mrityunjaymahanews
अन्य

अभियंता अक्षयचा आकस्मिक मृत्यू

अभियंता अक्षयचा आकस्मिक मृत्यू

आजरा शहर हळहळले

लिंगायत गल्ली आजरा येथील २७ वर्षीय स्थापत्य अभियंता अक्षय वीराप्पा मतवाडकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले .त्यांच्या निधनाने मित्रपरिवारासह आजरा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मुळगाव एरंडोळ असणारा अक्षय हा लिंगायत गल्ली आजरा येथे राहावयास होता .आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याची प्रकृती अचानक बिघडून त्याला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला.उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. अक्षय हा जलमिशन व पाणीपुरवठा विभागाचे सेवानिवृत्त शाखा अभियंता वीराप्पा मतवाडकर यांचा चिरंजीव असून तो पंचायत समिती आजरा येथे कंत्राटी तत्त्वावर अभियंता म्हणून कामाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे. हसतमुख अक्षयच्या आकस्मिक जाण्याने आजरा शहरवासीयांसह त्याच्या मित्र परिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अशोकअण्णा चराटी यांच्या रहात्या घरास आग.. प्रापंचिक साहित्याचे नुकसान

mrityunjay mahanews

पोळगाव येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण…ओढ्याच्या पाण्यात पडून किटवडे येथील एकाचा मृत्यू…जनता बँकेने नवउद्योजक निर्माण केले : खासदार संजय मंडलिक…

mrityunjay mahanews

यात्रेच्या पहिल्या दिवशीच पाटील कुटुंबियावर कोसळला दुःखाचा डोंगर…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

डॉ.अशोक फर्नांडिस यांचे निधन

mrityunjay mahanews
error: Content is protected !!