mrityunjaymahanews
अन्यकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारसामाजिक

सातच्या बातम्या

शुक्रवार १३ जून २०२५       

भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

         संकेश्वर – बांदा महामार्गावर सुलगाव फाट्या नजीक काल गुरुवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात भरधाव वाहनाने येथील हॉटेल टपरी चालक कृष्णा महादेव कुंभार रा. सुलगाव या ६६ वर्षीय वृद्धाला जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी…

      कुंभार यांचे सुलगाव फाट्यावर टपरी वजा हॉटेल आहे. हॉटेल बंद करून ते रस्ता ओलांडून कचरा टाकण्याकरता गेले होते. पुन्हा रस्ता ओलांडताना गडहिंग्लच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली यामध्ये ते उडून बाजूला पडले व त्यातच गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

     त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.

कहर…
पावसामुळे आजरा शहरात घरादारात पाणीच पाणी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      ढगांच्या गडगडाटासह गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शहरवासीयांची चांगलीच दाणादाण उडाली. येथील संभाजी चौकाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. तर सुतार गल्ली, चाफे गल्ली परिसरातील रहिवाशांच्या घरामध्ये गटर्सचे पाणी घुसले.

       तुफान पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. इनास गॉडद, अशोक पाचवडेकर, सुरेश जाधव, किरण पोवार यासह अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.

      सध्या सुरू असलेले व अपूर्णावस्थेत असलेल्या नळपाणीपुरवठा योजनेच्या खुदाईचा फटका संपूर्ण शहराला बसत असून शहरभर चिखलाचे साम्राज्य झाले आहे. असाच जोरदार पाऊस झाल्यास ठीक ठिकाणी पाणी साचून रोगराई पसरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Live :-

संभ्रमावस्था…
तो पट्टेरी वाघ…?


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     वाटंगी येथे रात्रीच्या वेळी कांही तरुणांनी पाहिलेला वाघ हा ठशांचे एकंदर स्वरूप पाहता बिबट्या नसून तो पट्टेरी वाघ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चितळे येथील जंगलामध्ये पट्टेरी वाघाचे अस्तित्व यापूर्वी होते. चितळे व वाटंगी परिसर एकमेकांशी संलग्न आहे. चितळे येथून जंगलातून सदर वाघ वाटंगी परिसरात आला असावा व तो परत मोरेवाडी मार्गे पुन्हा चितळेच्या दिशेने गेला असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

      सापडलेले पायाचे ठसे हे बिबट्याच्या पायांच्या ठशांपेक्षा मोठे असल्याने तो पट्टेरी वाघ असण्याची शक्यता वनविभागाकडून वर्तवली जात आहे.

        ग्राहकांची परवानगी नसताना स्मार्ट मिटर बसविणे त्वरीत थांबवावे.

अन्याय निवारण समितीचे निवेदन

          आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत आजरा,गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील गावांमध्ये नादुरुस्त मिटरचे ठिकाणी नवीन स्मार्ट मिटर बसविण्यात येत आहेत. जर ग्राहकानी विरोध केलेस तुमचा विज पुरवठा बंद पडणार अशी भिती घातली जात आहे.
स्मार्ट मिटर बसविलेल्या ठिकाणी चालु बिले दोन ते अडीचपट जास्त येत असलेचे ग्राहकांकडून निदर्शनास आणून देण्यात आले
परंतु. याकडे वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करुन सर्व बिल भरणेसाठी भाग पाडत आहे.

      तेंव्हा स्मार्ट मिटरचे अचुकतेविषयी शंका असल्यामुळे अरोग्यावर होणारे परिणाम व मिटर बसविणेत येणारा खर्च अप्रत्यक्ष ग्राहकावर लादला जाण्याची शक्यता आहे.
तेंव्हा ग्राहकांच्या परवानगी शिवाय स्मार्ट मिटर बसविणेचे काम त्वरीत थांबवावे. याबाबत आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती तर्फे आजरा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला देण्यात आले.

      याप्रसंगी पुणे निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, विजय थोरवत, जावेद पठाण, बंडोपंत चव्हाण, गौरव देशपांडे, दिनकर जाधव, मिनीन डिसोझा ,पांडुरंग सावरतकर, उपस्थित होते.

नगरपंचायतीची प्रभाग रचना सुरु

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा नगरपंचायतीकरता प्रभाग रचनेचा कार्यक्रम पुढील प्रमाणे जाहीर झाला आहे…

प्रगणक गटाची मांडणी करणे : ११ ते १६ जून, २०२५
प्रारुप प्रभाग रचना तयार करणे (मुख्याधिकारी अखत्यारीत)
१) जनगणनेनची प्राप्त माहिती तपासणे.
१७ ते १८ जून, २०२५
२) स्थळ पाहणी.
१९ ते २३ जून, २०२५
३) गुगलमॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे.
२४ ते २६ जून,
४) नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागहद्दी जागेवर जावून तपासणे. २७ जून ते ३० जून, २०२५
५) प्रारुप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे.
०१ ते ०३ जुलै, २०२५

प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठविणे (मुख्याधिकारी अखत्यारीत)
०४ जुलै ते ०८ जुलै २०२५ व राज्य निवडणुक आयोग / आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिका-याने प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता देणे.

प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती सूचना मागविणे (मुख्याधिकारी अखत्यारीत)
१५ जुलै ते २१ जुलै, २०२५

जिल्हाधिकारी/ जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिका-याने प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेणे. (जिल्हाधिकारी / संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी अखत्यारीत)
२२ जुलै, २०२५ ते ३१ जुलै, २०२५

सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिका-यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना मा. राज्य निवडणूक आयोगास मान्यतेस पाठविणे- ०१ ऑगस्ट ते ०७ ऑगस्ट, २०२५ व राज्य निवडणूक आयुक्त यांनी मान्यता दिलेली प्रभाग रचना सबंधित महापालिका आयुक्त/ मुख्याधिकारी यांना कळविणे. ( मुख्याधिकारी अखत्यारीत)

राज्य निवडणुक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे.
( मुख्याधिकारी अखत्यारीत)
२२ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर, २०२५

       प्रभाग रचनेचा एकंदर कार्यक्रम पाहता नगरपंचायत निवडणूक मतदान प्रक्रिया १५ ऑक्टोंबर नंतरच होण्याची शक्यता आहे म्हणून.

कोरोना अलर्ट…

      कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवार अखेर कोरोनाचे एकूण ३० रुग्ण… जिल्ह्यातील ८५ वर्षीय व्यक्तीचा काल मृत्यू एकूण मृतांची संख्या… ४

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजऱ्यातील गणेश बनणार करोडपती???…चाळोबावाडी येथील वर्ग खोल्यांचा प्रश्न ऐरणीवर … खाजगी व्यक्तीने वर्गखोलीचा ताबा घेतल्याने विद्यार्थी वाऱ्यावर…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अखेर डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलच्या मुख्याध्यापकासह लिपिकाविरोधात गुन्हा नोंद…

mrityunjay mahanews

आजऱ्यात जिल्हा बँकेचा धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता….

mrityunjay mahanews
error: Content is protected !!