mrityunjaymahanews
अन्य

घनकचरा संकलन ठेकेदार व अधिकारी यांची मिलीभगत

घनकचरा संकलन ठेकेदार व अधिकारी यांची मिलीभगत नगरपंचायतीला लाखोंचा फटका

मासिक सभेत नगरसेवकांचा आरोप

 

आजरा शहरातील घनकचरा संकलन ठेका घेणाऱ्या कंत्राटदाराने व अधिकाऱ्यांनी संगनमत करून नगरपंचायतीच्या गाड्या व इतर सुविधेपोटी ठेकेदाराकडून येणारे प्रति महिना भाडे नव्वद हजारावरून ३७ हजार इतके केले आहे.यात कोणालाही विश्वासात घेतलेले नाही. यामुळे नगरपंचायतीला लाखो रुपयांचा फटका बसत आहे असा आरोप करत नगरसेवक अभिषेक शिंपी, संभाजी पाटील यांनी करत पूर्वीप्रमाणेच नव्वद हजार रुपये प्रमाणे भाडे न दिल्यास सदर ठेकेदाराचा ठेका रद्द करावा अशी मागणी केली त्याचबरोबर प्रसंगी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलनाचा इशाराही दिला आहे. आजच्या मासिक सभेत यावर जोरदार चर्चा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी होत्या.

सभेच्या सुरुवातीस  संजय यादव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी नगरपंचायतीच्या एकंदर कारभाराबाबत जोरदार चर्चा झाली. नगरपंचायतीचे अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचारी यांच्यात कोणताच ताळमेळ नसल्याचेही या सभेमध्ये स्पष्ट झाले.

मार्च महिन्यामध्ये सदर भाडे कपात करण्यात आले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.कोणाला विचारून असले प्रकार करत आहात? असा सवालही उपस्थित केला. शहरात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असल्याचा आरोप नगरसेविका सुमय्या खेडेकर व यासीराबी लमतुरे यांनी केला.ना धड पाणी वेळेवर नाही  ना धड यापूर्वी केलेल्या सूचना अमलात आणल्या जातात  असा आरोपही यावेळी केला. प्रभारी मुख्याधिकारी डी. डी. कोळी यांनी पाणीपुरवठा वेळापत्रकात सुसूत्रता आणण्याचा दृष्टीने प्रयत्न सुरू असून प्रभागवार पाणीपुरवठा व कचरा व्यवस्थापनाचे नियोजन दर्शवणारे फलक लावण्यात येतील असे सांगितले.

रस्त्याशेजारी बंद अवस्थेत वहातूकीस अडथळा असणारी वहाने तातडीने बाजूला करावीत व रस्ते वाहतुकीकरता खुले करावेत अशा सूचनाही करण्यात आल्या.

आजरा नगरपंचायतीचा निवडणुकीनंतरचा साडेचार वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्यापही साडेचार वर्षातील अनेक कामांची बिले अदा करण्यात आलेली नाहीत. तातडीने सदर बिले अदा करण्याच्या दृष्टीने हालचाली व्हाव्यात अशा सूचना नगरसेवक किरण कांबळे यांनी केल्या.

बैठकीस नगरसेविका सौ. सीमा पोवार,रेश्मा सोनेखान, उपनगराध्यक्षा सौ.अस्मिता जाधव,सौ. शकुंतला सलामवाडे, सौ, संजीवनी सावंत यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

अनेक नगरसेवकांची अनुपस्थिती

आजच्या बैठकीस नगरसेवक अशोक चराटी, आनंदा कुंभार, धनाजी पारपोलकर, सिकंदर दरवाजकर, अनिरुद्ध केसरकर,सौ.शुभदा जोशी, यास्मिन बुड्ढेखान,विलास नाईक हे नगरसेवक अनुपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा कारखाना बेरिंग्ज चोरीप्रकरणी पाचजण अटकेत… धक्कादायक.. ‘कुंपणानेच खाल्ले शेत’.कार्यकारी संचालकासह पाचजण गजाआड

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रामतीर्थ जवळ मानवी कवटी सापडली

mrityunjay mahanews
error: Content is protected !!