मंगळवार दिनांक १३ मे २०२५


वृद्ध दांपत्यास मारहाण…
तिघांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बहिरेवाडी ता. आजरा येथे पूर्व वैमनस्यातून वृद्ध दांपत्यास मारहाण केल्याप्रकरणी तानाजी गणपती नाईक, राजु गणपती नाईक, नागु नाईक सर्व रा.बहिरेवाडी ता. आजरा या तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत सौ. सुनिता रामचंद्र ऐवाळे ( व.व. ६० रा. बहिरेवाडी ता आजरा जिल्हा कोल्हापूर ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी…
तानाजी गणपती नाईक,राजु गणपती नाईक ,नागु नाईक हे तिघे १० मे रोजी रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ऐवाळे हे दारात बसले असताना तिघांनी तेथे येऊन सौ. ऐवाळे यांना मुलगा उत्तम कुठे आहे ? असे विचारून सौ.सुनीता यांना काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण केली यावेळी सुनीता यांच्या पतींनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली व तुम्हाला सोडत नाही अशी धमकी देत घरात घुसून घरातील टी. व्ही व तिजोरी पाडुन फोडली त सेच फिर्यादी यांचे गळ्यातील मंगळसूत्र तोडुन नुकसान केले आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

जागतिक शांततेसाठी बुद्धांची गरज…
प्रा.अर्जुन आबिटकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जगामध्ये शांतता राखायची असेल तर महात्मा गौतम बुध्दांच्या विचारांची गरज नको, तर आता बुध्दच हवेत असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी केले.
बुरुडे (ता. आजरा) येथे भिमरत्न तरुण मंडळाच्यावतीने छ. शिवाजी महाराज, डॉ .बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुध्द यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रा. आबिटकर बोलत होते. आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी भिमरत्न तरुण मंडळ बुरुडेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
आजरा सुतगिरणीचे संचालक शशिकांत सावंत यांनी स्वागत केले. गावातील विकास कामांचा आढावा त्यांनी घेतला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्याने विकासकामांसाठी निधी उपलब्ध करणार आहे असे ते म्हणाले.
प्रा. अर्जुन आबिटकर म्हणाले, आजरा तालुक्याच्या विकासासाठी कटिबध्द आहे. बुरुडेसाठी आवश्यक निधी दिला जाईल. मुकुंदराव देसाई म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना विविध योजना राबवले. कारखाना कर्जमुक्त करण्यावर भर आहे.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अनिरुध्द केसरकर, युवा नेते अनिकेत चराटी, भाजपचे ओबीसी सेलचे अध्यक्ष जयवंत सुतार, जनता बँकेचे संचालक रणजित देसाई, निंगुडगेचे माजी सरपंच संभाजी सरदेसाई, भिमरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल कांबळे, उपाध्यक्ष अमल कांबळे, अक्षय कांबळे, रोशन कांबळे, विनायक कांबळे, सागर कांबळे, शंकर जोशीलकर, धोंडीबा पाटील, पद्मजा बागवे, सुरेश कांबळे, विजया कांबळे, सदाशिव कांबळे आदी उपस्थित होते मायकेल फर्नांडीस यांनी सुत्रसंचालन केले.
सूर्यकांत कांबळे यांनी आभार मानले.

पेरणोली येथे संविधान कट्टयाचे उद्घाटन...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली (ता. आजरा) येथे संविधान कट्ट्याचे उद्घाटन सरपंच प्रियांका जाधव यांच्या हस्ते झाले. संविधान संवर्धन चळवळीचे मुख्य प्रवर्तक संग्राम सावंत, संविधान संवादक मेधाराणी भाईगडे, डॉ. उल्हास त्रिरत्ने, उपसरपंच संदिप नावलकर प्रमुख उपस्थित होते. जिल्हयातील पहिला संविधान कट्टा पेरणोली ग्रामपंचायतीने उभा केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
श्री. सावंत व त्रिरत्ने यांनी संविधानाबाबत माहीती दिली. ग्रामपंचायत सदस्य शुभदा सावंत, सुनिता कालेकर, अश्विनी कांबळे, सुषमा मोहीते, अमोल जाधव, रणजित फगरे, संकेत सावंत, संतोष जाधव, पांडुरंग निकम, मारुती दारुडकर, उदय कोडक, संदिप जाधव यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत अधिकारी संदिप चौगले यांनी स्वागत, प्रास्ताविक व आभार मानले.

आज दहावीचा निकाल
दु.१.००वाजता खालील वेबसाईटवर पहा दहावीचा निकाल-
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
विठ्ठल रुक्मिणी मंदिर गजरगाव कळसारोहण सोहळा


आजऱ्यात पावसाची हजेरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहर व परिसरात सोमवारी दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली. गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. लग्नाचे मुहूर्त व यात्रा जत्रा ऐन बहरात असतानाच पावसाने दुपारीच हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली.
पावसामुळे कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. तालुक्यातील बळीराजा मात्र या पावसाने सुखावला आहे. खरीप पूर्व कामांना यामुळे वेग येणार आहे.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे गुणवंतांचा गौरव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा च्या स्पर्धा परीक्षा विभागाची अभ्यासक प्राजक्ता प्रमोद कांबळे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे वनविभाग कोल्हापूर येथे ‘क्लार्क’ पदावर व प्रसाद शंकर तिप्पट याची सरळसेवा परीक्षेतून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात जिल्हा परिषद सांगली येथे ‘आरोग्य सेवक’ पदावर निवड झालेबद्दल वाचनालयातर्फे शाल, सन्मानचिन्ह व ग्रंथभेट देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदुस्तान पेट्रोलियम चे निवृत्त अधिकारी जयवंतराव पन्हाळकर उपस्थित होते.
श्री. जयवंतराव पन्हाळकर व प्रमुख कांबळे यांनी ग्रंथालयास भरीव देणगी दिल्याबद्दल त्यांना ग्रंथालयाचे आश्रयदाते सभासदत्व देवून सन्मानित करण्यात आले.
वाचनालयाचे अध्यक्ष श्री. वामन सामंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक विजय राजोपाध्ये यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला सहकार्यवाह रवींद्र हुक्केरी, संभाजी इंजल, बंडोपंत चव्हाण, विनायक अमणगी, प्रमोद कांबळे, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, निखिल कळेकर, पाटील व विध्यार्थी उपस्थित होते.

कोवाडे – दाभेवाडी प्रीमिअर लीग स्पर्धा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोवाडे गावामध्ये आयोजित कोवाडे – दाभेवाडी प्रीमिअर लीग ( ओव्हरआर्म क्रिकेट ) २०२५ पर्व दुसरे स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या .
लीगमध्ये क्षत्रिय योद्धा, टीम छावा वॉरीयर्स, मावळा वॉरीयर्स, आदर्श योद्धा या टीम विजयी झाल्या.
संपूर्ण लीग मध्ये मालिकावीर म्हणून जयवंत साठे यांना घोषित केले तर उत्कृष्ट फलंदाज शिवराज देसाई, उत्कृष्ट गोलंदाज दत्ता पोवार यांना घोषित केले.या सर्व लीगचे आयोजन किरण चिमणे, विनोद गुंजकर, अक्षय साठे, सुरेश लिंगणूरे,अभि देवेकर,योगेश पोवार, सुभाष पोवार आणि इतर सहकारी यांनी केले .


