
पती व सासऱ्यास मारहाण
सुनेसह तिघींविरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पती रवींद्र अशोक कुंभार व सासरे अशोक गोविंद कुंभार यांना दगडाने मारून त्यांचा चावा घेतल्याप्रकरणी सुलगाव ता. आजरा येथील सीमा रवींद्र कुंभार यांच्यासह अर्चना कमलेश कुंभार, संजीवनी संभाजी कुंभार (सर्व रा.सुलगाव) यांच्या विरोधात सासरे अशोक गोविंद कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी…
सीमा कुंभार हिचे एका तरुणाशी प्रेम संबंध असल्याचे सासरे अशोक कुंभार व पती रवींद्र कुंभार यांना समजल्याने ते या संबंधातील विचारणा करण्यासाठी संजीवनी कुंभार यांच्याकडे गेले होते. तिथे शाब्दिक वादावादी होऊन त्यानंतर अर्चना व संजीवनी कुंभार यांनी त्यांना गळपट धरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान सीमा कुंभार हिने माझ्या बहिणीशी वाद घालतोस काय ? असे म्हणत अशोक कुंभार यांच्या डोक्यात दगड घातला व त्यांचा चावा घेऊन जखमी केले.
अशोक कुंभार यांच्या फिर्यादीवरून तिघींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस नाईक पांडुरंग येलकर पुढील तपास करीत आहेत.
किरकोळ कारणावरून मारामारी…
एका विरोधात गुन्हा नोंद
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
किणे ता. आजरा येथे घराचा दरवाजा जोरात ढकलल्याच्या कारणावरून झालेल्या मारामारीत मारुती कृष्णा कांबळे जखमी झाले असून मारुती कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदा विष्णू कांबळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नात्याने चुलत भाऊ असणाऱ्या आनंदा व मारुती यांच्यात घराच्या हद्दीचा वाद आहे. दरम्यान मारुती हे घरी असताना आनंदा याने त्यांचा दरवाजा जोरात ढकलला. याचा जाब मारुती यांनी आनंदा यांना विचारला असता दरवाजा माझ्या हद्दीत आहे तो काढून घे असे त्यांना सांगितले व मारुती यांना मारहाण करून त्यांच्या हाताचा चावा घेतला. यामध्ये मारुती हे जखमी झाले.
पुढील तपास पोलीस हवालदार अंबुलकर करीत आहेत.

पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्यांना ताकद दिली : सुधीर कुंभार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंतप्रधान मोदींनी आपल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत राम मंदिर उभारणी, ३७० कलम हटवणे, ८० कोटी जनतेला पाच वर्षे मोफत रेशन वाटप, शेतकऱ्यांना पी.एम. किसान सन्मान योजनेचा निधी, आयुष्यमान भारत ही आरोग्याची योजना अशा विविध उपक्रमातून सर्वसामान्यांचे जीवनमान सुखकर करण्याचा प्रयत्न केला आहे. महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना भरघोस मते देऊन सर्वसामान्यांना ताकद देणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना पुन्हा एक वेळ संधी देऊया असे आवाहन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी केले तालुक्याच्या पश्चिम भागाच्या प्रचार दौऱ्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रा. अर्जुन आंबिटकर म्हणाले, संपूर्ण देशाचे भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी राहावे.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, शिवसेना तालुकाध्यक्ष संजय पाटील, परशुराम बामणे, अनिरुद्ध केसरकर, नाथा देसाई ,प्रकाश पाटील, धनंजय पाटील,विजय थोरवत, संतोष भाटले, अश्विन डोंगरे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आजऱ्यात संभाजी राजेंचा घर टू घर प्रचार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरांमध्ये कोल्हापूर लोकसभेचे इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ संभाजी राजे छत्रपती व आघाडीतील प्रमुख मंडळींनी घर प्रचार मोहीम राबवली. शहरातील प्रमुख संस्था, त्यांचे पदाधिकारी ख्रिश्चन, मुस्लिम बांधव, महिला वर्ग यांच्याशी संवाद साधला. या मोहिमेला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी संभाजीराजे यांच्यासोबत अभिषेक शिंपी, नौशाद बुड्ढेखान , संजयभाऊ सावंत, मंजूर मुजावर, ओंकार माद्याळकर, समीर चांद, दयानंद भोपळे, महेश पाटील, एस.पी. कांबळे, विक्रम पटेकर, अशोक पोवार यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते होते.

संजयभाऊंनी केले राजेंचे स्वागत…
जुन्या आठवणींना उजाळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
२००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेचे तत्कालीन उमेदवार संभाजी राजे छत्रपती यांची प्रचार धुरा समर्थपणे सांभाळलेल्या संजय भाऊ सावंत यांच्या घरी संभाजी राजे छत्रपती यांनी भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सावंत कुटुंबीयांनी गेल्यावेळी प्रामाणिकपणे आपणाला साथ दिली. पक्ष, गटतट बाजूला ठेवून यावेळीही त्यांच्याकडून आपणाला मदत होत असल्याचे यावेळी यांनी सांगितले.
नगरसेविकास संजीवनी सावंत यांनी संभाजीराजेंचे औक्षण करून स्वागत केले.
यावेळी नौशाद बुड्ढेखान, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्रसिंह सावंत, रवी तळेवाडीकर, प्रदीप पाचवडेकर, वैभव सावंत यांच्यासह भगवा रक्षक तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.



