

करवाढीविरोधात आजरेकर एकवटले नगरपंचायतीवर प्रचंड मोर्चा… बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरा:प्रतिनिधी
वाढीव कर आकारणीच्या पार्श्वभूमीवर आज वाढीव कर आकारणी विरोधी कृती समितीने केलेल्या आजरा बंद व मोर्चाच्या आवाहनास शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत व एकीचे दर्शन घडवत वाढीव करवाढीला विरोध दर्शवला. करवाढ रद्द न झाल्यास प्रसंगी येणाऱ्या नगरपंचायत निवडणूक किंवा बहिष्कार घालण्याचा इशाराही यावेळी मोर्चाद्वारे देण्यात आला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समिती कार्यालयासमोर शहरवासीय मोठ्या संख्येने सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एकत्र आले. तिथून वाढीव कर वाढविरोधात व नगरपंचायत प्रशासनाच्या धिक्काराच्या घोषणा देत मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
यावेळी समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, प्रा. डॉ. सुधीर मुंज, सुधीर कुंभार, प्रभाकर कोरवी यांची भाषणे झाली. नगरपंचायतीने केलेली ही करवाढ अन्यायकारक व जाचक स्वरूपाची आहे. करवाढ करताना शहरवासीयांना विश्वासात घेतलेले नाही अथवा त्यांच्या हरकतीही घेतल्या गेल्या नाहीत.
सुमारे सहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले परंतु त्यानंतर मात्र नगरपंचायतीला ना अधिकारी मिळाला, ना निधी मिळाला, ना नागरी सुविधा मिळाल्या. सध्या तर नगरपंचायतीमध्ये मनमानी पद्धतीने अधिकारी वर्गाचा कारभार सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी नगरपंचायतीच्या करवाढ प्रश्नामध्ये स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असून याबाबत चर्चा झाली असल्याचीही यावेळी वक्त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही परिस्थितीत जादा कर शहरवासीय भरणार नाहीत असा इशाराही नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आला. यावेळी नगरपंचायतीचे अधिकारी राकेश चौगुले व निहाल नायकवडी यांना मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी मोर्चामध्ये जिल्हा बँकेचे संचालक सुथिर देसाई,डॉ. अनिल देशपांडे, संजयभाऊ सावंत, बशीर खेडेकर, अनिकेत चराटी, विकास फळणीकर,संदीप पारळे, मानसिंग देसाई, अरुण देसाई, महेश दळवी, तालुका संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई, हरिबा कांबळे, मंजूर मुजावर, बापू टोपले, दिवाकर नलवडे, दत्तात्रय मोहिते, शंकरराव शिंदे, बंडोपंत चव्हाण, ओंकार माद्याळकर, मारुती मोरे, उमेश पारपोलकर, डॉ. दीपक सातोसकर, सुनील शिंदे, अभिषेक रोडगी, सुधिर जाधव, निसार दरवाजकर, सुरेश कुंभार, जयसिंग देसाई, परेश पोतदार, अश्विन डोंगरे, सौ.गिता पोतदार, सौ. सरिता सावंत, रशीद पठाण, आरिफ खेडेकर, राजू विभुते, नौशाद बुड्डेखान,रवी तळेवाडीकर, अमानुल्ला आगलावे, सुधीर कुंभार, गुरु सावंत, पांडुरंग सावरकर,गुरु गोवेकर,रवी हुक्केरी, गौरव देशपांडे, शाम भुइंबर, सुरेश डांग, विजयकुमार पाटील, डॉ.प्रविण निंबाळकर,समीर मोरजकर,विजय थोरवत, जितेंद्र शेलार, अमोल जाधव,उदय पाटील, अभिजित लाड, नगरसेवक अभिषेक शिंपी, अनिरुद्ध केसरकर, धनाजी पारपोलकर, अभिजीत रांगणेकर, सिकंदर दरवाजकर, विलास नाईक, आनंदा कुंभार, सौ शुभदा जोशी, सौ.अस्मिता जाधव, संभाजी इंजल, ईश्वर गिलबिले, आर.टी. जाधव, यासिराबी लमतुरे, सुमैय्या खेडेकर,यास्मिन बुडृडेखान, रेश्मा सोनेखान यांच्यासह मान्यवर व शहरवासीय मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नेटके नियोजन
गेले दोन आठवडे या मोर्चाचे नियोजन सुरू होते. मोर्चाचे नेटके नियोजन केले असल्याचे यावेळी स्पष्ट होत होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व कोणतीही रटाळ भाषणबाजी न करता मोर्चा पार पडला.



