पुन्हा बंधाऱ्यावर पाणी येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या योगदानाने सहकार चळवळ बळकट ; प्रा. अर्जुन आबिटकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राज्यातील सहकार चळवळीचा नावलौकिक संपूर्ण देशात असून या चळवळीच्या योगदानात सहकारातील काम करणाऱ्या प्रत्येकाचे योगदान आहे. विशेष करून कर्मचा-यांच्या योगदानातून सहकार चळवळ बळकट झाल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी केले .आजरा येथील सहकारी कर्मचाऱ्यांच्या मोफत आरोग्य शिबीरात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमच्या अध्यस्थानी तहसीलदार समीर माने होते. स्वागत व प्रास्ताविक गटसचिव सुभाष पाटील यांनी केले. सहायक निबंधक सुजयकुमार येजरे यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. तहसीलदार समीर माने यांनी शेतकरी आणि सचिव हे ग्रामीण भागातील शेवटचे घटक म्हणून काम करतात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे शासनाचे काम आहे. सहकारी कर्मचारी यांनी ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिक व शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करावे असे स्पष्ट केले.
प्रा. आबिटकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे सूचनेनुसार या शिबिराचे जिल्हाभरात आयोजन केले आहे, याचा सर्व घटकानी लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी तालुक्यातील सेवा संस्थेचे गटसचिव आणि पतसंस्था कर्मचारी यांची आरोग्य तपासणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रविंद्र गुरव, आजरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील, डॉ.सुरजीत पांडव यांनी सर्व कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी केली, यामध्ये प्रामुख्याने रक्त तपासणी, ई. सी. जी. तपासणी, नेत्र तपासणी व आरोग्याच्या बाबतीतील सर्व तपासण्या करण्यात आल्या व निदानाबाबत योग्य मार्गदर्शन केले.
यावेळी संजय घाटगे, महादेव पाटील, नेताजी पाटील, अर्जुन कुंभार, यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमास जे. एन. बंडगर, सुधीर कुंभार, राजेंद्र सावंत, विजय थोरवत, रणजित सरदेसाई, संभाजी सरदेसाई, विक्रम पाटील, सुभाष चौगुले,संतोष ढोणूक्षे यांच्यासह तालुक्यातील गटसचिव व पतसंस्था कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
आंतराष्ट्रीय सहकार वर्ष व केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिवसाचे औचित्य साधून प्रभात फेरी काढण्यात आली. आभार सहकारी अधिकारी प्रमोद फडणीस यांनी मानले.

आजरा तालूक्यात “ओला दुष्काळ” जाहीर करा…
सरपंच संघटनेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये मे महिन्यापासूनच पाऊस प्रमाणापेक्षा जास्त झाला तसेच जून महिन्यात तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. धरणे भरून ओव्हरफ्लो झाली आहेत शेतात पाणी तुंबल्यामुळे पेरणी करण्यामध्ये अडचणी होत आहेत त्यामूळे शेतकऱ्यांच्या पेरण्या राहील्या आहेत. शेतकऱ्यांची भात, नाचणा, भुईमुग, सोयाबीन व इतर सर्व बियाणे पेरली असून त्यांचे सर्व पीक अतिवृष्टीमुळे कुजून खराब होवून गेलेले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे. दुबार पेरणी करूनही पेरलेले बियाणे कुजून जात आहे. ऊस पिकामध्ये अती पावसाने पाणी साचले आहे. त्यामुळे ऊसाचीही वाढ खुंटली आहे.अंदाजे भात पीक ९३०० हेक्टर, नाचणी ३२०० हेक्टर, ऊस ६६०० हेक्टर, भुईमुग १५६० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे.
वरील सर्व गोष्टींचा विचार करून सर्व पिकांचे पंचनामे करून आजरा तालूक्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचे एकरी ५० हजारांची आर्थिक मदत तातडीने मिळविण्यासाठी शासनाकडे शिफारस करावी अशी मागणी तालुका सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले असून यावेळी मारुती मोरे, बापू नेऊंगरे, संभाजी सरदेसाई, रणजीत देसाई, विकास बागडी, सुषमा पाटील, भारती डेळेकर, कल्पना डोंगरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आंबेओहोळ प्रकल्पाच्या पाण्याचे पुजन

