mrityunjaymahanews
अन्य

चितळे येथे गोवा बनावटीचा ३५ हजारांचा दारुसाठा जप्त

चितळे येथे गोवा बनावटीचा ३५ हजारांचा दारुसाठा जप्त

आजरा पोलीस स्टेशन हद्दीतील चितळे गावी सुनिल सुरेश घुरे (वय ३७ वर्षे, रा  चितळे) हा गोवा बनावटीची दारू विकत असलेबाबत गोपनीय बातमीदार मार्फत मिळाल्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता एकूण ३०५०४/- रुपये किमतीचा गोवा बनावटीचा दारूचा मुदेमाल मिळून आला .

पोलिसांनी मुद्देमालासह सुनील घुरे याला ताब्यात घेतले आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस पुढील  कारवाई करीत आहेत.

आजरा साखर कारखान्याचे हंगाम २०२३-२४ करिता तोडणी वाहतूकीचे करारास प्रारंभ


आजरा साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२३ /२४ सुरु करण्यासाठी सर्व प्रथम आवश्यक असणारे तोडणी वाहतूक कंत्राटदारांचे करार करणेस आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात केली.

कारखाना पुर्ण क्षमतेने सुरू करावयाचे झाल्यास कारखान्यास सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणा भरणे गरजेचे आहे. त्यामुळे कारखान्याने मागील हंगामातील तोडणी वाहतूक यंत्रणेचा विचार करून येत्या हंगामात  ४ लाख ५० हजार मे. टन ऊस गळीताचे उद्दिष्ट ठेवून सदर ऊस गाळपासाठी आवश्यक तोडणी वाहतूक यंत्रणा भरणे जरूरी असलेने हिंदू नववर्ष व गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करणेस आज सुरुवात केली आहे कारखान्याचे चेअरमन श्री सुनील शिंत्रे यांनी याप्रसंगी सांगितले.

कारखान्याचे पंचवार्षिक कार्यक्रम सुरू झाला असला तरी कारखान्याचे कामकाज व्यवस्थित सुरु ठेवून पुढील काळात कारखाना लवकर सुरू करणेसाठी नियोजन करत आहोत कारखाना सध्या कमी दिवसांत जास्त गाळप करणे आता जरुरीचे झाले आहे तसेच कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना देखील आपला ऊस लवकरात लवकर जावा अशी अपेक्षा असते त्यामुळे सक्षम यंत्रणा उभी करणे हे अत्यंत जरुरीचे आहे, असेही याप्रसंगी सांगितले यावेळी कारखान्याचे मा.संचालक श्री. मुकुंदराव देसाई,श्री.एम.के.देसाई ,श्री. अनिल फडके, प्रभारी शेती अधिकारी श्री विठ्ठल पाटील व कारखान्याचे शेती विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

कंत्राटी भरतीचा आजऱ्यात जाहीर निषेध

 

राज्य  शासनाच्या कामगार विभागाने १४ मार्च २०२३ रोजी कंत्राटीकरणाचा जीआर काढून इथल्या नवयुवकांचे भविष्य संपवण्याचे काम केलेल आहे त्या निषेधार्थ आजरा तालुक्यातील सर्व डीएड ,बीएड धारक व अभियोग्यता धारक यांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला व तहसीलदारांना हा तुघलकी जीआर रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

सदर जीआर मध्ये विविध शासनाच्या पदांकरिता कंत्राटीकरण आणण्याचे काम या राज्य शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने दिसून येत रोजगार निर्मिती ही शासनाची जबाबदारी असताना तसेच शासनाकडे रोजगार निर्मिती करण्यासाठी कामगार भरतीसाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रशासकीय यंत्रणा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग सारखी स्वायत्त यंत्रणा देखील मदतीला असताना वेगवेगळ्या नऊ कंत्राटी कंपन्या या भरतीसाठी नेमणे म्हणजे आपल्या जबाबदारीतून पळ काढणे होय. सर्व शासकीय पदांचं कंत्राटीकरण झालं तर भविष्यातील पिढीला हा मोठा धोका आहे. या जीआर मध्ये सहाय्यक शिक्षक व शिक्षण क्षेत्राची संबंधित अनेक पदांचे सुद्धा कंत्राटीकरण करण्याचा घाट शासन घालत आहे हे खऱ्या अर्थाने भविष्यातील राज्याच्या वाटचालीसाठी धोकादायक आहे. शिक्षणासारखं महत्त्वाचं क्षेत्र कंत्राटी लोकांच्या ताब्यात देणे म्हणजे शिक्षण व्यवस्था समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करणं होय असं मत जमलेल्या सर्व अभियोग्यता धारकांनी व्यक्त केलं. तसेच हा जीआर रद्द व्हावा यासाठी निवेदनाद्वारे सरकारला विनंती केली.

यावेळी तालुक्यातील अनेक उच्चशिक्षित तसेच अभियोग्यताधारक उपस्थित होते .उपस्थितांना अनिल कांबळे,सुरज पावले ,रूपाली जावळे, कुंडलिक नावलकर यांनी मार्गदर्शन केले.तर आभार संतोष कालेकर यांनी मानले.

🟢 ३१ मार्चपर्यंत बँका सुरू राहणार, रविवारची सुट्टीही रद्द! आरबीआयचे निर्देश

♦️चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ समाप्त होण्यासाठी आता अवघा आठवडा राहिला आहे. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होईल. मार्च महिन्यात संपूर्ण आर्थिक वर्षातील व्यवहारांचा लेखाजोखा तपासला जातो. त्यानंतर अनेक व्यवहारांचा वार्षिक ताळेबंद पूर्ण केला जातो. त्यामुळे मार्च महिना हा बँक कर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक कामाचा महिना मानला जातो. या पार्श्वभूमीवर ३१ मार्च पर्यंत सर्व बँकांचे व्यवहार दररोज सुरू ठेवण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

अर्थात या दिवसांमध्ये ग्राहकांच्या व्यवहारांसाठी बँक उपलब्ध असणार नाही. फक्त चेक जमा करणे आणि ऑनलाईन बँकिंग या सुविधा उपलब्ध असतील. रविवारीही बँकांचे व्यवहार सुरू ठेवण्यात येणार आहेत. सर्व बँकांना एका परिपत्रकाद्वारे आरबीआयने तसे आदेश दिले आहेत. या काळात सरकारी व्यवहारांसाठी सगळे दिवस बँका सुरू राहतील.

एनईएफटी आणि आरटीजीएसच्या माध्यमातून ३१ मार्च २०२३ च्या मध्यरात्री १२ पर्यंत हे व्यवहार सुरू राहणार आहेत. त्यानंतर १ एप्रिल आणि २ एप्रिल रोजी बँकांमध्ये कामकाज बंद राहील, असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

आजरा अर्बंनने उभारली ठेवींची गुढी

गुढी पाडव्यानिमित्त ७ कोटी १८ लाखाच्या ठेवी जमा

दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तब्बल ७ कोटी १८ लाख रुपयांच्या ठेवी एका दिवसात जमा झाल्या आहेत. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत.

सध्या बँकेकडे ७७७ कोटी रूपयाच्या ठेवी व ५०१ कोटी रुपये कर्जे आहेत. त्याबाबत बँकेचे चेअरमन डॉ.अनिल देशपांडे व संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले.

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Big Breaking….

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!