mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 

करवाढी विरोधात आजरेकर आक्रमक…
प्रसंगी आजरा बंदचा इशारा…


                     आजरा : प्रतिनिधी

   ‌   आजरा नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर प्रथमच करण्यात आलेल्या करवाढीमुळे आजरा शहरवासीयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गुरुवारी शहरवासीय एकत्र आले व त्यांनी या करवाढीचा निषेध नोंदवत करवाढ तातडीने मागे न घेतल्यास बेमुदत आजरा बंदचा इशारा दिला आहे. यामुळे सध्या करण्यात आलेल्या कर वाढीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

     सुधारित रचनेप्रमाणे कर वाढ केल्याच्या नोटिसा आजरा शहरवासीयांना नगरपंचायतीकडून देण्यात येत आहेत. ही करवाढ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शहरवासीय चांगलेच आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करवाढी विरोधात सह्यांची मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून नगरपंचायतीच्या दिशेने कार्यकर्ते रवाना झाले. यावेळी नगरपंचायत व करवाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

       नगरपंचायत सभागृहात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, कर विभागाचे अधिकारी व शहरवासीय यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी बोलताना परशराम बामणे म्हणाले, झालेली करवाढ ही अन्यायकारक व सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. दुप्पट, तिप्पट अशी ही करवाढ असून सरसकट स्वरूपात करवाढ करण्यात आल्याने सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. करवाढ तातडीने मागे घ्यावी अन्यथा आजरा बेमुदत बंद करण्यात येईल असा इशाराही त्यांनी शहरवासीयांच्या वतीने दिला. करवाढीचा विषय नगरपंचायत मासिक सभेत आल्यानंतर उपस्थित असणारे नगरसेवक, या ठरावाला संमती देणारे सुचक, अनुमोदक यांची माहिती मिळावी अशी मागणीही त्यांनी केली.

         सुनील शिंदे म्हणाले, करवाढ इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की घरांचे मालक की भाडेकरू ? असा प्रश्न निर्माण होणार आहे .नाथा देसाई,अमानुल्ला आगलावे, धनाजी पारपोलकर, सुनील शिंदे प्रा.विजय बांदेकर, आदींनी यावेळी झालेली करवाढ अन्याय कारक असून या करवाढीला आपला विरोध आहे असे स्पष्ट केले.

        बैठकीवेळी कर निरीक्षक निहाल नायकवडी यांनी सध्या करण्यात आलेली कर आकारणी कोणत्या निकषावर व कोणत्या शासन आदेशाच्या आधारे केली आहे याची सविस्तर माहिती दिली.

        काहीही झाले तरी आम्हाला ही करवाढ मान्य नाही असे यावेळी शहरवासीयांनी प्रशासनाला ठासून सांगितले.

        यावेळी संजय भाऊ सावंत, पांडुरंग सावरकर, बापू टोपले, डॉ. प्रवीण निंबाळकर, डॉ. सागर पारपोलकर,विलास भादवणकर, अश्विन डोंगरे,  अनिल पाटील, अशोक गाईंगडे, अतुल पाटील,सुरज जाधव, राजू विभुते,अभी गोवेकर, महेश दळवी, अमित खेडेकर, कृष्णा यादव, रवी पाटील, संदीप पारळे,गुरु गोवेकर, ओंकार माद्याळकर, सचिन नलवडे, गौरव देशपांडे संजय हरेर, गुरु सावंत, विजय बांदेकर, सुरेश देसाई, प्रकाश पाटील, दयानंद जाधव,दत्तात्रय मोहिते यांच्यासह शहरवासीय उपस्थित होते.

