



अशोकअण्णा म्हणजे झटून काम करणारा बंडखोर कार्यकर्ता : आ. प्रकाश आबिटकर

आजरा : प्रतिनिधी
अण्णा-भाऊंच्या पश्चात सहकार, शिक्षण, सांस्कृतीक व सामाजिक क्षेत्रात अशोकअण्णा चराटी यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. अण्णाभाऊंनी दिलेला वसा पुढे चालवण्याचे काम अशोकअण्णा व डॉ. अनिल देशपांडे यांनी समर्थपणे सुरू ठेवले आहे. झटून काम करणारा प्रसंगी प्रेम तर प्रसंगी रागानेही विकास कामांचा पाठपुरावा करणारा बंडखोर कार्यकर्ता म्हणजे अशोकअण्णा चराटी आहे, असे प्रतिपादन आम. प्रकाश आबिटकर यांनी केले. अण्णा-भाऊ संस्था समूह प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील होते.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक जनता शिक्षण संस्थेचे संचालक विजयकुमार पाटील यांनी केले. यावेळी माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, आमदार प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते अशोकअण्णा चराटी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

भाजपाचे ज्येष्ठ नेते समरजीतसिंह घाटगे म्हणाले, अण्णाभाऊ संस्था समूहाची धुरा अशोकअण्णांनी समर्थपणे पेलली आहे. अलीकडे सहकारी संस्था चालवणे हे फारसे सोपे राहिलेले नाही. एखादी संस्था चालवत असताना अनेकांना रोजी रोटी उपलब्ध होत असते. या संस्था समूहाने अनेकांचे संसार चालवले आहेत. सततच्या कामाच्या माध्यमातून अशोकअण्णा यांना चिरतारुण्य लाभले आहे असेही त्यांनी सांगितले.
अशोकअण्णा म्हणाले, कारखान्यातील कर्जवाढीसह अनेक गोष्टींचे खापर आपल्यावर फोडले जाते. काही विघ्न संतोषी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आपणाला अध्यक्ष पदाच्या खुर्चीपासून बाजूला केले गेले. पण कारखान्यात येईल त्यासाठी आपण शेवटपर्यंत प्रयत्नशील राहिलो. आजही साखर कारखान्यावर निवडणूक खर्चाचा बोजा पडू नये म्हणून आपण जिल्ह्यातील अनेक नेते मंडळींशी संवाद साधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात भरमुअण्णा म्हणाले, एखाद्याला मदत करायची असा निर्धार केला की अशोकअण्णा कधीच पाठीमागे राहिलेला नाही. मला आमदार व मंत्री बनवण्यामध्ये अशोक अण्णाचा मोठा वाटा आहे हे कदापिही नाकारता येणार नाही. यापुढेही त्यांनी आपले काम जोमाने सुरू ठेवावे अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम प्रसंगी जनार्दन टोपले, जयवंतराव शिंपी, संग्रामसिंह कुपेकर, राहुल देसाई यांची शुभेच्छापर भाषणे झाली.
यावेळी डॉ अनिल देशपांडे, आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर,आजरा बँकेचे उपाध्यक्ष सुनील मगदूम, जनार्दन टोपले, अंशूमाला पाटील,सुरेश डांग, दिगंबर देसाई,मारुती मोरे, किरणं कांबळे,अभिषेक शिंपी,प्रकाश देसाई,राजेंद्रसिंह सावंत, प्रकाश बेलवाडे, मुकुंदराव तानवडे,विजय थोरवत,दत्तात्रय पाटील, सी.आर. देसाई,सचिन पावले, के. व्ही.येसणे, जी. एम.पाटील, समिर पारधे,सौ.गीता पोतदार,श्रीमती शैला टोपले,शंकर टोपले,सौ.प्रणिता केसरकर,दशरथ अमृते,राजू पोतनीस,जनार्दन नेऊंगरे, अतिशकुमार देसाई यांच्यासह चराटी प्रेमी कार्यकर्ते व अण्णा-भाऊ संस्था समुहातील प्रमुख मंडळी उपस्थित होती.
विलास नाईक यांनी आभार मानले.
पुढच्या वाढदिवसाला आमदार म्हणून या…
यावेळी बोलताना अशोकअण्णा चराटी यांनी समरजीत घाटगे यांना उद्देशून यावेळी आपण माझ्यावरील प्रेमापोटी एका संस्था समूहाचे प्रमुख म्हणून वाढदिवसाला आला आहात परंतु पुढच्या वेळी आमदार म्हणूनच तुम्ही वाढदिवसाला उपस्थित रहा अशी सदिच्छा व्यक्त केली.