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेला आंबेओहोळ प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरून वाहू लागलेने उत्तूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने सलग पाचव्या वेळी भरलेल्या जलाशयाच्या पाण्याचे पुजन करणेत आले.
यावेळी प्रकल्पग्रस्त व लाभधारक शेतकरी यांच्या वतीने पाणी पूजन करण्यात आले. याप्रसंगी वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, मारुती घोरपडे , शिरीष देसाई, गणपतराव सांगले, दशरथ धुरे,गंगाधर हराळे, शिवाजीराव कुऱाडे,विजयराव वांगणेकर, शंकर पावले, संजय येजरे, मच्छिंद्र कडगावकर, सुधीर सावंत, सुधाकर सावंत, सदा पोटे, पांडुरंग खोराटे, दत्ता केसरकर, संभाजी पाटील, संजय पोवार , विनायक तेली, संजय हत्तरगी, जानबा कुरुणकर, तुषार घोरपडे, आप्पासाहेब शिंत्रे,पिंटू मगदूम,दिपक रावण आदी मंडळी उपस्थित होते.

आजरा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री संभाजी पांडुरंग होलम यांचा सेवानिवृत्तीनिमित्य सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले आजरा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. संभाजी होलम यांचा सेवापूर्ती शुभेच्छा समारंभ पार पडला. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक अण्णा चराटी यांच्या हस्ते श्री. होलम यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी जनता शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. दिपक सातोस्कर, श्री. विजय पाटील,प्रा. डी. जे. भालेराव , सौ. सुरेखा भालेराव, श्री. आय. के. पाटील उपस्थित होते. माजी पं. समीती सभापती सौ. रचना होलम, नगराध्यक्षा सौ. ज्योत्स्ना चराटी-पाटील, श्री. नामदेव नार्वेकर, श्री. राजू होलम, तसेच प्रो कबड्डी खेळाडू गुरुनाथ मोरे, प्रमुख उपस्थितीत होते.

रवळनाथ- भावेश्वरी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब सांबरेकर, उपाध्यक्षपदी धोंडीबा सुपल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रवळनाथ- भावेश्वरी सेवा सोसायटी भावेवाडीच्या अध्पयक्षपदी बाळासाॊ सांबरेकर व उपाध्यक्षपदी जयवंत सुपल यांची बिनविरोध निवड झाली. सहाय्यक निबंधक सुजय येजरे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकारी निवडीची बैठक पार पडली.
यावेळी संजय सांबरेकर, मारुती गुरव, दिगंबर सरदेसाई, यांनी आनंदा भुतुर्ले , विश्राम घुरे, धोंडीबा मळेकर, बंडू सुतार, धोंडीबा सांबरेकर, तुकाराम पवार उपस्थित होते
आभार सचिव देसाई यांनी मानले.

महात्मा गांधी विकास सेवा संस्थेची संस्था पातळीवर १०० टक्के कर्ज वसुली
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दर्डेवाडी येथील श्री. महात्मा गांधी विकास सेवा संस्थेची संस्था पातळीवर १०० टक्के कर्ज वसुली झाली. संस्थेने ३० जून अखेर २ कोटींची कर्ज वसूली केली. संस्थेचे भागभांडवल ४८ लाख ६६ हजार ४४६ इतके असून ठेवी ६० लाख ६९ हजार इतक्या आहेत. संस्थेने स्वभांडवलातून ४० लाख ४० हजार ७०० रूपयांचे कर्ज वाटप केले आहे.
याकामी संस्थेचे चेअरमन सुरेश पाटकर, व्हा. चेअरमन निवृत्ती देवेकर, सर्व संचालक, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, सहाय्यक निंबधक सुजयकुमार येजरे, बँक निरीक्षक आर. आर. देसाई, बँक शाखा मॅनेजर सावंत, सचिव महादेव गुरव, क्लार्क शिवाजी माडभगत यांचे सहकार्य लाभले.

उबाठा सेनेचा आज रास्ता रोको…
आजरा-महागाव मार्गावर बुरुडे नजिक झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर आज संताजी पुलावर सकाळी अकरा वाजता शिवसेना (उबाठा) च्या वतीने रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले आहे.