शाश्वत सुविधा मिळेपर्यंत करवाढ नको…अभिषेक शिंपी

      नगरपंचायतीच्या सभेसमोर जेव्हा जेव्हा करवाढीचा विषय चर्चेला आला, त्या – त्यावेळी शास्वत सुविधा जोपर्यंत दिल्या जात नाही तोपर्यंत कर वाढ करू नये असे नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.सुविधा नाही तर कर कशाला ? असा सवालही प्रशासनाला उपस्थित केला गेला आहे. विविध प्रकारच्या नगरपंचायतींची कर पडताळणी करून केलेली करवाढ योग्य आहे का ? हे देखील पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे नगरसेवकांनी कांहीच केले नाही असे म्हणणे चुकीचे आहे. या करवाढीला आपला विरोध राहणारच आहे असे नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी स्पष्ट केले.



संकेश्वर -बांदा

महामार्ग बाधितांची बैठक

                   आजरा: प्रतिनिधी

         पुणे येथील राज्य पातळीवरील संघटनेच्या झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या नियोजन पार्श्वभूमीवर खेडे(या.आजरा) येथे महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक पार पडली.

          हिवाळी अधिवेशनावेळी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन/अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनाला जाण्याबरोबरच दिनांक १३ डिसेंबर रोजी संकेश्वर बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सामील होण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

       बैठकीला शिवाजी गुरव, अनिल शिंदे, दिगंबर मोरबाळे, गणपती येसणे शिवाजी इंगळे यांच्यासह शेतकरी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.



माघार प्रक्रियेकडे अद्याप इच्छुकांची पाठच…


                      आजरा:प्रतिनिधी

           आजरा साखर कारखाना निवडणुकी करिता मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. एकीकडे कारखाना निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांनी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू असताना या प्रक्रियेकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याने निवडणूक खरोखरच बिनविरोध होणार का ? हा प्रश्न आता पुन्हा एक वेळ उपस्थित होत आहे.

       उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया एक डिसेंबर पर्यंत चालणार आहे. असे असताना एकाही उमेदवाराने अद्याप माघार घेतलेली नाही. कारखान्याची सद्यस्थिती पाहता कारखान्यावर निवडणुकीचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडू नये म्हणून निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडावी अशी अपेक्षा सभासद वर्ग बाळगून आहे.

        परंतु कारखान्याच्या संचालक पदासाठी इच्छुकांची संख्या पाहता निवडणूक बिनविरोध होईल असे चित्र सध्या तरी दिसत नाही.जिल्हा पातळीवरील नेत्यांशी स्थानिक प्रमुख मंडळी संपर्क साधून बिनविरोध च्या दृष्टीने हालचाल करत आहेत. परंतु याला कितपत यश येणार हे मात्र अस्पष्ट आहे.

एखाद्याची उमेदवारीही ठरू शकते अडचणीची…

     निवडणूक बिनविरोध करणे म्हणजे सत्ताधारी व विरोधी मंडळींनी आपापसात जागा वाटून घेऊन संचालक मंडळ तयार करणे असा गैरसमज सध्या दिसत आहे. खरोखरच निवडणूक बिनविरोध पार पाडावयाची असल्यास सभासदांना मतदान प्रक्रियेला सामोरे जावे लागू नये. मात्र उत्पादक गट वगळता अन्य गटातून एखाद्या उमेदवाराने आपली उमेदवारी कायम ठेवली तर संपूर्ण मतदान प्रक्रिया राबवावीच लागणार आहे. त्यामुळे नेते मंडळींना  आपापसातील संघर्ष थांबवण्याबरोबरच उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या इतर इच्छुकांचीही माघारीसाठी मनधरणी करावी लागणार आहे.


संबंधित पोस्ट

पाऊस थांबता थांबेना… आजऱ्यातील परिस्थिती …व्यंकटराव”च्या शिक्षिका भारती कांबळे यांना आंतरराज्य पुरस्कार…आजरा महाविद्यालयात झिम्मा फुगडी उत्साहात..वर्षभरात 500 कोटीच्या अँटिबायोटिक औषधांची खरेदी ! कोणताही विचार न करता भारतीय करत आहेत औषधांचा उपयोग

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!