आजऱ्यात व्यापारी वर्गाचा पाडवा गोड झाला…
पाडवा उत्साहात

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधून तालुकावासीयांनी सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. याचबरोबर दुचाकींचीही मागणी वाढली यामुळे एकंदर व्यापारी वर्गाचा पाडवा निश्चितच गोड झाला.
पाडव्यानिमित्त येथील ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिर परिसरास भाविकांनी मोठ्या प्रमाणावर भेट दिली. पाडव्यानिमित्त आयोजित आरती मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
बाजारपेठेत गृहोपयोगी वस्तू खरेदी व सोन्या-चांदीचे दागिने खरेदीसाठी प्राधान्य दिले गेल्याने बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली.




खोराटवाडी चोरी प्रकरणी पोलीस पथके कर्नाटकात

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
ऐन लक्ष्मीपूजनादिवशी खोराटवाडी येथे झालेल्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आजरा पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून कर्नाटकातील संशयितांची माहिती जमा करण्यात येत आहे.
सोन्या-चांदीच्या दागिन्यासह तब्बल ९० हजार रुपयांची रोकड असा पावणेचार लाखांचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून चोरटे कर्नाटकातील असल्याचे स्पष्ट होत असल्याने पोलिसांनी आपला तपास कर्नाटक राज्याच्या दिशेने वळवला आहे.
लवकरच चोरट्यांना जेरबंद करण्यात येईल असे स्थानिक सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी सांगितले.





बहिरेवाडी येथे शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांची पुण्यतिथी उत्साहात

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
बहिरेवाडी ता. आजरा येथील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांची तिसरी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली आजी – माजी सैनिंकाच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले .
यावेळी घेण्यात आलेल्या १६०० मी धावणे स्पर्धेत गडहिंग्लजच्या ओंकार पवार यांने प्रथम , माद्याळ ता कागल येथील केंदारलिंग मेडिकल यांने द्वितीय तर गडहिंग्लजच्या ऋतिक वर्माने तृतीय क्रंमाक पटकावला विजेत्यांना वीरपिता रामचंद्र जोंधळे यांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले .
भैरवनाथ कला , क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबाराला चांगला प्रतिसाद मिळाला कोल्हापूरच्या वैभवलक्ष्मी ब्लड बँकेत रक्त संकलन करण्यात आले .
कार्यक्रमास वीरपिता रामचंद्र जोंधळे , वीरमाता कविता जोंधळे. बहिण कल्याणी जोंधळे. माजी सैनिक , रामचंद्र कापसे , जनार्दन कापसे , सुनिल चव्हाण , मारुती चौगुले , सतिश तेली , ग्रामपंचायत सदस्य सुरेश खोत , सुहास चौगुले , तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय शेणगावे आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





श्री विश्वनाथ दूध संस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहात

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
श्री विश्वनाथ दूध संस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती अंजनाताई रेडेकर संचालीका, गोकुळ दूध संघ या होत्या.
यावेळी संस्थापक संचालक मंडळ व विद्यमान संचालक मंडळ यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला व सर्व सभासदना भेट वस्तू पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन तानाजी मिसाळ यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्षा अंजनाताई रेडेकर यांनी उत्पादक सभासद, ग्रामस्थ यांचे असणारी एकी तुटू देऊ नका व सुवर्ण महोत्सव वर्षाकडे यशस्वीरित्या एकीने वाटचाल करा. तसेच दुग्ध उत्पादनाकडे युवकांनी व्यवसाय म्हणून पहावे व मोठ्या प्रमाणात युवकांनी यात भाग घ्यावा असे आवाहन केले.आभार जानबा मिसाळ यांनी मानले.
यावेळी ए. ए. पाटील (लेखापरीक्षक), विजय सरदेसाई (माजी सरपंच लाटगाव),
भालचंद्र देसाई,श्री देवेकर यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.





निधन वार्ता…
बंडू बुगडे

शिरसंगी ( ता.आजरा) येथील रहिवासी बंडू गोपाळ बुडके ( वय वर्ष ७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे, सुना,, नातवंडे असा परिवार आहे.
तानाजी शिमणे

भादवण ( ता.आजरा) येथील कोतवाल तानाजी शिमणे (वय ४५) यांचे आल्पश: आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.






